Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाडमध्ये भाजपकडून निषेध

महाड : प्रतिनिधी भारत बंदला महाडमधील व्यापार्‍यांनी पाठिंबा दिला नसुन बहुतांश बाजारपेठ सुरळीत सुरू होती. मात्र प्रशासकिय यंत्रणेचा वापर करुन पोलीस बळावर महाड बंद करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाड भाजपने हाणून पाडला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत विधीमंडळात सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगितले. भारत बंदचा महाडमध्ये …

Read More »

मुरूड, महाडमध्ये भारत बंद अयशस्वी

मुरूडमध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत मुरुड : प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा रद्द करण्याकरिता देशभरातील शेतकर्‍यांनी दिल्ली येथे पुकारलेल्या आंदोलनाला पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राज्यासह मुरूड शहर व ग्रामीण भागात कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मुरूड शहरात सकाळ पासुनच नेहमीप्रमाणे सुरू होते. या बंदला मुरुडकर नागरिकांनी अजीबात प्रतिसाद दिलेला नाही. रस्त्यावर …

Read More »

राज्यस्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महामेळावा

अलिबाग : प्रतिनिधी राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महामेळाव्याचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ww.roigar.mahaswayam.gov.in   या वेबपोर्टलवर हा रोजगार महामेळावा होणार आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग-व्यवसाय …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून होणार विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन 9 आणि 10 डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी तसेच स्थानिक नेतेमंडळी …

Read More »

भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्राची मोलाची भूमिका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 8) इंडिया मोबाइल काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित केले. भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्राने मोलाची भूमिका साकारली असून, कोरोना काळातही तंत्रज्ञानाची मोलाची मदत झाल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले, परंतु अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमास दूरसंचारमंत्री रविशंकर …

Read More »

शरद पवार पत्रकारांवर संतापले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ व्हायरल झालेल्या पत्रांविषयी मंगळवारी (दि. 8) पत्रकारांनी विचारले असता, पवारांचा पारा चढला आणि ते पत्रकारांवर संतापले. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषिमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त …

Read More »

डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी सुधारित कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, त्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (दि. 8) ’भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दिला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या बंदवर जोरदार टीका केली आहे. डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत, असा घणाघात शेलार …

Read More »

‘भारत बंद’चा रायगडात फज्जा

अलिबाग : प्रतिनिधी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या मंगळवार (दि. 8)च्या भारत बंदचा रायगड जिल्ह्यात फियास्को उडाला. बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जवळपास सर्व व्यवहार सुरू होतेे. एसटी व खासगी वाहतूूकदेेखील सुरळीतपणे चालू होती. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही रायगड जिल्ह्यात भाजप वगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी …

Read More »

घरफोडी करणार्या सराईत दुकलीला अटक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त घरफोडी प्रकरणी वाशी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ते सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबई व परिसरात चाळीस हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील तीन लाख 77 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून …

Read More »

लिमये वाचनालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

पनवेल : येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात सालाबादप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष विनायक नरहर वत्सराज यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आुंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. या वेळी संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सुनीता जोशी, …

Read More »