पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेचा 2020-21 चा 54 कोटी तीन लाख 70 हजार 10 रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 28) विशेष सभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मालमत्ताकर व पाणीपट्टीत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या पेण नगर परिषदेच्या या विशेष सभेला …
Read More »पेण तालुक्यातील कालव्यांची दुरुस्ती करा
आमदार रविशेठ पाटील यांची विधानसभेत मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील हेटवणे धरणातून शेती सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी नादुरुस्त कालव्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाया जात असून, या नादुरुस्त कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी विधानसभेत केली. पेण तालुक्यातील हेटवणे धरणातील पाणी सिंचनासाठी सोडले जाते. मात्र नादुरुस्त कालव्यांमुळे लाखो लिटर …
Read More »एलईडी मासेमारी छोट्या मच्छिमारांच्या मुळावर
कोकणाला 720 किलोमीटरचा विशाल सागरी किनारा लाभला आहे. या विशाल अशा सागरी किनार्यावर मासेमारी करणार्या कोळी समाजाची वस्ती आहे. सध्या खोल समुद्रात मासेमारी करताना माशांची आवक घटल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाच्या गस्ती नौका या 12 नॉटिकल क्षेत्राच्या बाहेर जाऊ शकत नाही. याचा मोठ्या होड्या असणारे मच्छिमार फायदा घेत आहेत. ते …
Read More »प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रदान
संघर्षाच्या लोकनायकाचा गौरव : ना. दिलीप वळसे-पाटील यांचे प्रतिपादन पनवेल : हरेश साठेप्रा. डॉ. एन. डी. पाटीलसाहेबांचे जीवन म्हणजे अखंड संघर्ष असून, हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. चळवळीचे शास्त्र आणि शस्त्र स्वतःच्या कृतीतून विकसित करणारे विधायक संघर्षाचे लोकनायक पाटील सरांना जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव प्रदान करताना अतिशय आनंद होत …
Read More »हम भी है जोश में!
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सध्या जबरदस्त प्रदर्शन करीत आहे. सलामीला यजमान ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर बांगलादेश व न्यूझीलंडला नमवून साखळीतील चौथ्या व अखेरच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचे माफक आव्हान सात विकेट्स राखून सहज पार केले. या सामन्यात भारताचे पारडे जड होते आणि संघाने अपेक्षेप्रमाणे विजय साकारला. खरंतर याआधीचे सामने तगड्या …
Read More »स्मरण थोर निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारींचे
निरूपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे नारायण विष्णू धर्माधिकारी उर्फ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची आज जयंती. 1 मार्च 1922 रोजी जन्मलेले नानासाहेब समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य केले. नानासाहेबांच्या वडिलांचा व्यवसाय हस्तसामुद्रिक (हात पाहून भविष्य सांगणे) हा होता. धर्माधिकार्यांच्या घराण्यात 400 …
Read More »मराठीचा हुंकार आणि पुनश्च स्वातंत्र्यवीर सावरकर!
2020चा फेब्रुवारी महिना हा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. मुळात या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आले. 29 फेब्रुवारी ही तारीख साधारणपणे चार वर्षांनी येते. हा जन्मदिवस फार कमी लोकांचा आहे. एकेकाळच्या काँग्रेसच्या अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणार्या इंदिरा गांधी यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत टक्कर देणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते मोरारजी देसाई यांचा जन्मदिवस. तसं …
Read More »प्रयागराजमध्ये पंतप्रधान मोदींनी केले तीन जागतिक विक्रम
प्रयागराज : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 29) केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रयागराज येथील एका भव्य कार्यक्रमात उपस्थित राहिले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी 26 हजार 791 दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त उपकरणांचे वाटप केले. या वेळी पंतप्रधानांनी तीन जागतिक विक्रमदेखील केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांना सन्मान …
Read More »गोठा, मोळ्या जळून खाक
कर्जत : बातमीदार तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील माले गावातील शेतकर्याच्या शेतावर असलेला गुरांचा गोठा आणि साठवून ठेवलेला चारा गुरुवारी (दि. 27) सायंकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माले गावातील शेतकरी हरिचंद्र जानू हिसालगे यांची शेती गावापासून लांब आहे. त्यामुळे …
Read More »आगीत घर भस्मसात
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील नेराव येथील एका घराला गुरुवारी (दि. 27) रात्री आग लागली. या आगीत हे घर जळून खाक झाल्याने शेतकर्याचे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर घराची सावली हरपल्याने घरमालकावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. नेराव गावातील तुकाराम कोरपे यांच्या राहत्या घराला गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास आग …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper