Breaking News

महत्वाच्या बातम्या

बहुसंख्याक समाजाच्या समस्या अन् संवैधानिक जबाबदारी

भारतीय संघराज्यामध्ये विविधतेत एकतेचे सूत्र देशाच्या अखंडतेला कायमच खतपाणी घालत आहे. सामाजिक, भाषिक विविधता, आर्थिक, वैचारिक, व्यावसायिक, पेहराव, आहार आणि राहणीमानातील विविधतांचा उहापोह आपण सर्वार्थाने भारतातील नागरिकांसंदर्भात करू शकतो, मात्र ’भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा म्हणताना आपण या विविधतेतील एकता सहजरीत्या स्वीकारतो. बहुसंख्याक या शब्दामध्ये संख्या गृहित धरली आहे, …

Read More »

हरविलेले बालक पोलिसांकडून पालकांकडे सुपूर्द

पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहत परिसरात हरविलेल्या चार वर्षीय मुलाला पोलिसांनी शोधून काढून तत्काळ मुंडेकर कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. कामोठे वसाहतीतील सेक्टर 12 गगनगिरी सोसायटी येथे राहणार्‍या मुंडेकर कुटुंबियांचा चार वर्षीय मुलगा उदय हरविल्याने त्यांनी याबाबत तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. वरिष्ठ निरीक्षक संजय …

Read More »

उरण, खारघरमध्ये राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी

उरण : वार्ताहर भाजप उरण तालुका यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस मंगळवारी (दि. 12) येथील भाजप कार्यालयात साजरा करण्यात आला. आमदार महेश बालदी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक …

Read More »

जेएनपीटीने केला वीजवितरण फ्रॅन्चायझी करार

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)ने आपल्या क्षेत्रात वीजपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) सोबत एक सामंजस्य करार करून वितरण फ्रॅन्चायझी करार केला आहे. जेएनपीटीच्या विश्वस्त मंडळाने 24 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत या संबंधीच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. …

Read More »

भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुरेश पाटील

उरण : वार्ताहर भारतीय फोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर महासंघाची (बीएमएस) राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबई येथे दि. 10 व 11 जानेवारीला देशातील सर्व बंदरातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत सुरेश पाटील यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी एकमुखाने निवड करण्यात आली. देशातील सर्व उद्योगक्षेत्रातील एक नंबरची असलेली कामगार संघटना भारतात …

Read More »

कोरोनाच्या विरोधातील लढाईत पंतप्रधान मोदींचे कार्य जगात सर्वोत्तम

देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य जगात सर्वोत्तम आहे. कोरोनाच्या विरुध्द संपूर्ण देशाने एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता होती. परंतु प्रत्येक गोष्टीत विरोध करण्याची मानसिकता असणार्‍या विरोधी पक्षांनी निरर्थक आरोप करण्याचेच काम केले आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोरिवली येथे म्हणाले. कोरोनाच्या …

Read More »

उडत येणारे संकट

महाराष्ट्रासह एकूण 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे संकट घोंघावू लागले आहे. जागोजागी पक्षी मरून पडल्याच्या घटना ऐकू येऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी कावळे, कबुतरे आणि बदके अचानक मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. आता हे पक्षी नेमके बर्ड फ्लूमुळेच मेले की अन्य कुठल्या कारणाने याचा तपास करावा लागेल. परंतु परभणीजवळील एका गावामध्ये …

Read More »

जडेजा म्हणतो, लवकरच परतणार!

सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेला भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजावर सिडनी येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. जडेजाच्या डाव्या हाताचा अंगठ्याला दुखापत झाली आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर जडेजाने लवकरच संघात परतण्याचे संकेत दिले आहेत. तिसर्‍या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना मिचेल स्टार्कने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू टोलावताना जडेजाचा अंगठा दुखावला …

Read More »

किनारा सुरक्षेसाठी पोलिसांचे ‘सागर कवच’; मुरूडचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान

मुरूड : प्रतिनिधी सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. त्यानुसार मुरूड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कवच अभियानाला सागरी किनारी भागात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत 1992मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले …

Read More »

सायना नेहवालला कोरोनाची लागण?

बँकॉक : वृत्तसंस्था भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सायनाने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियामधील सूत्रांनी मात्र सायनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. आठवडाभरापूर्वी सायनाने कोरोनावर मात करीत पुन्हा सराव …

Read More »