गोदामांच्या कमतरतेमुळे हमीभावाने भात खरेदीस अडचणी कर्जत : बातमीदार तालुक्यात कर्जत दहिवली मार्केट यार्ड, कशेळे आणि नेरळ अशी तीन हमीभाव भात खरेदी केंद्रे आहेत. मात्र यंदा कशेळे आणि नेरळ येथील केंद्रे बंद असल्याने कर्जत येथील भात खरेदी केंद्रावर कामाचा ताण वाढला आहे. तेथे तालुक्यातील शेतकरी गर्दी करीत असल्याने भात खरेदी …
Read More »भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पनवेल ः भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांचा वाढदिवस दरवर्षी कार्यकर्ते तसेच विविध मान्यवरांकडून उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र यंदा कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हारतुरे, पुष्पगुच्छ घेऊन प्रत्यक्ष भेटीसाठी न येण्याची सूचना केली आहे. तुमच्या शुभेच्छांचा मला कायमच आदर असून, …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बेनामी संपत्तीच्या व्यवहारात सहभागी
भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप अलिबाग ः प्रतिनिधीआत्महत्या केलेले इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी 2014मध्ये 19 घरांची खरेदी केली, मात्र सहा वर्षे ती नावावर केली नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बेनामी संपत्तीच्या व्यवहारात सहभागी होते, असा आरोप भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट …
Read More »महाराष्ट्रात शुक्रवारी लसीकरणाची व्यापक ड्राय रन
मुंबई : केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शुक्रवारी (दि. 8) महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांत कोरोना लसीकरण ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेत एक आरोग्य संस्था या ठिकाणी ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली. क्षेत्रीय स्तरावर …
Read More »कुणबी समाजाचा स्तुत्य उपक्रम
नागोठणे : प्रतिपादन रायगड जिल्ह्यात लग्नाचा हळदी समारंभ साग्रसंगीत करण्याची परंपरा आहे. या परंपरेला छेद देण्याचा स्तुत्य उपक्रम रोहे तालुक्यातील बाहे या गावात करण्यात आला. बाहे गावात रोहे तालुका कुणबी युवक संघटनेचे अध्यक्ष अनंत थिटे यांच्या नातेवाईकाचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. लग्नाचा आदल्या दिवशी हळदी समारंभाच्या वेळी इतर कोणताही …
Read More »वरंधा घाटांमध्ये चौदाचाकी टँकर फसला
आठ तास वाहतूक ठप्प महाड : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्या वरंधा घाट रस्त्यावर माझेरी गावाच्या हद्दीत एका अवघड वळणावर चौदाचाकी टँकर फसल्याने या मार्गावरील वाहतूक आठ तास ठप्प झाली होती. महाड – भोर – पंढरपूर मार्गावरील वरंधा घाट गेल्या अनेक वर्षापासून धोक्याचा झाला आहे. मात्र पुणे, भोर, पंढरपुरकडे …
Read More »रणधुमाळी ग्रामपंचायत निवडणूकीची
जिल्ह्यात 15 जानेवारीला मतदान तर 18ला मतमोजणी अलिबाग : जिमाका एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे. त्यापैकी 78 ग्रामपंचायतींमधील एकूण 299 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील …
Read More »औद्योगिक सुरक्षा रामभरोसे
रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून उदयास येत आहे. या जिल्ह्यात यापूर्वीच मोठमोठाले औद्योगिक प्रकल्प आले. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांचा बेकारीचा प्रश्न काही प्रमाणात सुटला. परंतु समस्यादेखील तितक्याच निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्याचबरोबर औद्योगिक सुरक्षेचीदेखील समस्या आहे. मागील काही महिन्यांमध्ये औद्योगिक प्रकल्पांमध्ये झालेल्या अपघातांचा विचार केल्यास रायगड जिल्ह्यातील …
Read More »पोलादपूर एसटी बसस्थानकातील सांडपाणीप्रश्नी मनसेची स्वाक्षरी मोहीम
पोलादपूर : प्रतिनिधी येथील एसटी बस स्थानकामध्ये स्वच्छतागृह आणि गटारांचे दूर्गंधीयुक्त सांडपाणी मोठया प्रमाणात वाहू लागले आहे. त्या संदर्भात मनसेने सोमवारी (दि. 4) स्वाक्षरी आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रवासी आणि जनतेने पाठिंब्याची स्वाक्षरी केली. पोलादपूर एसटी बस स्थानकांतून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येणार्या सांडपाण्याबाबत यापूर्वी मनसेने बॅनरबाजी करून आंदोलन केले होते. आता …
Read More »पोलादपुरात खोदकामादरम्यान आढळल्या 15 अश्मयुगीन मूर्ती; राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कोंढवीतील फणसकोंड येथून प्रथम गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळयाची वाडी या आठ गावांचे आराध्य ग्रामदैवत आठगांव कोंढवी भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन भव्य पाषाणमंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्डयातील माती उपसण्यात आली. मातीच्या ढिगार्यामध्ये 15 अश्मयुगीन पाषाण मुर्ती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper