दोन-चार आकर्षक घोषणा करून झाल्यावर पुढे वर्षभर मराठी भाषेची दैन्यावस्था कायम राहते. मराठी भाषेचे गुणगान गाणारे डझनावारी रंगारंग कार्यक्रम आणि सत्कार समारंभांचे हारतुरे एवढे सोपस्कार पार पडले की मराठी भाषेची पुरेशी सेवा घडते असा काहींचा समज असतो. मराठी भाषेच्या संदर्भातील ठाकरे सरकारच्या नव्या घोषणा केवळ अळवावरचे पाणी ठरू नये. मराठीपणाचा …
Read More »मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखिका नीलाताई उपाध्ये लिखित ‘चुनाभट्ट्यांचा इतिहास आणि आगरी समाज’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी इतिहास संशोधन परिषदेचे रवींद्र लाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तसेच दशरथ पाटील, जे. डी. तांडेल, नरेंद्र वाबळे, राहुल चेंबूरकर, प्रा. डॉ. अलका मटकर, …
Read More »निधी चौधरी रायगडच्या नव्या जिल्हाधिकारी
अलिबाग : प्रतिनिधी निधी चौधरी यांनी रायगड जिल्हाधिकारीपदाचा पदभार बुधवारी (दि. 22) स्वीकारला. चौधरी या 2012च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. चौधरी यांनी मुंबई महापालिकेत उपायुक्त, उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी त्यांनी रायगड जिल्ह्यात पेण प्रांताधिकारी म्हणून कामकाज हाताळले …
Read More »महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त, भाजपच्या मागणीला यश
मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेश आणि हरियाणापाठोपाठ आता महाराष्ट्रातही ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 22) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नांना यश आले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा ‘तान्हाजी’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी …
Read More »‘व्योममित्रा’ची पहिली झलक जगासमोर, भारत मानवी रोबोट अवकाशात पाठविणार
बंगळुरू : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाकांक्षी गगनयान मिशन पूर्ण करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) कंबर कसली आहे. या मिशन अंतर्गत 2022मध्ये भारतीय अवकाशवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. भारताची ही पहिलीच मानवी अवकाश मोहीम असल्यामुळे त्यात धोकेसुद्धा तितकेच आहेत. त्यामुळे इस्रो कुठलीही जोखीम पत्करणार नाही. मानवी अवकाशवीरांना पाठवण्याआधी …
Read More »रिस हद्दीत स्त्रीचा सांगाडा
मोहोपाडा, खालापूर : प्रतिनिधी रिस-कांबे येथील श्री वैष्णोनगरीच्या काही अंतरावर असलेल्या कातरीच्या माळावर एका स्त्रीचा सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात महिलेला निर्मनुष्य जागेत जीवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत तिथेच टाकण्यात आल्याचे दिसते. यासंदर्भात रसायनी पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे, सहाय्यक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील पथकासह …
Read More »अखेर मुंबईत ‘नाइट लाइफ’ला मंजुरी, ही तर ‘किलिंग लाइफ’; भाजपची जोरदार टीका
मुंबई : प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत येत्या 27 जानेवारीपासून ’नाइट लाइफ’ सुरू होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या या संकल्पनेला राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. 22) मंजुरी दिली. या निर्णयावर भाजपने टीका केली आहे. ही नाइट लाइफ नाही तर ‘किलिंग लाइफ’ असल्याचे सांगत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी …
Read More »आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी! आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेल मनपा कर्मचार्यांना ग्वाही; लाँग मार्चला पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्त आपण सारे जण पनवेल महापालिका झाल्यापासून आपला परिसर स्वच्छ असावा, पालिकेचा परिसर स्वच्छ असावा यासाठी धडपडत असताना तुम्हाला आपल्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे यासारखे दुर्दैव नाही. तुम्ही उभारलेला लढा योग्य असून, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »‘सीएए’ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात (सीएए) दाखल झालेल्या 144 याचिकांवर बुधवारी (दि. 22) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या ‘सीसीए’ला स्थगिती देण्याबाबत कोणताही आदेश देण्यास कोर्टाने नकार दिला. या कायद्यासंदर्भात कोणत्याही प्रकरणांवर सुनावणी न घेण्याचे आदेशही सर्व उच्च न्यायालयांना देण्यात आले आहेत. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. अब्दुल नझीर, न्या. …
Read More »इंटरनेटअभावी पोस्टातील सेवा कुचकामी
पोलादपूर : प्रतिनिधी भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) इंटरनेट सेवा गेल्या आठवड्यापासून बंद असल्याने पोलादपूर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना सेवा मिळत नाही. त्यामुळे या पोस्टातील कर्मचार्यांना असंख्य ग्राहकांची नाराजी ओढवून घ्यावी लागत आहे. पोलादपूर पोस्ट ऑफिसमध्ये 15 जानेवारीपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा अनियमित सुरू असून अनेकदा ही सुविधा ठप्प होत आहे. त्यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper