434 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांचा आकडा हा पन्नास हजारांच्या घरात गेला असून कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या ही एक हजार इतकी झाली आहे. सध्या 434 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असून कोरोनामुक्तीचा दर 95 टक्केपर्यंत गेला आहे. …
Read More »रायगडात 75 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, सोमवारी (दि. 7) नव्या 75 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 37 व ग्रामीण 23) तालुक्यातील 60, पेण तालुक्यातील आठ, खालापूर, अलिबाग व सुधागड …
Read More »संधीसाधूंचे गंगास्नान
विरोधीपक्षांपैकी बहुतेक पक्षांनी संसदेमध्ये नवे कृषी विधेयक मंजूर करताना त्यास आपले समर्थन दिले होते. आता अचानक कोलांटउडी मारून त्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामागे त्यांचे दोन स्पष्ट हेतू दिसतात. एक म्हणजे मोदी सरकारला कोंडीत पकडणे आणि दुसरा हेतू म्हणजे नव्या कायद्यामुळे बंद पडू पाहणारी आपापली राजकीय दुकाने वाचवणे.केंद्रातील …
Read More »पेणच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वाशी, मसद, शिर्कीसह 14 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावे व वाड्यांना आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पेण खारेपाटाला पाणीपुरवठा करणार्या शहापाडा धरणाचे पाणी डिसेंबर महिन्यातच संपते. शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधील दक्षिण शहापाडा योजनेतील गावे जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून पाणी घेतात. तिकडेही आता पाण्याची समस्या आहे. उत्तर …
Read More »पोलादपुरात निराधार मुलीचे लग्न; माणुसकीचा हृदयस्पर्शी सोहळा
पोलादपूर : प्रतिनिधी आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आजोबांच्या मायेने वाढणार्या पोलादपूर तालुक्याच्या देवपूर गावातील दोन मुलींपैकी एकीचा विवाह 20 वर्षांपूर्वी एका दानशूर व्यक्तीने लग्नासाठी मदत करण्याच्या अटीवर देऊ केलेल्या रकमेच्या ठेवीतून सोमवारी (दि. 7) झाला. हा लग्नसोहळा म्हणजे माणुसकीचा हृदयस्पर्शी सोहळा ठरला. देवपूर येथील ह.भ.प. सोपानबुवा पवार यांची कोतवाल बुद्रुक येथे …
Read More »पनवेल : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एका कार्यक्रमाकरिता आले असता त्यांचे महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहात स्वागत केले.
Read More »उत्तर रायगडातील भाजप मंडल संपर्क प्रमुख जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उत्तर रायगडातील मंडल संपर्क प्रमुखांची नावे घोषित केली आहेत. कर्जत मंडल संपर्क प्रमुख म्हणून प्रकाश बिनेदार, खोपोली मंडल संपर्क प्रमुख सुनील नारायण घरत, खालापूर मंडल संपर्क प्रमुख विनोद सदाशिव साबळे, उरण मंडल संपर्क प्रमुख श्रीनंद मुकुंद पटवर्धन, …
Read More »पालीत बिबट्याचे पुन्हा एकदा दर्शन; नागरिक भयभीत; वनविभाग सतर्क
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील काही भागात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत असून, शहरी वस्तीपासून दूर जंगलभागात दिसणारा बिबट्या आता भर लोकवस्तीत दिसू लागला आहे. पालीजवळ असलेल्या झाप फाटा परिसरात रविवारी (दि. 6) सायंकाळी एका व्यक्तीला बिबट्या दिसून आला. त्यामुळे लोक भयभीत झाले आहेत. मागील महिन्यात पालीतील वाघजाई नगर येथे …
Read More »बैलगाडी शर्यतींचे आयोजन; मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधी बैलगाडी शर्यतींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असताना अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनार्यावर बैलगाडी शर्यतींचे आयोजन केल्याप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 2014मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली. त्यानंतर या शर्यतींना परवानगी मिळावी अशी स्थानिकांचीही मागणी आहे. त्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, पण त्यांना यश आलं …
Read More »कृषी कायद्यांवरून विरोधकांची दुटप्पी भूमिका; भाजपने साधला निशाणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करीत विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनात उडी घेतली आहे. यावरून भाजपने विरोधकांचा समाचार घेतला आहे. त्यांना निवडणुकांमध्ये सतत अपशय येत आहे. त्यामुळे ते सरकारच्या विरोधात उभे असून, त्यांना आपल्या जाहीरनाम्याचा विसर पडला आहे. विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत, असा आरोप …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper