Breaking News

महत्वाच्या बातम्या

कुत्र्यांना विष देऊन मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार तालुक्यातील आकूर्लि येथे कुत्र्यांना विष देऊन मारल्या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकुर्ली येथील दिनेश भोपी हे घराचे आजुबाजुच्या परिसरामध्ये फिरणार्‍या एक लाल रंगाचा व दुसरा सफेद रंगाच्या कुत्र्याला रोज खावु देत असत. 21 जून रोजी त्यांना घराच्या समोर एक लाल …

Read More »

कळंबुसरे येथे नऊ फुटी अजगरास जीवदान

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील एका घराच्या पडवीत रात्री भक्ष्य पकडण्याच्या शोधात आलेल्या आजगराला काशिनाथ खारपाटील, रमेश फोफेरकर, जगन्नाथ पाटील या निसर्ग संरक्षण सर्प मित्र संस्थेच्या सर्पमित्रांनी सदर ठिकाणी धाव घेवून या 9 फुटी अजगराच्या अलगद पकडले. यानंतर या विभागातील वनपाल यांच्या समक्ष इंद्रायणी डोंगरातील जंगलात मुक्त संचार …

Read More »

मोहोपाडा गणेशनगरमध्ये दोघांना कोरोना

मोहोपाडा : प्रतिनिधी  वासांबे (मोहोपाडा) हद्दीत मागील आठवड्यापासून पुन्हा कोरोनाने शिरकाव केला असून गुरुवारी गणेशनगरमध्ये दोघा पती-पत्नीचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. पती कामानिमित्त तळोजा येथे ये-जा करत होता. त्यातच कोरोना संसर्ग झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. सध्या वासांबे मोहोपाडा हद्दीत गणेशनगरमध्ये दोन, नविन पोसरी दोन,भटवाडी एक, रिस एक, रिसवाडी …

Read More »

घाऊक बाजारात भाज्या महागल्या

पनवेल : बातमीदार वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेले महिने घाऊक बाजारात दर स्थिर होते. मागील आठवडयात भाज्यांचे दर स्थिर होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रोज 500 ते 550 गाड्यांची आवक होत आहे. कोरोनामुळे बाजारात दाखल होणार्‍या  गाड्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. …

Read More »

रोजगार मेळाव्याकरिता रिक्त पदे अधिसूचित करण्याचे आवाहन

पनवेल : बातमीदार कोविड 19 मुळे जिल्ह्यातून कुशल, अकुशल कामगारांचे स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे खाजगी आस्थापनांमध्ये कुशल/अकुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत 29 व 30 जून 2020  या दोन दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत ऑनलाइन रोजगार मेळावा …

Read More »

नवी मुंबईत सात लाख रुपयांहून अधिक गुटख्याच्या साठ्यासह आरोपी गजाआड

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला व मानवी जिवीतास हानीकारक असलेला गुटखा व तत्सम पदार्थाची साठवणुक व विक्री करणार्‍या व्यक्तीच्या विरूध्द कारवाई करण्यात आली आहे. मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबईकडून सात लाख 15 हजारांच्या गुटख्यासह आरोपीला गजाआड करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त …

Read More »

शाळेत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत शहरातील कर्जत महिला मंडळाच्या विद्या विकास मंदिर शाळेत शासनाकडून मिळालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मुख्याध्यापिका मीना प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाठ्यपुस्तकांचे वितरण करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. या वेळी श्रद्धा मुंढेकर, स्नेहा गाडे, मेघा पिंगळे, प्रेमा पितळे, सर्व शिक्षक, सेविका आणि पालकवर्ग उपस्थित होता. ‘डिश …

Read More »

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत पोहचवावी

संजयआप्पा ढवळे यांची मागणी माणगाव ः प्रतिनिधी कोकणात निसर्ग चक्रीवादळ होऊन 22 दिवस झाले तरी अद्याप वादळातील नुकसानग्रस्तांपर्यंत राज्य सरकारची मदत पोहचलेली नाही. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त चिंतेत असून राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन गोरगरिबांना तत्काळ शासकीय मदत मिळण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केली …

Read More »

दासगाव येथे कंटेनर उलटला

केमिकल गळतीने घबराट महाड ः प्रतिनिधी जेएनपीटीवरून महाड औद्योगिक वसाहतीमधील आक्वाफार्म कारखान्यामध्ये एचईडीपी रसायन घेऊन जाणारा कंटेनर गुरुवारी (दि. 25) सकाळी दासगाव हद्दीत पलटी झाला. कंटेनरमधील ड्रम फुटल्याने रसायन गळती सुरू झाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कंटेनर रस्त्याच्या कडेला तीन दुकानांवर पलटी झाल्यामुळे या दुकानांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …

Read More »

मानव अधिकारी संघटनेतर्फे मास्कवाटप

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मानव अधिकारी संघटना मुरूड यांनी आतापर्यंत सुमारे 3000पेक्षा जास्त मास्क वाटपाचा निर्धार आणि मनाशी खूणगाठ बांधून पावले उचलली आहेत. यामध्ये मुरूड परिसरातील विविध सार्वजनिक कामकाजाची दुकाने, कार्यालये, भाजीमार्केट, घरोघरी व विविध ठिकाणी मास्क वाटप करण्यात आले. गुरुवारी भोगेश्वर पाखाडी येथे मानव अधिकारी संघटनेचे राष्ट्रीय …

Read More »