Breaking News

महत्वाच्या बातम्या

निवृत्त कर्मचार्यांचे खोपोली नगरपालिकेसमोर उपोषण

खोपोली : प्रतिनिधी येथील नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी पी. के. देवदासन व अशोक गायकवाड यांनी निवृत्तीनंतरचा पगार व फायदे मिळावे यासाठी खोपोली नगरपालिका कार्यालयासमोर शुक्रवार (दि. 24)पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर 7 महिने झाले तरी सातव्या आयोगापोटी मिळणारी थकबाकी, रजेचा पगार, ग्रॅज्युइटीची थकबाकी, पेन्शन विक्रीची रक्कम अद्याप मिळाली …

Read More »

…तर ‘जेएसडब्ल्यू’विरोधात आंदोलन

आमदार रविशेठ पाटील यांचा कंपनी प्रशासनाला इशारा पेण : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनीने स्थानिकांबाबत निर्माण केलेल्या प्रश्नांकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यात कंपनी व्यवस्थापनाने सुधारणा केली नाही तर कंपनीविरोधात आंदोलन करू, मोर्चा आणू, कंपनीचे गेट बंद करू असा इशारा पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे दिला. जेएसडब्ल्यू कंपनी बाधित कार्यकर्त्यांची …

Read More »

श्रद्धा कांबळे एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सफाई कर्मचारी शरद सहदेव कांबळे यांची सुकन्या श्रद्धा शरद कांबळे ही नुकत्याच लागलेल्या एमबीबीएस परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण झाली असून डॉक्टर झाल्याने महापालिका कर्मचार्‍यांमध्ये आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मूळचे पनवेल शहराजवळील वडघर गावचे रहिवासी असलेले शरद कांबळे एकगरीब कुटुंबात जन्माला आले आर्थिक परिस्थिती नसल्याने …

Read More »

जेएनपीटीची गोलमेज चर्चा

जालना ड्राय पोर्टची रणनीती आखण्यासाठी यशस्वी बैठक उरण : वार्ताहर जालना ड्राय पोर्टच्या विकास आराखड्याची रणनीती निश्चित करण्याच्या उद्देशाने जेएनपीटीचे अध्यक्ष आयएएस संजय सेठी यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच उच्चस्तरीय बैठक झाली. जेएनपीटीद्वारे प्रस्तावित ड्राय पोर्ट (सुके बंदर) आणि औद्योगिक पार्क (ज्याला मल्टीमोडल लॉजिस्टीक्स पार्कही संबोधले जाते)च्या विकासाची योजना असून हे पार्क …

Read More »

भरत गुरव यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

नागोठणे : प्रतिनिधीराज्य क्रीडा व युवक क्रीडा संचालनालय, रायगड जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार नागोठण्यातील भरत प्रल्हाद गुरव यांना जाहीर झाला आहे. यापूर्वी गुरव यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गुणवंत खेळाडू व रायगड जिल्हा परिषदेकडून रायगडभूषण पुरस्कार मिळाला आहे. क्रीडा क्षेत्रात …

Read More »

ऑस्ट्रेलियन ओपनमधून सेरेना विल्यम्स आऊट

मेलबर्न : वृत्तसंस्थासात वेळा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकाविणारे अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सला तिसर्‍या फेरीत पराभवाचा धक्का बसला. चीनच्या 28 वर्षीय वांग कियांगने सेरेनाचा पराभव केला आणि स्पर्धेतील पहिल्या धक्कादायक विजयाची नोंद केली.तब्बल 23 ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणार्‍या सेरेनाचा तिसर्‍या फेरीत कियांगने 6-4, 7-6(2-7), 7-5 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत 29व्या …

Read More »

पनवेल मनपाच्या पोदी शाळेत क्रीडा महोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने पोदी (नवीन पनवेल) शाळेत क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आले होता. या महोत्सवातील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.महोत्सवाचे उद्घाटन नगरसेवक व शाळेचे माजी विद्यार्थी अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी मोबाइल गेम खेळण्याऐवजी मैदानात जाऊन खेळ खेळून …

Read More »

नवीन पनवेलमध्ये क्रीडा स्पर्धेची रंगत

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन शुक्रवारी (दि. 23) करण्यात आले होते. नवीन पनवेल येथील के.आ. बांठिया शाळेत आयोजित या उपक्रमास पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.नवीन पनवेल येथील …

Read More »

‘विराटसेने’चा परदेशातही डंका

पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर शानदार विजय ऑकलंड : वृत्तसंस्थासलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 204 धावांचे आव्हान भारताने 6 गडी राखत पूर्ण केले. राहुलने या सामन्यात 56, तर कोहलीने 45 धावांची …

Read More »

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पंकजा मुंडेंचे उपोषण

जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष मुंबई ः प्रतिनिधीकायम दुष्काळाशी सामना करीत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नासाठी भाजपच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडे उपोषण करणार आहेत. सोमवारी (दि. 27) सकाळी 10 वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 23) …

Read More »