Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोनावरील लशींची अहमहमिका

अधोरेखित वर्षाच्या सुरुवातीपासून अवघ्या जगाला आपल्या कवेत घेऊन अक्षरश: होत्याचे नव्हते केल्यानंतर महाभयंकर कोरोना महामारीवर वर्ष संपता संपता लस उपलब्ध होत आहे. कोविड-19 विषाणूचा जनक व लपवाछपवीत माहीर असलेल्या चीनकडे त्यावरील ठोस लस आहे की नाही हे त्यांनाच ठावूक, पण विविध लशींची होत असलेली निर्मिती पाहता या संकटाचा त्रास भोगावा …

Read More »

अपंगांनी केला तोरणा किल्ला सर

कर्जत : बातमीदार शिवूर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्जत पंचायत समितीमधील कर्मचारी जनार्दन पानमंद यांनी आपल्या अन्य चार दिव्यांग सहकार्‍यांसह गुरुवारी (दि. 3) तोरणा किल्ला सर करून जागतिक अपंग दिन साजरा केला.  जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पुणे येथील शिवूर्जा प्रतिष्ठानने गुरुवारी सह्याद्री पर्वतरांगेतील गरूडाचे घरटे म्हणून ओळख असलेल्या तोरणा किल्ल्याची मोहीम …

Read More »

पद्मदुर्ग किल्ल्याची स्वच्छता

मुरूड ः प्रतिनिधी दरवर्षी डिसेंबर महिन्यात पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती स्वच्छता मोहीम राबविते. पद्मदुर्ग किल्ल्यात पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात गवत वाढते. त्यामुळे पर्यटक किल्ला पाहायला घाबरतात. त्या पार्श्वभूमीवर मुरूडचे शिवप्रेमी दरवर्षी किल्ला स्वच्छ करतात. किल्ल्याच्या स्वच्छतेसह कोटेश्वरी देवीच्या मूळ स्थानाची स्वच्छता करून पूजन करण्याचे काम पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीचे …

Read More »

अतिरिक्त माती उत्खनन करणार्यांवर कारवाई

पेणमध्ये रॉयल्टी बुडविणार्‍यांचे धाबे दणाणले पेण : प्रतिनिधी तालुक्याच्या पूर्व भागात माती उत्खनन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून महसूल विभागाने अतिरिक्त मातीचे उत्खनन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. भराव व उत्खननाच्या नावाखाली ग्रामीण भागातील मोठमोठे डोंगर पोखरण्यात येत आहेत. पेण पूर्व विभागातील आराव करंबेली डोंगर भागात …

Read More »

आंबेघर-आमडोशी रस्ता दुरुस्तीला मुहूर्त

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते शुभारंभ नागोठणे ः प्रतिनिधी रोहे-नागोठणे मार्गात आंबेघर फाटा ते आमडोशी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरवठा केला होता. परिणामी अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आता जाग …

Read More »

रायगडात 77 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, रविवारी (दि. 6) नव्या 77 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 59 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 45 व ग्रामीण 9) तालुक्यातील 54, पेण नऊ, महाड सहा, खालापूर व रोहा तालुक्यातील प्रत्येकी तीन …

Read More »

राज्य सरकारकडून कोळी बांधवांची फसवणूक

देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल अलिबाग ः प्रतिनिधीचालू वर्षात अनेक वादळे आली. त्यात कोळी बांधवांचे नुकसान झाले. त्यांना नुकसानभपाई द्यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून केली होती, मात्र महाविकास आघाडी सरकारने कोळी बांधवांना मदतीच्या नावाने ठेंगा दिला. त्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी नेमलेल्या हरिदास कमिटीचा अहवाल दाबून ठेवला. या …

Read More »

गुलाबी थंडीची चाहूल

राज्यात पुन्हा एकदा थंडीमुळे गारवा आला आहे. समुद्रामध्ये सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होत असल्याने थंडीची कोंडी होत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाचे चटके जाणवत होते. अखेर राज्यात थंडी परतली आहे, पण ती टिकून राहणे आवश्यक आहे. आपल्या देशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा …

Read More »

टी-20मध्ये भारताची बाजी

दुसर्‍या सामन्यासह मालिकाही खिशात सिडनी : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्ध लागोपाठ दुसर्‍या टी-20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने धडाकेबाज खेळ करीत सहा गडी राखून बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत हार्दिक पांड्या-श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करीत विजयाला गवसणी घातली. या विजयासह भारताने तीन …

Read More »

डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडवणार -पंतप्रधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना रविवारी (दि. 6) अभिवादन केले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांना जो भारत अपेक्षित होता तो निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून म्हटले आहे.  लक्षावधी नागरिकांच्या आयुष्यात जो प्रगतीचा नंदादीप तेवला …

Read More »