Breaking News

महत्वाच्या बातम्या

मुरूड तालुक्यात वरुणराजाचे थैमान; राजपुरीत चार घरांवर दरड कोसळली

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, आठ दिवसात तब्ब्ल 1342 मिलीमीटर पाऊस कोसळला. आतापर्यंत मुरुड तालुक्यात एकूण 2563 मिलीमीटर पाऊस झाला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुरूड-अलिबाग रस्त्यावरील काशीद पूल कोसळल्यामुळे मुरुडहून अलिबाग, पनवेल, मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. या मुख्य रस्त्यावरील सर्व वाहतूक भालगाव व …

Read More »

रायगडात मुसळधार पावसाने उडवली दाणादाण

पेणमध्ये अनेक ठिकाणी पाणी शिरले पेण : प्रतिनिधी मुसळधार पावसाने पेण तालुक्यात धुमाकूळ घातला असून, नदी व खाडीकिनारी असलेल्या ग्रामस्थांची झोप उडाली आहे. तालुक्यातील गावा गावात नदीचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने रविवारी रौद्र रूप धारण केल्याने पेण तालुक्यातील बाळगंगा नदी तुडूंब …

Read More »

दहावीच्या निकालात ‘सीकेटी’ची धवल यशाची परंपरा कायम

पनवेल ः रामप्रहर वृत्तदहावीत धवल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाचा इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या वर्षी जरी परीक्षा झाली नसली तरी इयत्ता नववीचा निकाल आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बोर्डाने हा निकाल जाहीर केला आहे. यंदाच्या …

Read More »

बनावट पोलीस अधिकारी आणि चार साथीदार ताब्यात

महाडमधील घटना महाड ः प्रतिनिधीमहाड तालुका पोलिसांनी शनिवारी (दि. 18) संध्याकाळी किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे नाकाबंदीदरम्यान एक वाहनातून आलेल्या व पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवणार्‍या बोगस पोलीस व त्याच्या चार साथीदारांसोबत ताब्यात घेतले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगड येथे येणार्‍या पर्यटकांची चौकशी करण्यात येत आहे. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गाव …

Read More »

मुसळधार पावसाने रायगडला झोडपले

अनेक गावांत पाणी घुसले अलिबाग ः प्रतिनिधीमुसळधार पावसाने रविवारी (दि. 18) रायगड जिल्ह्याला झोडपून काढले. उत्तर रायगडमध्ये तर पावसाने धुमाकूळ घातला. अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागासह सारळ, म्हात्रोळी, रेवस, मिळखतखार, कार्ले आदी गावांमध्ये पाणी घुसले होते. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी 118.29 मिमी पाऊस पडला. रोहा तालुक्यात सर्वाधिक 184 मिलिमीटर, तर त्या खालोखाल …

Read More »

भाजप नेते लक्ष्मणशेठ म्हात्रे (पाटील) यांना पत्नीशोक

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ म्हात्रे (पाटील) यांच्या पत्नी जनाबाई यांचे रविवारी (दि. 18) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 65 वर्षांच्या होत्या.जनाबाई म्हात्रे (पाटील) यांच्या पार्थिवावर पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. जनाबाई यांच्या पश्चात पती लक्ष्मणशेठ म्हात्रे (पाटील), पुत्र अविनाश, शैलेश व …

Read More »

मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधीमुंबईत मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचून मुंबईची तुंबई झाली. चेंबूरमध्ये डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा बळी गेला आहे. याचबरोबर विक्रोळीत एक दुमजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय भांडूपमध्ये भिंत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते पडसरेत खावटी अनुदान योजनेचा शुभारंभ

सुधागड : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक प्रादेशिक कार्यालय जव्हार व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य वस्तूचे किटवाटप वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ पेण-सुधागड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ …

Read More »

पालीची नळपाणीपुरवठा योजना अडकली लालफितीत

दुषित पाण्याचा पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली गावाची सुमारे 12 कोटींची शुद्ध नळपाणीपूरवठा योजना लालफितीत अडकून पडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पाली शहराला अंबा नदिचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पुरविले जाते. तब्बल 15 हजारांहून अधिक लोक या पाण्यावर अवलंबून आहेत. पालीकरांना दूषित पाणी …

Read More »

कोरोना काळातील मृत पोलीस पाटलांच्या कुटूंबीयांना मदत

खालापूर, मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुका पोलीस पाटील संघ व पोलीस ठाण्याच्या वतीने कोरोना काळात मृत झालेल्या पोलीस पाटलांच्या ढेकू येथील सम्राट सुर्वे यांच्या कुटुंबाला एक लाखाचा चेक देण्यात आला. खालापूर तालुका पोलीस पाटील संघाची सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 17) सकाळी 11 वाजता खालापूर पोलीस ठाण्यात खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी …

Read More »