Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगड प्रीमियर लीगचा थरार

कसळखंड येथील मैदानावर 2 फेब्रुवारीपासून पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींसाठी पनवेल तालुक्यातील कसळखंड येथील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळच्या वतीने रायगड प्रीमियर लीग (आरपीएल)चे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर 2 ते 8 फेब्रुवारी 2021 या कालावधीत या क्रिकेट सामन्यांचा थरार …

Read More »

कशेडी घाटात बस कोसळली

मुलाचा मृत्यू; 15 प्रवासी जखमी पोलादपूर : प्रतिनिधीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भोगाव खुर्द गावाच्या वळणावर गुरुवारी (दि. 31) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक खासगी आराम बस दरीमध्ये कोसळली. या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू, तर बसमधील 28 पैकी 15 प्रवासी जखमी झाले आहेत.सायन (मुंबई) येथून कणकवलीकडे जाणारी …

Read More »

जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसदेत ‘सीकेटी’ची छाप; पौर्णिमा गायकवाडची राज्यपातळीवर निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात येणार्‍या ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव-2021’ साठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) येथील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका पौर्णिमा गायकवाड (द्वितीय वर्ष-कला शाखा)ची जिल्हास्तरीय स्पर्धेमधून …

Read More »

पेणमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आणि बंद

चिमुकलीवरील बलात्कार व हत्येचा तीव्र निषेध पेण : प्रतिनिधीपेणजवळील आदिवासी वाडीतील तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार व हत्येप्रकरणी गुरुवारी (दि. 31) सर्व राजकीय पक्ष, विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. शहरातील व्यापारी व दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून या मोर्चास पाठिंबा दर्शविला. दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन …

Read More »

भारतात जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबविणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती; राजकोटमध्ये रुग्णालयाचे भूमिपूजन राजकोट : वृत्तसंस्थाजगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याच्या दृष्टीने भारतात तयारी सुरू आहे. लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून, देशात निर्मिती झालेल्या लशीचा डोस नागरिकांना मिळेल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ते गुरुवारी (दि. 31) गुजरातमधील राजकोट येथे एम्स रुग्णालयाच्या …

Read More »

उरण शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त

उरण : वार्ताहर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर उरण पोलिसांनी शहरात व परिसरात नाका बंदी केली होती. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर तरुण गाड्या घेऊन फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. या वेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणार्‍या तसेच कोरोनाचे नियम भंग करणार्‍यांवर पोलीस कारवाई करीत होते. पिरवाड समुद्र किनारा, उरण चारफाटा, उरण शेवा-चार फाटा, …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी कळंबोली : प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने पनवेल, उरणसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचा त्याला कडाडून विरोध होताना दिसत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे झुंजार नेते स्व. दि. …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूक : उरणमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सहा ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख बुधवारी (दि. 30) असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा ग्रामपंचायतींमधील उमेदवारांनी उरण तहसील कार्यालयातील निवडणूक कार्यालयात गर्दी केली होती. सहा ग्रामपंचायतींमध्ये प्रभागांची संख्या 25 असून सदस्यसंख्या 70 आहे. उरण तालुक्यातील आपल्या …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून कुस्तीगीर संकुलासाठी भरीव मदत; सानपाडावासीयांना मिळणार मॅटवरील कुस्त्यांचा आनंद

नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर 3 येथील कुस्तीगीर संकुलासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून पाच लाख रुपये मंजूर केले आहेत. आमदार मंदा म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकार्‍यांना याबाबत लेखी पत्रही दिले आहे. स्थानिक समाजसेवक पांडुरंग आमले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे …

Read More »

दिलासादायक! नवी मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी घटला; कोरोनाबाधितांची संख्या 50च्या घरात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर कोरोना रुग्णांत वाढ झाल्याने 352 दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी झाली आहे. या आठवड्यात रुग्णसंख्या 50च्या जवळपास आलेली पाहायला मिळाली. दिवाळीपूर्वी शहरात कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी हा 11 नोव्हेंबर रोजी 352 दिवसांवर गेला होता. त्यानंतर काही नागरिकांनी …

Read More »