पेण : प्रतिनिधी सीएफआय, बीएनवाय, एम्पॉवर आणि हमरापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी हमरापूर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात एकूण 120 किलो प्लास्टिक गोळा करण्यात आले. त्यानंतर गावात स्वच्छता व प्लास्टिक बंदीबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ.किशोर देशमुख यांनी प्लास्टिक आपल्यासाठी किती धोकादायक आहे याची सविस्तर माहिती दिली. आयबीएनच्या …
Read More »अखेर शेतकर्यांचा मार्ग झाला मोकळा; भिवपुरी रोड स्टेशनबाहेरील रेलिंग काढली; पाण्याची वाटही खुली
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेर कर्जत दिशेला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते, ते पाणी वाहून नेणारी मार्गिका सोमवारी (दि. 17) खुली करण्यात आली. तसेच लोखंडी रेलिंग लावून अडविण्यात आलेला शेतकर्यांचा रस्तादेखील मोकळा करण्यात आला. गेली दोन वर्षे पावसाळ्यात भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेर कर्जत दिशेकडे मोठ्या …
Read More »कळंब येथील एटीएम केंद्र दोन महिन्यांनंतर पुन्हा सुरू
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कळंब येथील देना बँकेचे एटीम केंद्र मागील दोन तीन महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे या भागातील एटीम कार्ड धारकांची, ग्राहकांची मोठी गैरसोय झाली होती. अखेर ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत उशिर का होईना, हे एटीएम केंद्र सुरु करण्यात आले आहे. कर्जत शहरापासून दूर असलेल्या कळंब गावात एकमेव असलेली …
Read More »विहिरीत पडलेल्या भेकराला जीवदान
नागोठणे : प्रतिनिधी विहिरीत पडलेल्या भेकराला दोन स्थानिक तरुणांनी जीवदान दिल्याची घटना शनिवारी (दि. 15) सायंकाळी सुधागड तालुक्यातील कुंभारशेत गावात घडली. नागोठणे विभागाच्या वन कर्मचार्यांनी या भेकरीला घनदाट जंगलात सोडून दिले. कुंभारशेत गावातील विहिरीत शनिवारी सायंकाळी एक भेकर पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. दोन स्थानिक तरुणांनी तातडीने भेकराला विहिरीबाहेर काढले. ग्रामस्थांनी …
Read More »पनवेल तालुक्यात क्रिकेट स्पर्धांची धूम
पनवेल : रामप्रहर वृत्तविहिघर येथे ओम साई दोस्ती क्रिकेट संघाच्या वतीने आमदार चषक 2020 आणि कुंडेवहाळ येथे निकेश वास्कर स्पोर्ट्स असोसिएशनद्वारे उरण, पनवेल आमदार चषक आणि सरपंच चषक 2020चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष …
Read More »चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राला अमेरिकेत पुरस्कार
कर्जत : बातमीदार पेस्टल जर्नल हे चित्रकलेच्या जगतातील अत्यंत प्रसिद्ध असे मॅगझिन अमेरिकेतून प्रसिद्ध होते. त्या मासिकात कर्जत येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांचे चित्र प्रसिद्ध झाले होते. पेस्टल माध्यमातील या चित्राला अमेरिकेत पुरस्कार जाहीर झाला आहे. पेस्टल जर्नल हे चित्रकलेवर आधारित पुस्तक गेल्या 21 वर्षापासून प्रकाशित होत आहे. …
Read More »झारखंडच्या पुंडीची प्रशिक्षणासाठी निवड
रांची : वृत्तसंस्थाझारखंडच्या नक्षलग्रस्त भागातील आणि गरीब कुटुंबातील पुंडी सारु या मुलीने सर्व अडचणींवर मात करीत हॉकीपटू बनण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकलं आहे. अमेरिकन दुतावास आणि शक्तिवाहिनी या सामाजिक संस्थेतर्फे झारखंडमधील मुलींसाठी हॉकी कम लिडरशीप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यातील 107 मुलींमधून पाच जणींची अमेरिकत प्रशिक्षणासाठी निवड …
Read More »‘सीकेटी’त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
पनवेल ः प्रतिनिधी : खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या माध्यमातून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस सोमवारी (दि. 17) इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे व्हाइस चान्सलर ए. बी. पंडित यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सीकेटी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या माध्यमातून …
Read More »तिसर्या सामन्यातही धावांची बरसात
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका इंग्लंडने जिंकली सेंच्युरियन : वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेला तिसरा ट्वेन्टी-20 सामनादेखील थरारक झाला. प्रथम फलंदाजी करीत आफ्रिकेने इंग्लडसमोर 223 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने कर्णधार इयान मॉर्गनच्या वादळी खेळीच्या जोरावर पाच चेंडू राखून विजय मिळवला आणि मालिकाही 2-1ने जिंकली. मॉर्गनच सामनावीर आणि मालिकावीर …
Read More »सामना होण्याआधीच मुंबईची चेन्नईवर सरशी
मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या तेराव्या हंगामाचे बिगूल अखेरीस वाजले असून, गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात 29 मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच मुंबईने विक्रमी कामगिरी करीत चेन्नईला मागे टाकले आहे. आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात खेळण्याची मुंबई इंडियन्सची ही सातवी वेळ ठरणार आहे. याआधी कोलकाता नाईट रायडर्स …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper