Breaking News

महत्वाच्या बातम्या

म्हसळ्यातील तीन गावठाणे गायब

महसुली लेखांत प्रचंड तफावत म्हसळा : प्रातिनिधी म्हसळा शहरातील तब्बल तीन गावठाणांबाबत महसुली अभिलेख व भूमी अभिलेख यामध्ये तफावत असल्याचे पुढे आले आहे. शहरात सात गावठणे असल्याचे महसुली लेखे उपलब्ध आहेत. तर तालुका भूमी अभिलेख खात्याच्या रेकॉर्डप्रमाणे  शहरात केवळ चार गावठाणांची नोंद आहे. त्यामुळे तीन गावठाणांचे महसुली लेख भूमी अभिलेख …

Read More »

रायगडात जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान

पोलीस ठाण्यांमध्ये महिलांची नेमणूक अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये रविवारी (दि. 8) दैनंदिनी कर्तव्याकरिता महिलांची नेमणूक करून रायगड पोलीस दलातर्फे जागतिक महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तसेच पोलीस ठाण्यांमध्ये नेमणुक असलेल्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे …

Read More »

द. आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची घोषणा; हार्दिक पांड्याचे पुनरागमन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 मार्चपासून सुरू होणार्‍या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी (दि. 7) घोषणा करण्यात आली. 29 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएलआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. 15 सदस्यीय संघात सुनील जोशी यांच्या निवड समितीने हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांना …

Read More »

उदय देवरे ’विहान श्री’चा मानकरी

नागोठणे : प्रतिनिधी विहान बॉडी केअरच्या वतीने ’विहान श्री 2020’ ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा येथील जोगेश्वरीमाता देवस्थानच्या रंगमंचावर शनिवारी (दि. 7) सायंकाळी पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच सुरेश जैन, रोहे तालुका भाजप अध्यक्ष सोपान जांबेकर, पिगोंडे ग्रामपंचायत सरपंच संतोष …

Read More »

महिला टी-20 विश्वचषक; ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्वविजेता; भारताचा 85 धावांनी पराभव

मेलबर्न : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताला हरवून टी-20 विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांची शतकी भागीदारी आणि गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषक उंचावला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: ठोकून काढले. ऑस्ट्रेलियाने भारताला 20 षटकांत 185 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर भारताला …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे उद्घाटन

महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या नगरसेवक निधीतून चावडी आणि शौचालय पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल सेक्टर 8, 5, 7 आणि 4 येथील गार्डनमध्ये विविध कामे करण्यात आली होती. या कामांचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी …

Read More »

महिला दिनी कोण उंचावणार विश्वचषक?

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज फायनल मेलबर्न : वृत्तसंस्थामहिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 8) भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या लढतीत कोणता संघ विश्वचषक जिंकून महिला दिन जल्लोषात साजरा करणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. अंतिम लढत मेलबर्न मैदानावर रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत चार वेळा …

Read More »

रोह्यात अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार

आरोपीला मध्यरात्री अटक रोहे ः प्रतिनिधी उदरनिर्वाहासाठी रोह्यात आलेल्या एका कुटुंबातील 11 वर्षीय गतिमंद मुलीवर 55 वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना अष्टमी येथे समोर आली आहे. या घटनेची वेळीच दखल न घेतल्याने नागरिकांनी एकत्र येत रोहा पोलीस ठाण्यात संताप व्यक्त केला. त्यानंतर अखेर आरोपीविरोधात शनिवारी मध्यरात्री तब्बल आठ दिवसांनंतर …

Read More »

द्रुतगती मार्गावर एसटीचा अपघात, सहा जखमी

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाक्यावर  ठाणे-पारनेर एसटी बसला शनिवारी (दि. 7) पहाटे पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले. एसटी चालक भाऊसाहेब गोरक्षनाथ शिरसाठ (वय 33, रा. बीड) यांनी खालापूर टोल नाक्यावर एसटीचा वेग कमी केला. त्याचवेळेस पाठीमागून वेगात आलेला …

Read More »

खोपोलीत महिलांकडून महिलांचे कौतुक

सहजसेवा फाऊंडेशनचा महिला दिन उत्साहात खालापूर : प्रतिनिधी महिला दिनानिमित्ताने सहजसेवा फाऊंडेशनतर्फे खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कार्यरत असणार्‍या महिलांचा शाल, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिलांनी महिलांचा केलेला गौरव मनास भावून जातो, जबाबदारीने कार्य करणार्‍या महिलांना समाजाने अधिक पुढे येण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती वैशाली जाधव …

Read More »