Breaking News

महत्वाच्या बातम्या

म्हसळाकरानी महावितरणचे थकविले रुपये 4 कोटी 52 लक्ष 47 हजार

म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील 5073 वीज ग्राहकांनी महावितरणचे तब्बल चार कोटी 52 लाख 47 हजार थकविले असून, त्याच्या वसुलीसाठी यापुढे कोणतीही सवलत मिळणार नाही, असे महावितरणचे म्हसळा येथील उपकार्यकारी अभियंता प्रदीप पटवारी यानी सांगितले. म्हसळा तालुक्यातील आंबेत, खामगाव, मेंदडी, म्हसळा शहर या विभागातील 5776 ग्राहकांनी वीज बिलांपोटी चार कोटी 52 …

Read More »

भाजपतर्फे म्हसळा, श्रीवर्धनमध्ये अन्नधान्य वाटप

म्हसळा ़: प्रतिनिधी भाजप कोकण विकास आघाडीच्या सहकार्याने आणि श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या प्रयत्नाने श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील गरीब व गरजूंना बुधवारी (दि. 14) अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव आणि रोजगाराच्या संधी नसल्यामुळेे अनेक गरीब कुटुंबे सध्या त्रस्त आहेत, हे लक्षात घेऊन श्रीवर्धन …

Read More »

रेवस-करंजा पूल काळाची गरज

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांनी रेवस -रेड्डी असा कोकणासाठी सागरी  महामार्ग बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. या मार्गावरील महत्वाचा टप्पा म्हणजे  रेवस-करंजा पूल. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने हे पूल पूर्ण करण्याची घोषण केली. मात्र पूल काही बांधले गेले नाही. पुलाची घोषणा झाली की, काही दिवस …

Read More »

दिलासा! पनवेलमध्ये पॉझिटिव्हीटी दरात घट; कोरोना चाचण्या वाढविल्याचा परिणाम, चार दिवसांत 22 हजारांहून अधिक टेस्ट

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याप्रमाणेच पनवेल कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्याच्या दृष्टीने आणि कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल कार्यक्षेत्रात दररोज सरासरी 4000 आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्या करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार चार दिवसांमध्ये जवळपास 22 हजारांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम हळूहळू दिसू …

Read More »

माथेरान म्हणजे नैसर्गिक ऑक्सिजन केंद्र -जिल्हाधिकारी

कर्जत : बातमीदारघनदाट जंगलामुळे माथेरान हे ऑक्सिजनचा खजाना असलेले केंद्र असून येथे आल्यावर मन प्रसन्न होते, असे प्रतिपादन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले.जिल्हाधिकारी निधी चौधरी या परिवारासोबत माथेरानला पर्यटनासाठी आल्या आहेत. खाजगी दौरा असूनही त्यांनी येथील बी. जे. हॉस्पिटलमधील कोविड वार्ड, ओपीडी, ऑक्सिजन यंत्रणा यांची पहाणी केली. तसेच तेथील …

Read More »

चाईल्ड लाइन,‘जाण‘कडून पूर्वाला आधार

खालापूर : प्रतिनिधी वडील गमावलेल्या आणि आई मानसिक रुग्ण असलेल्या खोपोलीतील आठ वर्षांच्या पूर्वा राहुल देवकुळे या मुलीच्या पुनर्वसनाची जबाबदारी रायगड चाईल्ड लाइन या संस्थेने घेतली आहे. तर पनवेलच्या जाण फाऊंडेशनने तिच्या संगोपन, शिक्षणाची  जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे पूर्वाच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा मिळाली आहे.पूर्वा राहुल देवकुळे या अवघ्या आठ वर्षाच्या …

Read More »

दिलासा! पनवेलमध्ये पॉझिटिव्हीटी दरात घट; कोरोना चाचण्या वाढविल्याचा परिणाम, चार दिवसांत 22 हजारांहून अधिक टेस्ट

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याप्रमाणेच पनवेल कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्याच्या दृष्टीने आणि कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल कार्यक्षेत्रात दररोज सरासरी 4000 आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्या करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार चार दिवसांमध्ये जवळपास 22 हजारांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम हळूहळू दिसू …

Read More »

पुरामुळे नांदगाव हायस्कूलचे नुकसान

मुरुड : प्रतिनिधीतालुक्यातील यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या कार्यालयासह प्रत्येक वर्गात पुराचे पाणी शिरल्यामुळे शाळेतील  वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मुरूड तालुक्यात सोमवारी 348 मिलीमीटर त्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी 204 मिलीमीटर पाऊस पडल्याने नदी व समुद्राशेजारी असणार्‍या सर्व गावांत पुराचे पाणी शिरले. नांदगाव हायस्कूलमध्ये तर प्रत्येक वर्गात …

Read More »

म्हसळा कधी होणार आरोग्यसंपन्न?; ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक नाही, तर तालुक्याला नाही तालुका आरोग्य अधिकारी

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोविड-19चे रुग्ण वाढत आहेत, मात्र ग्रामीण रुग्णालयात स्थापनेपासून वैद्यकीय अधीक्षक हे पद रिक्त आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या  अधीक्षकांचा कारभार श्रीवर्धनमधून केला जात आहे, तर तालुका आरोग्य अधिकार्‍याचा कारभार जि. प. दवाखाना पाभरे येथील वैद्यकीय अधिकारी पहातात. तालुक्यातीत नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी ही दोन्ही …

Read More »

सिडकोकडून मराठी भाषा भवन उपकेंद्रासाठी ऐरोलीतील भूखंडाचे शासनाकडे हस्तांतरण

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाकडून मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या उभारणीकरिता महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाला देण्यात आलेल्या नवी मुंबईतील ऐरोली येथील भूखंडाचे मंगळवारी (दि. 13) मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत व सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या अधिकार्‍यांतर्फे हस्तांतरण करण्यात आले. …

Read More »