Breaking News

महत्वाच्या बातम्या

म्हणूनच ‘ते’ पत्र लिहिले

आमदार प्रताप सरनाईक यांचे ‘मविआ’वर शरसंधान मुंबई ः प्रतिनिधीशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारविरोधातील खदखद बोलून दाखवली आहे. माझ्यावरील संकटावेळी महाविकास आघाडीचे नेते माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, असे सांगून प्रताप सरनाईक यांनी ‘मविआ’वर शरसंधान साधून खळबळ उडवून दिली …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी अधिवेशनातही आवाज

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सोमवारी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. या वेळी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, …

Read More »

कर्नाळा बँकेकडून हक्काचे पैसे न मिळाल्याने खातेदार, ठेवीदार अगतिक

दोषी संचालकांवर न्यायालयामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विचार पनवेल ः प्रतिनिधीकर्नाळा बँकेतील आर्थिक घोटाळा आणि भ्रष्टाचारामुळे ज्या खातेदार आणि ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत, त्या छोटी मोठी गुंतवणूक करणार्‍या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन दोषी संचालकांविरुद्ध थेट न्यायालयातच फौजदारी गुन्हा दाखल केल्यास त्यांना न्याय मिळू शकेल. सध्या सुरू असलेल्या सरकारी कारवाईमुळे …

Read More »

एमपीएससीमधील भरतीच्या घोषणेची फडणवीसांकडून पोलखोल

मुंबई ः प्रतिनिधीराज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादग्रस्त ठरला. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येवरून विरोधकांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धरले होते.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीमधील रिक्त जागा भरण्याची घोषणा केली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही फसवी घोषणा असल्याचा आरोप करून घोषणेची पोलखोल केली.देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा …

Read More »

पावसाळी अधिवेशनात जनहिताच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक

पहिलाच दिवस ठरला वादळीभाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन; सत्ताधार्‍यांकडून दडपशाही मुंबई ः प्रतिनिधीविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (दि. 5) पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गोंधळ उडाला. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारचा समाचार घेतला. अन्यायी कारभारावरून भाजपने सत्ताधार्‍यांना सळो की पळो करून सोडले. या वेळी जनतेच्या हिताच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार; राणे, गावित यांच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (दि. 7) होणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना हावित यांच्या नावाची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळातील 17 ते 22 मंत्री 7 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा …

Read More »

पोलादपूरच्या कुडपणमध्ये पर्यटकांची गर्दी; एसटीअभावी ग्रामस्थ मात्र झालेत स्थानबद्ध

पोलादपूर : प्रतिनिधी अनियमित एसटी बस सेवेमुळे पोलादपूर तालुक्यातील थंड हवेच्या कुडपण खुर्दमधील ग्रामस्थांना गाव सोडणे कठीण झाले असून, पर्यटक मात्र खासगी वाहनांनी ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तातडीने एसटी बस सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलादपूर तालुक्यातील कुडपण खुर्द या ब्रिटीशकालीन हिलस्टेशनचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे प्रयत्न …

Read More »

मुरूड समुद्रकिनारी डांबरसदृश ऑइल; मच्छीमार चिंतेत

मुरूड : प्रतिनिधी येथील समुद्रकिनारी डांबर सदृश्य चिकट जाडसर ऑइल मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने मच्छिमारांनी चिंता व्यक्त केली आहे. खोल समुद्रातील मासेमारी सध्या बंद असली तरी मुरूडमधील कोळी बांधव कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी समुद्रकिनारी जाळी टाकून (पेर्‍याने) मासेमारी करतात मात्र मुरूड समुद्रकिनार्‍यावर खराब ऑइल वाहून आले आहे. खोल समुद्रात तेल विहिरी आहेत. …

Read More »

कर्जतमध्ये पावसाची दडी; भाताची रोपे सुकू लागली, शेतकरी हवालदिल

कर्जत : बातमीदार तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे हिरवीगार झालेली भाताची रोपे पावसाअभावी सुकू लागली आहेत. पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास काही शेतकर्‍यांवर दुबार  पेरणी करण्याची वेळ येणार आहे. कर्जत तालुक्यात 10 हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. त्यासाठी बाजारातून भाताचे बियाणे विकत आणून …

Read More »

12 प्रलंबित, 12 निलंबित

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सोमवारी जे काही घडले ते भारतीय लोकशाहीच्या इतिहासाला काळिमा फासणारे आहे. अत्यंत दुर्दैवी पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्याचा विक्रम महाविकास आघाडी सरकारच्या नावे नोंदवला गेला. सभागृहाबाहेर तुम्हाला पळता भुई थोडी करू अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणी दिली, ती …

Read More »