Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘एसटीसारखे सुरक्षित वाहन नाही ही भावना प्रवाशांमध्ये दृढ करा’

मुरूड : प्रतिनिधी रस्ते अपघाताचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. तथापि खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीचे रस्ते अपघाताचे प्रमाण अल्प आहे. एसटीसारखे सुरक्षित वाहन दुसरे नाही, ही भावना प्रवाशांमध्ये दृढ करा, असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी येथे केले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षितता मोहीमेचा   शुभारंभ उपनिरीक्षक सुबनावळ …

Read More »

रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला यश; पहिल्या टप्प्यात 351 जणांना मिळणार नोकरीची संधी; आंदोलन स्थगित

नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीविरुद्ध प्रकल्पग्रस्तांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. पहिल्या टप्प्यात 351 प्रकल्पग्रस्तांना ठेकेदारीत नोकरी मिळण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, उर्वरित प्रकल्पग्रस्तांनासुद्धा नोकरीत घेण्याचा शब्द मिळाला आहे. त्यामुळे आंदोलनाला सोमवारी (दि. 18) 53व्या दिवशी स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा मुंबई …

Read More »

रस्त्याच्या मध्यभागी मोबाइल टॉवरची उभारणी

कामोठेकरांचा संताप पनवेल ः प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग आणि मानसरोवर रेल्वेस्थानक यांना जोडणारा रस्ता हा कामोठ्यातील महत्त्वाचा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता बर्‍याच दिवसांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. आता कुठे रस्त्याचे दुरुस्तीकरण होत नाही, तोपर्यंत महापालिका आणि सिडकोच्या परवानगीने इंडस कंपनीने रस्त्याच्या मध्यभागीच मोबाइल टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सदर …

Read More »

खालापुरातील चिंचवली-गोहे पूल धोकादायक; मोठी जीवितहानी होण्याची शक्यता

खालापूर : प्रतिनिधी  तालुक्यातील चिंचवली गोहे, आत्करगाव, आडोशी व इतर गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षापूर्वी चिंचवली गोहे गावाजवळ पूल उभारण्यात आला होता. या पूलावर जागोजागी खड्डे पडल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या पूलावर लहान-मोठे अपघात घडत असल्याने वाहनचालकांसह प्रवासी, परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. चिंचवली गोहे, आत्करगाव, आडोशी …

Read More »

अनलॉकनंतर आदिवासींचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू; जिल्ह्यांतर्गत स्थलांतराला पसंती

माणगाव : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या सुरूवातीला मार्च 2020 मध्ये राज्याच्या विविध भागातून वाडी वस्तीवर परतलेले आदिवासी बांधव अनलॉकनंतर पुन्हा रोजगारासाठी स्थलांतरीत होऊ लागले असून. माणगाव तालुक्यातील सुमारे 40टक्के आदिवासींनी स्थलांतर केले आहे. कोरोना महामारीच्या काळात रोजगार गमावलेले आदिवासी कुटूंब आपापल्या वाडी वस्तीवर परतले होते. गेले नऊ महिने आपल्या मुळ ठिकाणी …

Read More »

सुधागड तालुका पशुधन डॉक्टर-कर्मचार्यांच्या प्रतीक्षेत; उपलब्ध अधिकार्यांवर अतिरिक्त कार्यभार

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यात 50 हजाराहून अधिक पशुधन आहे. त्यांच्यासाठी तालुक्यात सहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बहुतांश पदे रिक्त असल्याने येथील जनावरांना व पशुपक्षांना वेळेत उपचार मिळत नाही. शिवाय रिक्त पदांची जबाबदारी इतर अधिकारी व कर्मचार्‍यांवर आल्याने त्यांच्यावरील जादा कामाचा ताणही …

Read More »

स्वच्छतादूतांना सलाम!

लाखो रुपयांची खासगी रुग्णालयांची बिले, चार भिंतीत स्वत:ला कोंडून घेणे, आजूबाजूच्या आणि नातेवाईकांची आपल्याकडे पाहण्याची बदलेली दृष्टी यामुळे कोरोना म्हटले की प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते. पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेत कामाला मुंबईला जाणार्‍यांचे प्रमाण मोठे असल्याने सुरुवातीच्या काळात  दिवसाला 250पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत होते. आज मात्र त्याचे प्रमाण 40च्या …

Read More »

बार्सिलोनाला नमवून अ‍ॅथलेटिक बिलबाओ अजिंक्य

स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल सेव्हिला : वृत्तसंस्थाअ‍ॅथलेटिक बिलबाओने पिछाडीवरून मुसंडी मारत बार्सिलोनाला 3-2 असे हरवून स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. इनाकी विलियम्स याने अतिरिक्त वेळेत केलेला गोल अ‍ॅथलेटिकच्या विजयात मोलाचा ठरला.अँटोनी ग्रिझमन याने 40व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल करीत बार्सिलोनाला आघाडीवर आणले, पण दोन मिनिटांनी ऑस्कर डे …

Read More »

हिमाचल प्रदेशकडून महाराष्ट्राचा पराभव

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा बडोदा : वृत्तसंस्थारिषी धवनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर हिमाचल प्रदेशने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेण्टी-20 क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात महाराष्ट्रावर चार गडी राखून विजय मिळवला. या विजयासह हिमाचल प्रदेशने गुणतालिकेत 16 गुणांनिशी दुसरे स्थान पटकावत बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्वप्नील …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा धडाकेबाज विजय

गिल, पंतची दमदार खेळी ब्रिस्बेन : वृत्तसंस्थाअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जबरदस्त विजय मिळवत मालिका 2-1 अशी जिंकली आणि बॉर्डर-गावस्कर चषक आपल्याकडे कायम राखला. शुभमन गिल आणि ऋषभ पंत भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताने 4 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. …

Read More »