Breaking News

महत्वाच्या बातम्या

गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूरदरम्यान लवकरच ई-वॉटर टॅक्सीसेवा होणार सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर या मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईहून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास सोपा होणार आहे. डिसेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गोव्यात चार बोटींची बांधणी करण्यात येत असून …

Read More »

‘गीतगंधाली’तून उलगडला कर्मवीर अण्णांचा जीवनपट

सातारा येथील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्‍या गीतगंधाली या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी (दि.25) सायंकाळी करण्यात आले होते. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुरस्कृत …

Read More »

माझगावचे शेकापचे माजी उपसरपंच अरुण जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत मोहोपाडा : रामप्रहर वृत्त माझगाव ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच अरुण जाधव यांनी रविवारी (दि.26) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार महेश बालदी यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते …

Read More »

लांबीचे काय हो? पिक्चरची खोली महत्त्वाची!

पिक्चरवाल्यांना वादविवादासाठी काहीही चालतं. आणि एकदा का वादाला तोंड फुटलं की फिल्मवाले, गॉसिप्सवाले त्यात काय काय, कुठून कशी भर घालतील काही सांगता येत नाही. काय तर म्हणे, संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ’अनिमल’ एकाच मध्यंतरचा असावा की दोन? का तर म्हणे, त्याची लांबी तीन तास एकवीस मिनिटे म्हणजेच एकशेएक्याण्णव मिनिटे इतकी …

Read More »

प्रत्येक आदिवासीवाडी-पाड्यांना वीज द्या; आमदार महेश बालदी यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन होत आहे. त्या अनुषंगाने महावितरण कंपनीच्या वतीने रायगड जिल्ह्यातील वीज वितरण प्रणालीसंबंधी सर्वसाधारण आढावा सभा खांदा कॉलनी येथे झाली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी प्रत्येक आदिवासी वाडी, पाड्यांमध्ये लवकरात लवकर वीज पोहचली पाहिजे, …

Read More »

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिरा गजाआड

पाच दिवसांची पोलीस कोठडी पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेलमधील शेकापचा माजी नगरसेवक सुनील गोविंद बहिरा यास पनवेल पोलिसांनी गजाआड केले असून गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता न्यायालयाने अधिक चौकशीसाठी त्याला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणूक आणि वारंवार लोकांमध्ये दहशत माजवण्याचा …

Read More »

न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची एमएमआरडीएकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्त न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधित मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात मुंबई येथे एमएमआरडीएच्या कार्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 24) बैठक झाली. या वेळी त्यांनी लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे न्हावा आणि गव्हाणमधील …

Read More »

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड व अंडरपास मंजूर

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई व पनवेल तालुक्यातून जाणार्‍या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूने 103.21 कोटी रुपयांचा सर्व्हिस रोड व अंडरपास केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. यामुळे या परिसरातील विकासाला अधिक चालना …

Read More »

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त माणसं जपणारे व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस बुधवारी (दि.22) विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, अरुणशेठ भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या …

Read More »

विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा कृती समितीचा निर्णय

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील नाव देण्याच्या प्रस्तावामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करण्याचा व ओबीसी आरक्षणासंदर्भात आगरी समाजाचे प्रबोधन करण्याचा निर्णय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती, नवी मुंबईच्या बैठकीत सोमवारी (दि.20) घेण्यात आला. लोकनेते दि.बा. पाटील …

Read More »