Breaking News

महत्वाच्या बातम्या

पाताळगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात

जलसंपदेसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका व खालापूर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजना पाताळगंगा नदीवर अवलंबून आहेत. याच नदीवरील पाण्यावर येथील औद्योगिक क्षेत्रही अवलंबून आहे. मात्र खालापूर तालुक्याची भाग्यरेषा असलेली ही पाताळगंगा नदी    प्रदूषणामुळे बेजार झाली आहे. हे प्रदूषण दिवसागणिक वाढत असल्याने या नदीतील जलसंपदा व नदीच्या …

Read More »

हिवाळ्यातील शरीराची काळजी

नवे वर्ष सुरू होऊन पहिला पंधरवडा संपला. नवीन वर्षामध्ये अनेकांनी वेगवेगळे संकल्प केले असतात. त्यात आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवण्याकरिता अनेक गोष्टींचा ऊहापोह केला जातो. सध्या हिवाळा सुरू असून, गुलाबी थंडीत शरीरातही अनेक बदल घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक ठरते. हिवाळा हा ऋतू जसा व्यायामाला उत्तम, तसाच तो …

Read More »

आरोग्यम धनसंपदा

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात जो तो यंत्रवत काम करीत आहे. कामाचा प्रचंड रेटा आणि जीवघेणी स्पर्धा यामुळे धावपळ होणे स्वाभाविकच आहे, पण कळत-नकळत मानव आपल्या आरोग्याकडे काहीसा दुर्लक्ष करू लागला आहे, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्त असणे असे नव्हे. आजच्या व्यस्त जीवनात स्वत:च्या …

Read More »

डॉ. विजय सूर्यवंशी पीएमपी अध्यक्षपदी

पुणे : प्रतिनिधीपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. गुंडे यांच्याकडे पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नयना गुंडे यांनी दि. 12 फेब्रुवारी 2018 रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदाचा …

Read More »

‘सीएए’चा भारतीयांना धोका नाही

सूर्यकांत केळकर यांचे प्रतिपादन नागोठणे : प्रतिनिधीनागरिकत्व सुधारणा कायद्याचा (सी.ए.ए.) भारतीय नागरिकांना कोणताही धोका नसल्याचे प्रतिपादन भारत रक्षा मंचचे  राष्ट्रीय संघटन मंत्री सूर्यकांत केळकर यांनी येथील हिंदू जन जागृती मंच, नागोठणे विभागाची नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठींबा देण्यासाठी येथील ग्रामदैवत श्री. जोगेश्वरीमाता मंदिराच्या प्रांगणात बुधवारी  जाहीर सभेत स्पष्ट  केले. या सभेला …

Read More »

शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन!

पनवेल ः प्रतिनिधीउरण तालुक्यातील जासई येथे शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांकरिता जानेवारी 1984 साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन उभे केले होते. गुरुवारी (दि. 16) या लढ्याला 36 वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी याच दिवशी या लढ्यात हुतात्मा झालेल्या शेतकर्‍यांना अभिवादन करण्यात येते. माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

महाआघाडी सरकार आपोआप पडेल

चंद्रकांत पाटील यांचे भाकीत पुणे : प्रतिनिधीराज्यात भीषण परिस्थिती आहे. कोण काय बोलतोय काहीच कळत नाही. त्यामुळे राज्यातील महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजप कोणतेही प्रयत्न करणार नाही. ते आपोआप पडेल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले आहे.इंदिरा गांधी व करीम लाला यांच्या भेटीबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या …

Read More »

महाराजस्व अभियान पोलादपूर तालुक्यात उपयुक्त

रायगड जिल्हाधिकार्‍यांनी महाराजस्व अभियानांतर्गत सर्वसामान्य जनता, शेतकरी, त्यांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने तसेच महसूल, प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या अनुषंगाने 23 डिसेंबर 2019 रोजीच्या परिपत्रकान्वये रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गावनिहाय चावडी वाचन, अदालत, नोंदी, सत्यपत्रिकाच्या नोंदी, गवंड, रस्ते, मुक्ती तसेच इतर प्रलंबित नोंदी अद्ययावत करण्यासाठी …

Read More »

उंच माझा झोका…

काही लंडन आय हा चक्री पाळणा गेली वीस वर्षे सुरू आहे. या चक्री पाळण्याच्या उभारणीसाठी 1999 साली ब्रिटिश सरकारची तब्बल 8 कोटी पौंड इतकी महाप्रचंड रक्कम खर्ची पडली होती याचे भान आपल्या राज्यकर्त्यांना असायला हवे. इतक्या मोठ्या गुंतवणुकीतून आकर्षक पर्यटन स्थळ उभे राहिलही परंतु त्या आधी मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा नष्ट …

Read More »

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळांतर्गत रायगड जिल्हाध्यक्षपदी हभप पुंडलिक महाराज फडके

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील मोहो गावातील हभप पुंडलिक महाराज फडके यांची महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळांतर्गत रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हभप प्रकाशजी महाराज जवंजाळ, आळंदी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर विश्वस्त व महामंडळाचे सचिव हभप …

Read More »