Breaking News

महत्वाच्या बातम्या

मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर बसचा भीषण अपघात; पाच प्रवाशी जखमी, दोन गंभीर

खोपोली: प्रतिनिधी पुणे येथून ठाणे कडे एक्सप्रेस वे मार्गाने निघालेल्या एसटी महामंडळाच्या प्रवाशी बसचा खोपोली हद्दीत गुरुवारी (दि.०६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या बस मध्ये एकूण 30 प्रवाशी प्रवास करत असून पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील दोघे जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. पाचही जखमींना तातडीने …

Read More »

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती

पनवेल :  पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती नगरविकास विभागाकडून करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत असणारे मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी पनवेल महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी सुद्धा ते पनवेल नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी …

Read More »

किल्ले रायगड शिवगर्जनेने दुमदुमला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष

महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावर गुरुवारी (दि.6) 350वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रे याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगड हजेरी लावली होती. शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि शिवगर्जनेने अवघा रायगड या वेळी दुमदुमून गेला. आखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या मार्फत गेली …

Read More »

रायगडात खासदार सुनील तटकरे विजयी; अनंत गीतेंचा पराभव

अलिबाग : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपला रायगडचा गड राखला आहे. लोकसभा निवडणुकीत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा 82 हजार 784 मतांनी पराभव केला. तटकरे यांना पाच लाख आठ हजार 352, तर गीते यांना चार …

Read More »

मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्ट्रिक; संजोग वाघेरेंवर मात

पुणे : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे 96 हजार 615 मतांनी पराभव केला. खासदार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात सरळ लढत झाली होती. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस समाजाचा वाढदिवस -पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

केशवसुत स्मारकाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 10 लाखांची मदत पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे राजकारणापेक्षा समाज आणि जनतेसाठी केलेले सामाजिक कार्य मोठे आहे. समाजाचे ऋण, सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांचा वाढदिवस हा समाजाचा वाढदिवस आहे, असे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन

पनवेल ः रामप्रहर वृत्त गोरगरीबांचे आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 2) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी अभीष्टचिंतन केले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, पुत्र आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, …

Read More »

‘जय संतोषी माँ’ 49; सुपर हिटचा सर्वकालीन बहुचर्चित चमत्कार….

पिक्चरच्या जगात सुपर हिट, मेगा हिट फिल्मची कोणतीही रेसिपी, तराजू, थर्मामीटरम कॅल्क्युलेटर, लॅपटॉप नाही. जगातील कोणताही ज्योतिषी कशीही कुठलीही कुंडली मांडून पिक्चर सुपर हिटसाठी हा मुहूर्त हुकमी आहे असे सांगू शकत नाहीत. तरीही अनेक फिल्मवाल्यांची शुभ तारीख, शुभ शब्द यावर श्रद्धा (कधी अंधश्रद्धाही) असतेच, आणि तीही असावी. पिक्चरचं भवितव्य पब्लिकच्या …

Read More »

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पनवेलमध्ये निषेध आंदोलन

पनवेल ः रामप्रहर वृत्त महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला. त्यामुळे आव्हाड यांचा सर्वत्र निषेध होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. 30) आव्हाडांविरोधात पनवेलमध्येही जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र …

Read More »

दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड जिल्हा अव्वल; 96.75 टक्के निकाल

अलिबाग ः प्रतिनिधी दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील 96.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पनवेल तालुका अव्वल असून सर्वाधिक 97.76 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 35 हजार 913 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 35 हजार 727 विद्यार्थी परीक्षेला …

Read More »