Breaking News

महत्वाच्या बातम्या

अहंकाराला चपराक

आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडचे काम थांबवून हा प्रकल्प कांजूरमार्ग येेथे हलविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला, त्याला अव्यापारेषु व्यापार म्हणता येईल. कुठलाही अभ्यास न करता, कायदेशीर सल्ला न घेता, केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकारने आरे येथील काम थांबवून मेट्रो कारशेड कांजूर येथे हलविण्याचे ठरविले. हा निर्णय जाहीर झाला तेव्हाच मेट्रो महाप्रकल्पाचे …

Read More »

धर्मशाळेस आर्थिक मदत; रुग्णांना चादर वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त ओवा गाव येथील संत गाडगे माहाराज धमार्थ निवास या धर्मशाळेच्या माध्यामतून सुनिल पाटील हे परिसरातील येणार्‍या अवे कॅन्सर रुग्नांची मनोभावे सेवा करत आहे. त्याअनुसंगाने भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या धर्मशाळेस भेट देऊन त्यांनी येथील रुग्णांना त्यांच्या हस्ते चादर वाटप करण्यात आले. तसेच या वेळी …

Read More »

माथेरानमध्ये प्रेमीयुगुल अपघातात जखमी

कर्जत : बातमीदार माथेरान फिरून घरी परतत असताना दोन प्रेमीयुगलांच्या दुचाकीने समोरून येणार्‍या वाहनाला धडक दिल्याची घटना माथेरान घाटात घडली आहे. या अपघातात दुचाकी चालवणार्‍या प्रियकराला जबर मार बसला असून त्याला पुढील उपचारासाठी बदलापूर येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार हे प्रेमी युगल माथेरान फिरण्यासाठी रविवारी आले होते. माथेरान …

Read More »

ठाकरे सरकारला दणका!

कांजूरमार्ग मेट्रोशेडचे काम तत्काळ थांबवविण्याचे हायकोर्टाचे निर्देश मुंबई ः प्रतिनिधी मुंबई मेट्रो-3च्या कारशेडसाठी कांजूरमार्गमधील 102 एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाने बुधवारी (दि. 16) स्थगिती दिली आहे. त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास एमएमआरडीएला मनाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय फेब्रुवारी महिन्यात दिला …

Read More »

स्कूल बसचालकांचे पेणमध्ये धरणे आंदोलन

पेण : प्रतिनिधी रायगड जिल्हा शालेय विद्यार्थी वाहतूक वाहन चालक मालक संघ या संघटने तर्फे संघटनेचे संस्थापक हरीश बेकावडे व अध्यक्ष बा. म. बिराजदार यांच्या उपस्थितीत पेण तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करुन तहसीलदार अरुणा जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रायगड जिल्ह्यात विद्यार्थी वाहतूक संघटनेचे सुमारे 700 सभासद …

Read More »

‘मुरूडमध्ये हमीभाव केंद्र सुरू करा; अन्यथा जन आंदोलन’

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने मुरूड तालुक्यातील शेतकरी नाराज झाले असून, येत्या आठ दिवसात भात खरेदी केंद्र सुरु झाले नाही तर सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून जन आंदोलन करतील असा इशारा किसान क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर यांनी दिला आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांत एकूण …

Read More »

पेण न. प.च्या विविध विषय समिती सभापतींची निवड

पेण : प्रतिनिधी पेण नगरपरिषदेच्या बांधकाम समिती सभापतीपदी दर्शन बाफना, कर व शुल्क समिती सभापतीपदी सुहास पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी तेजस्विनी नेने, शिक्षण, क्रीडा व पाणीपुरवठा समिती संभापतीपदी राजेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या विविध विषय समिती सभापती पदाची निवडणूक मंगळवारी (दि. 15) तहसीलदार तथा …

Read More »

चक्रीवादळातील वाताहतीकडे दुर्लक्ष; नांदगाव, चाफेवाडी, ओलमणमधील आरोग्य उपकेंद्रे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

कर्जत : बातमीदार निसर्ग चक्रीवादळात कर्जत तालुक्यातील प्राथमिक शाळा आणि आरोग्य उपकेंद्रांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र त्याकडे बघायला कर्जत पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषद यांना वेळ नाही. त्यामुळे  तालुक्यातील नांदगाव, चाफेवाडी आणि ओलमण येथील आरोग्य उपकेंद्रे आजही नवीन छपराच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जत तालुक्यात 3 जून 2020 मध्ये …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात विकासकामांचा झंझावात

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः प्रतिनिधीभाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे होऊन पनवेलच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. विभागात सर्वत्र विकासकामांचा झंझावात सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील शहरांसह गावांचाही …

Read More »

मोहोपाड्यातील सीसीटीव्ही पूर्ववत; ‘रामप्रहर’च्या वृत्ताची दखल

मोहोपाडा : प्रतिनिधी दैनिक रामप्रहरमध्ये सोमवार (दि.14)च्या अंकात मोहोपाड्यातील सीसीटीव्ही दुर्लक्ष या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच संबंधितांचे धाबे दणाणले आहे. याअगोदर प्रस्तुत प्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन परीसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते यावर चर्चा केली होती. ‘रामप्रहर’मध्ये वृत्त प्रसिध्द झालेल्या …

Read More »