अलिबाग ः रामप्रहर वृत्त भारतातील सर्वांत वेगाने वाढणार्या मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट अप्सपैकी एक असलेल्या रुनाया समूहाने कोविडच्या संकटावर मात करण्यात सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होत अलिबाग तालुक्यातील नवेदार नवगाव गावात लसीकरण मोहीम राबविली. यामध्ये तब्बल 500 नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात आला. रायगड जिल्ह्यात विशेषत: अलिबाग भागात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविड …
Read More »पॉस्को कंपनीचा मूठभर पुढार्यांना फायदा; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील विळे-भागाड परिसरात आलेल्या पॉस्को कंपनीचा फायदा स्थानिकांना नव्हे; तर येथील मूठभर पुढार्यांना, त्यांच्या मुलांना तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (दि. 13) माणगाव येथे बोलताना केला. विळे-भागाड एमआयडीसी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांवर झालेल्या अन्यायाबाबत भागाड सरपंच प्रकाश …
Read More »डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा गौरवशाली जीवनपट वेबेक्सवर
खारघर ः रामप्रहर वृत्त भारतीय जनसंघाचे संस्थापक तसेच भाजप कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतीदिन 23 जून आणि जन्मदिन 6 जुलै या पंधरवड्यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळ स्तरावर अनेक कार्यक्रम झाले. खारघर तळोजा मंडल अंतर्गत …
Read More »सीरम इन्स्टिट्यूट करणार ‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन
भारतात 30 कोटी डोसचे नियोजन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे 30 कोटी …
Read More »विभाग कार्यालयाच्या आवारातच खासगी वाहनांचे पार्किंग
नवी मुंबई ः वार्ताहर नवी मुंबई शहरात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहने पार्क करीत आहेत. परिणामी नियोजनबद्ध शहरातील रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले असताना आता वाहनधारकांनी चक्क मनपाच्या कोपरखैरणे येथील विभाग कार्यालयाच्या आवारातच खासगी वाहनांचे पार्किंग सुरू केले आहे. येथे रोज संध्याकाळी आजूबाजूच्या …
Read More »‘सीकेटी’त स्व. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि. 13) संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर (पिताश्री) यांची पुण्यतिथी संपन्न झाली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, कला विभागप्रमुख डॉ. यू. टी. भंडारे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. …
Read More »चिरनेरच्या अक्कादेवी धरणावर पर्यटकांचा धिंगाणा; दारूच्या बाटल्या आणि कचर्याचा खच
उरण ः वार्ताहर कोरोनाचा धोका असल्यामुळे नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे शासनाचे आदेश असतानाही बंदी आणि लॉकडाऊन झुगारून रविवारी (दि. 11) चिरनेरच्या अक्कादेवी धरणावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. दिवसभर या ठिकाणी मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा सुरू होता. येथे आलेल्या पर्यटकांनी या पवित्र भूमीवर दारूच्या बाटल्या आणि कचर्याचा खच टाकला. …
Read More »चिरनेरचे आदिवासी अद्यापही रस्त्याविना; ग्रामपंचायतीचा उदासीन कारभार
उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यात आल्याने त्यांना नवा थाट लाभला आहे, मात्र चिरनेर गावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर डोंगरकुशीत वास्तव्य करणार्या केल्याचा माळ आदिवासी वाडीवरील कातकरी- आदिवासींना अद्यापही चिखलाची वाट तुडवत घर गाठावे लागत आहे. या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेतून दोन वर्षांपूर्वीच 17 लाखांचा निधी मंजूर होऊनही …
Read More »‘मला तळोजा जेलमध्ये हलवा’
घोटाळेबाज विवेक पाटील यांची मागणी पनवेल ः प्रतिनिधीमुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम सत्र न्यायालयाने आता 22 जुलैपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे तसेच ‘आपल्याला तळोजा जेलमध्ये हलवावे’, या विवेक पाटील यांच्या मागणीवर 22 जुलैच्या सुनावणीत विचार करू, असेही सत्र …
Read More »रायगडात रेड अलर्ट
अतिवृष्टीचा इशारा; दोन दिवस धोक्याचे अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 13) पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान खात्याने पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, दोन दिवस पडलेल्या पावसाने नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत.जिल्ह्याच्या बहुतांश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper