जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार बेमुदत धरणे आंदोलन खालापूर : प्रतिनिधीपेण अर्बन बँकेचे ठेवीदार आपले पैसे मिळविण्यासाठी न्यायदेवतेवर विश्वास ठेवून घोटाळ्याविरोधात अविरत लढा देत आहेत, पण उदरनिर्वाहासाठी पैसे नसल्याने या ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आहे. शासन व प्रशासन अजून किती अंत पाहणार याचा जाब विचारण्यासाठी 7 सप्टेंबरपासून ठेवीदार हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे …
Read More »पनवेल महापालिकेची प्रथमच ऑनलाइन महासभा
रस्ते रुंदीकरणाला मंजुरी पनवेल : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेची महासभा सोमवारी (दि. 31) प्रथमच ऑनलाइन झाली. या सभेत शहरातील रस्ते रुंदीकरणाला महासभेने मंजुरी दिली. त्यामुळे शहरातील महत्त्वाचे रस्ते लवकरच मोकळा श्वास घेताना दिसतील, शिवाय स्वच्छताही दिसणार आहे. पनवेल महापालिकची सर्वसाधारण महासभा कोविड-19मुळे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. पनवेल महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच …
Read More »माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी (दि. 31) निधन झाले. 84 वर्षीय मुखर्जी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करीत ही माहिती दिली. प्रणव मुखर्जी …
Read More »आरटीई अंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया अपूर्ण
प्रतीक्षा यादीतील पालक चिंतेत; शैक्षणिक नुकसानीची भीती नवी मुंबई : आरटीईच्या अंतर्गत प्रवेशाची ऑनलाइन सोडत मार्च महिन्यात जाहीर करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे, निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश प्रकिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू झाले असून, निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. …
Read More »सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा ऑनलाइन कार्यक्रम
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – गणेशोत्सवाच्या निमित्ताने ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. वैशाली सरदेशपांडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम गुगल अॅपवर ऑनलाइन स्वरूपात केला गेला. पनवेल परिसरातील गणेशभक्तानी याचा लाभ घेतला. संस्थेच्या सभासद माधुरी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक …
Read More »नवी मुंबईतील 850 पोलीस कोरोनामुक्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनावर मात करण्यात नवी मुंबई पोलिसांनी यश मिळविले आहे. त्याकरिता पोलिसांच्या वेलनेस टिमचे नियोजन महत्वाचे ठरत आहे. या दरम्यान अनेक पोलिसांच्या कुटुंबांना जीवदान देण्याचे काम या टीमच्या नियोजनातून शक्य झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनाचे इतरत्र कौतुक होत आहे. राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला …
Read More »कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना प्रकृतीच्या समस्या
उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अडचण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीच्या इतर समस्या जाणवत आहेत. त्यामध्ये दीर्घकाळ अशक्तपणा, मानसिक तणाव यासह उच्च रक्तदाबाच्या समस्या समोर येत आहेत, परंतु अशा समस्यांवर उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अनेकांपुढे अडचणी निर्माण होत आहेत. कोरोनाची लक्षणे समोर येताच खासगी …
Read More »उद्धवा, अजब तुझे सरकार!
वेगवेगळ्या दिशेला तोंड असणार्या पक्षांचे सरकार असेल, तर काय होते याचा प्रत्यय महाविकास आघाडी सरकारकडे पाहिल्यावर सहजपणे येतो. वास्तविक, तीन पक्षांनी मिळून कोरोना संकट तसेच अन्य प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सर्व ताकद लावणे अपेक्षित होते, मात्र सगळाच सावळागोंधळ आहे. चार महिन्यांनंतरही देऊळ बंद त्याच गोंधळाचा एक भाग आहे. देशात अनलॉक अंतर्गत …
Read More »विनामास्क फिरणार्यांना मास्कचे वाटप
कर्जत : बातमीदार नेरळ बाजारात मास्क न लावता मोठ्या प्रमाणात नागरिक, ग्रामस्थ फिरत आहेत. त्यांना मास्क वापरण्याची सवय व्हावी म्हणून जनजागृती मोहीम रविवारी (दि. 30) नेरळ व्यापारी फेडरेशनने राबविली. दरम्यान, नेरळ बाजारपेठेत रॅली काढून मास्क वापरण्याचे आवाहन करीत व्यापारी फेडरेशनने मास्कचे वाटप केले. रॅलीमध्ये फेडरेशनचे अध्यक्ष कमलेश ठक्कर, उपाध्यक्ष निलेश …
Read More »हरिहरेश्वर मारळ परिसरात माकडांचा उच्छाद
श्रीवर्धन : निसर्ग चक्रीवादळाने तालुक्यातील बागायतदारांचे कंबरडेच मोडले आहे. 90 टक्के झाडे मोडून पडुन गेली आहेत. त्यामुळे बागायतदारांना नवीन लागवड करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मात्र हरिहरेश्वर मारळ परिसरात माकडांनी प्रचंड उच्छाद मांडला असून नवीन लागवडीसाठी आणलेली माडाची रोपे माकडांनी फस्त केली आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे हरिहरेश्वर मंदिर बंद आहे. याच परिसरात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper