पनवेल ः प्रतिनिधी कोरोनाशी लढण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरत असताना भाजपचे कार्यकर्ते तुमच्यासोबत असल्याचा विश्वास येथील जनतेला द्या, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी (दि. 28) मुंबई आणि कोकण विभागाच्या भाजप व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करताना सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला करून …
Read More »तरुणीवर सामूहिक बलात्कार; वर्धा हादरले
वर्धा ः प्रतिनिधी नोकरीचे प्रलोभन दाखवून एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, सामूहिक बलात्काराच्या या घटनेने संपूर्ण वर्धा हादरले आहे. नागपूरसह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गुंडांना आणि गुन्हेगारांना पोलिसांचा …
Read More »पंढरपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; प्रदक्षिणा मार्ग होणार सील
पंढरपूर ः प्रतिनिधी आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत येण्यासाठी भाविकांना बंदी करण्यात आली आहे. तरीही प्रदक्षिणा मार्गावर रोज भाविक पंढरपुरात आढळून येत आहेत. यामुळे 29 जून ते 2 जुलै असे यात्रेचे चार दिवस पंढरपूर शहर व शहरालगतच्या पाच किमी परिसरात संचारबंदी लागू करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र आता प्रदक्षिणा …
Read More »पावसाअभावी रखडली भातलावणी; शेतकरी चिंताग्रस्त; मोठ्या पावसाची प्रतीक्षा
महाड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळादरम्यान राज्यात सुरू झालेला पाऊस केवळ सलग 10 दिवस पडला व त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. गेली काही दिवस दिवसभरात कुठेतरी एखादी पावसाची सर कोसळत आहे. त्यातच ढग दिसेनासे झाल्याने कडक ऊन पडत आहे. त्यामुळे शेतात पाणी नसल्याने शेतकर्यांची भातलावणी रखडली आहे. गेली काही दिवस महाडसह …
Read More »आजपासून कर्जतमध्ये कडकडीत बंद; केवळ वैद्यकीय सेवा राहणार सुरू
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यात कोरोनाचा ससेमिरा सुरूच आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापारीवर्गाने सोमवारपासून (दि. 29) तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमधून फक्त वैद्यकीय सुविधांना वगळण्यात आले आहे. तालुक्यात सुरुवातीला कोरोनाचा एकही …
Read More »सेना भवनाला कोरोनाचा विळखा; तीन कर्मचारी पॉझिटिव्ह
मुंबई ः प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर कोरोना पोहचल्यानंतर आता सेना भवनालाही कोरोनाचा विळखा बसला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भवनातील आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. कार्यालयात काम पाहणार्या काही कर्मचार्यांना कोरोनाची …
Read More »भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्यांना चोख प्रत्युत्तर; पंतप्रधानांचा ‘मन की बात’द्वारे देशवासीयांशी संवाद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारत मैत्री निभावतो, मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर देणेही आम्ही जाणतो. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्यांना लडाखमध्ये जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शत्रूला प्रत्युत्तर देताना आमचे जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश वंदन करीत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ आणि नतमस्तक आहे, …
Read More »महाकवी कालिदास, संस्कृत दिनानिमित्त ऑनलाइन कार्यक्रम
माणगाव : प्रतिनिधी आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा थोर संस्कृत नाटककार, साहित्यिक महाकवी कालिदास यांचे स्मरण म्हणून जयंती दिन व संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून या वर्षी लॉकडाऊनमुळे समाजमाध्यमातून ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. साहित्याचा मधुघट या साहित्यिक समूहातर्फे महाकवी कालिदास दिनानिमित्त ऑनलाइन अभिवादन …
Read More »गोविंदराव पाटील यांचा 100वा वाढदिवस उत्साहात
अलिबाग : प्रतिनिधी कुलाबा जिल्ह्याचे माजी संघचालक गोविंदराव पाटील यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर संघाचे रायगड विभाग संघचालक यशवंतराव पाटील, संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुख उदय शेवडे उपस्थित होते. या वेळी जयंतराव (मामा) टिळक, माजी प्रांत व्यवस्थाप्रमुख माधवराव भावे, माजी विभाग संघचालक दत्तोपंत साळुंके, जनकल्याण समितीचे कोकण …
Read More »नागोठण्यात आढळले दोन कोरोनाबाधित रुग्ण
नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचे स्वॅब तपासणीसाठी नेण्यात आले होते. यापैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरात कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या चारवर पोहचली आहे. या दोन व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे अधिकृतपणे कळल्यावर सकाळी येथील ग्रामपंचायतीकडून बाधित व्यक्तींच्या घराचा परिसर व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper