खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि नवनिमार्ण सेवाभावी संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच कोकण आगरी-कोळी महोत्सवाचे 7 ते 16 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी रविवारी (दि. 16) भेट दिली. या वेळी पनवेल महापालिकेचे …
Read More »भाजपने सांभाळले म्हणून ‘ते’ इथवर पोहोचले; भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची शिवसेनेवर जहरी टीका
मुंबई : प्रतिनिधी भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून ’ते’ इथपर्यंत पोहचले असल्याची जहरी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेत ते बोलत होते. या वेळी सोमय्या यांनी आपल्या भाषणाची सुरवातच शिवसेनेवर टीका करून केली. तसेच ते पुढे म्हणाले की, …
Read More »अबॅकस स्पर्धेत जयेशचे यश
मोहोपाडा : प्रतिनिधी इंटरनॅशनल अबॅकस चॅम्पियनशिप आयोजित स्पर्धेत चौकच्या जयेश समीर देशमुख याने बाजी मारली असून त्याचे अभिनंदन होत आहे. जयेश समीर देशमुख हा रिलायन्स फाऊंडेशन शाळेत पाचवीला आहे. सन 2019-20 अबॅकस व वेदिक या गणित विषयाच्या अभ्यासक्रमाची स्पर्धा पुणे येथील कर्मवीर भाऊराव पाटील, भारती विद्यापीठ कात्रज येथे घेण्यात आली. …
Read More »सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक
कामोठे : रामप्रहर वृत्त जगतगुरु संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांची जयंती शनिवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात कामोठे येथे साजरी करण्यात आली. या वेळी संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची कामोठे शहरात रथातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य सभापती, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते पुजन …
Read More »खांदा कॉलनीत शिवजयंती उत्सव
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ व देवी आंबा माता चरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव बुधवारी (दि. 19) खांदा कॉलनी येथील सेक्टर 13च्या देवी आंबा माता मंदिरात साजरा करण्यात येणार आहे. प्रथम सकाळी 10 वाजता छत्रपती …
Read More »राष्ट्रीय मायक्रोबायो ऑलिम्पियाड स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाचे घवघवीत यश; सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या संघाने पटकाविला प्रथम क्रमांक
औरंगाबाद : प्रतिनिधी 19व्या राष्ट्रीय मायक्रोबायो-ऑलिम्पियाड स्पर्धेत टीवायबीएससी स्तरावर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्यासंघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघात जुवेरिया राऊत, अक्सा देशमुख व हेतल पटेल यांचा सहभाग होता. नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाने द्वितीय, व मुंबईच्या मिठीबाई …
Read More »रस्ता खोदल्याने गावांचा संपर्क तुटला; काळणवाडीतील ग्रामस्थ आक्रमक
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परीसरातील चांभार्लीहून काळणवाडीकडे जाणारा रस्ता खोदल्याने दोन हजार घरांचा संपर्क तुटला असून शासनाच्या या प्रकाराविरोधात शेकडो ग्रामस्थांनी रस्त्यावर ठाण मांडून आपली नाराजी व्यक्त केली. कालणवाडी, रिसवाडी व आसपासच्या सोसायट्यांकडे जाणारा रस्ताचे खोदकाम होणार असा असे हरेष उतेकर यांनी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे कळविताच ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश खारकर …
Read More »कराटे स्पर्धेत ‘सीकेटी’चे यश
पनवेल : रामप्रहर वृत्त मध्यप्रदेश राज्यात नुकत्याच झालेल्या नवव्या गोशिनरियू राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीपमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. याबद्दल त्यांचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले.सीकेटी विद्यालयाच्या अर्थव जाधव आणि सम्यक जाधव यांनी कराटे …
Read More »‘केएमए’च्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
कर्जत : बातमीदार कर्जत मेडिकल असोसिएशन (केएमए)च्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावर या स्पर्धेला रविवारी (दि. 16) सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन रायगड जि. प. सदस्य आणि कोतवालवाडी ट्रस्टच्या व्यवस्थापकीय संचालक अनसूया पादीर यांच्या हस्ते करण्यात …
Read More »मुंबई-चेन्नईत रंगणार सलामीची लढत
मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या तेराव्या हंगामाचे बिगुल अखेरीस वाजलेले आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी काही संघानी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात 29 मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे. इएसपीएनक्रिकइन्फो संकेतस्थळाने या संदर्भातील वृत्त दिले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper