राज्यातील तीन चाकी महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद एव्हाना पुरेसे चव्हाट्यावर आले आहेत. जुन्या खाटांचे कुरकुरणे सरकारमधील भागीदार पक्षानेच जगजाहीर केले. अखेर बर्याच कुरकुरण्यानंतर नाराज काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक गुरुवारी पार पडली असली तरी तिघाडी काम बिघाडी हेच अखेर खरे ठरणार! सत्तेच्या लोभातून कुटिल डावपेच खेळून जनाधार नसतानाही सत्ता काबीज केल्यानंतर …
Read More »पनवेलमध्ये 68 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात 68 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला. तर 42 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 51 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 32 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 17 नवीन …
Read More »नव्या शैक्षणिक वर्षाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांत संभ्रम
पेण ः प्रतिनिधी एकीकडे कोरोनाचे महासंकट त्यात निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा आणि आर्थिक मंदी असताना खासगी शाळांने शिक्षणाचे ऑनलाइन धोरण स्वीकारत नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली आहे. शाळा कधी सुरू होईल हे माहीत नाही. मुलांना वर्गात कधी बसता येईल हेही माहीत नाही, परंतु पेण तालुक्यात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेने आपल्या शैक्षणिक …
Read More »निसर्ग चक्रीवादळात शैक्षणिक संस्थांचे नुकसान
माणगाव ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यासह कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसला. चक्रीवादळामध्ये माणगावसह तालुक्यातील लहान मोठ्या शैक्षणिक संस्थांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच अनेकांच्या घरांची पडझड झाली. याशिवाय आंबा, काजू, सुपारी, नारळ बागायतदारांचेही कोकणात मोठे नुकसान झाले आहे. माणगावसह तालुक्यातील लोकांना पावसाच्या तोंडावर निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामुळे तालुक्यातील वीजपुरवठा खंडित …
Read More »रायगड जिल्ह्यात 29 मिमी पावसाची नोंद
अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 29.49 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जूनपासून आज अखेर एकूण सरासरी 363.36 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार अलिबाग 2.00 मिमी, पेण 9.00 मिमी, मुरूड 24.00 मिमी, पनवेल 0.00 मिमी, उरण 2.50 मिमी, …
Read More »सौर पथदिव्यांनी उजळून निघाल्या बेकरेवाडीच्या वाटा
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बेकरेवाडी येथील रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. या सौर पथदिव्यांमुळे विजेची मोठी बचत होणार असून रात्रीच्या वेळी येथून अंधारातून वाट काढणार्या ग्रामस्थांना आधार मिळाला आहे. ग्रामपंचायतीने यासाठी 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून साधारण दोन लाख रुपयांची तरतूद केली आहे. …
Read More »नौदलाच्या पाणबुडीचे वॉल्व्ह चोरीला; गुन्हा दाखल
खोपोली ः प्रतिनिधी खालापुरातील एका कारखान्यातून सुमारे 80 लाखांचे वॉल्व्ह चोरीला गेल्याची घटना घडली. चोरी झालेल्या वॉल्व्हचा वापर नौदलाच्या पाणबुडीकरिता होत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. फिर्यादी पंडिता राध्या हिरेमठ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुंभिवली गावाच्या हद्दीत असलेल्या सीएफएफ फल्युईड कंट्रोल प्रा. लिमिटेड कारखान्यात मरीन रूममध्ये उघड्या दरवाज्यावाटे चोरट्याने प्रवेश करून …
Read More »उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज सुरू
पेण ः प्रतिनिधी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन व लायसन्सविषयक सर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. नेमून दिलेल्या कोट्याप्रमाणे अपॉइंटमेंट घेतली असेल व त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे कार्यालयात सादर केल्यानंतर कामकाज करण्यात येणार असल्याची माहिती पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिवहन कार्यालयातील …
Read More »वादळग्रस्तांसाठी सरसावले संघ स्वयंसेवक; आळीपाळीने श्रमदान; जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
माणगाव ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात थैमान घातले. अवघ्या तीन-चार तासांत ताशी 120 किलोमीटर वेगाने आलेला निसर्गाचा रौद्र झंझावात श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग, माणगाव, रोहा तालुक्यांची अपरिमित हानी करून गेला. या चक्रीवादळातील वादळग्रस्तांच्या मदतीला रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सरसावले असून मागील 17 दिवसांपासून विविध प्रकारे वादळग्रस्तांना मदतीचा हात …
Read More »उरण तालुक्यात बळीराजा सुखावला
उरण : प्रतिनिधी यंदा निसर्ग चक्रीवादळाने कोकण वासीयांना हदरवले. मात्र चक्रीवादळात झालेल्या पावसामुळे जून महिन्याच्या सुरुवातीलाच येथील शेतकर्यांनी भाताची पेरणी केल्याने अवघ्या काही दिवसात भाताचे दाणे रुजून रोपे जमिनीबाहेर निघाली. एक-दोन दिवसांच्या अंतराने उरण तालुक्यात पावसाच्या हलक्या-मोठ्या आलेल्या पावसाच्या सरींमुळे शेतीला पूरक असा पाऊस झाल्याने 10 ते 12 दिवसात शेतातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper