Breaking News

महत्वाच्या बातम्या

राजमुद्रा फाऊंडेशनकडून मारुती मंदिराचा जिर्णोद्धार

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ बु. येथील धाटाव एमआयडिसीतील फायरस्टेशन समोर कॅपरस कॉलनीतील फार वर्षांपुर्वीचे पिंंपळा  खालच्या जुन्या हनुमान मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले. दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राजमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक तथा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग व फाऊंडेशन अध्यक्ष राजेश डाके याच्या माध्यमातून हा मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रम …

Read More »

शेखर तांडेल यांच्या कार्यालयाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नवघर गावातील भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस शेखर प्रकाश तांडेल यांच्या कार्यालयाचे  उद्घाटन रविवारी (दि.25) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उद्योजक राजेंद्र पडते, …

Read More »

मराठा समाजाचा आज आक्रोश मोर्चा

राज्य सरकारचा करणार निषेध मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा सक्रिय झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सीनिअर क्रिकेट क्लबच्या नवीन हंगामाचे उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा अर्थात विजयादशमी. या दिवशी चांगल्या कामांना प्रारंभ करण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार पनवेलमधील सीनिअर क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी आपल्या नूतन हंगामाची सुरुवात केली. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्रीफळ वाढवून आणि नंतर चौफेर फटकेबाजी करीत सीनिअर क्रिकेट क्लबच्या नवीन हंगामाची सुरुवात …

Read More »

खडसेंच्या सत्कारप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित

जळगाव ः प्रतिनिधी – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते रविवारी (दि. 25) पहिल्यांदाच जळगाव शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात आले होते. या वेळी राष्ट्रवादी महानगरकडून त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले, मात्र या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते दिसून न आल्याने हा कार्यक्रम  चर्चेचा विषय …

Read More »

‘शिवतीर्थावर गर्दीचे विक्रम मोडणारा दसरा मेळावा घेणार’

बीड : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त सावरगाव घाट येथे भगवानगडावर जोशपूर्ण भाषण केले. मी आता राष्ट्रीय मंत्री असल्याचे सांगत पक्षवाढीसाठी आपली जबाबदारी वाढल्याचेही पंकजा यांनी म्हटले. कोरोनामुळे दसर्‍या मेळाव्याला गर्दी नाही, पण गर्दीचे विक्रम मोडणार दसरा मेळावा आपण घेऊ. एक दिवस शिवाजी पार्क …

Read More »

रायगडात 114 नवे कोरोना पॉझिटिव्ह; तीन रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 25) नव्या 114 कोरोना रुग्णांची आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 168 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 81 व ग्रामीण 18) तालुक्यातील 99, उरण चार, अलिबाग तीन, पेण व रोहा प्रत्येकी दोन, तर खालापूर, कर्जत, सुधागड, म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी …

Read More »

झेंडूला सोन्याची झळाळी!

शेतकरी मात्र लाभापासून वंचित; कोरोनामुळे फूलशेतीकडे पाठ पाली ः प्रतिनिधी – दसर्‍यानिमित्त पाली सुधागडसह जिल्ह्यातील बाजारात सर्वत्र झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली होती, मात्र यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी बरसलेल्या पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले. अशातच कोरोना आणि लॉकडाऊनच्या सावटामुळे स्थानिक शेतकर्‍यांनी झेंडू शेतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे झेंडूला मागणी वाढल्याने भाव …

Read More »

संरक्षणमंत्र्यांनी केली शस्त्रपूजा

दार्जिलिंग ः वृत्तसंस्था – विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (दि. 25) पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे शस्त्रपूजा केली. या वेळी भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावावर त्यांनी भाष्य केले. लडाख सीमारेषेवर शांतता असावी आणि तणाव संपुष्टात यावा, अशी इच्छा राजनाथ सिंह यांनी या वेळी व्यक्त केली. भारताचे …

Read More »

समाजाच्या देणेदाराची भावना सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करते

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन माय लाईफ माय योगा, ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पनवेल ः प्रतिनिधी – समाजात मोठे होताना आपण समाजाचे देणेदार लागतो ही भावना खर्‍या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत करते, असे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 25) येथे केले. …

Read More »