Breaking News

महत्वाच्या बातम्या

कर्जत :  पोलीस हवालदार कृष्णा जानू वाघमारे यांनी आपल्या समाजाविषयी लिहिलेल्या ‘मी कातकरी‘ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कर्जतमधील सीबीसी हॉलमध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला पोलीस निरीक्षक अरुण भोर, सहाय्यक निरीक्षक जोगदंड, उपनिरीक्षक देठे, महिला समाजसेवक ठमाबाई पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी …

Read More »

प्रधान महाविद्यालयाचा प्रकल्प विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र

नागोठणे : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठ आयोजित रायगड जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा खालापुरातील विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आली. स्पर्धेत जिल्ह्यातील 197  प्रकल्प सहभागी झाले होते व त्यात नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान  महाविद्यालयातील 8 प्रकल्पासह 18 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यातील एक प्रकल्प विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. प्रा. चैत्राली पाटील यांच्या …

Read More »

हाळ गावात स्वच्छतेचा बोजवारा; ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका

खोपोली : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानाला हाळ ग्रामपंचायतीने असहकार पुकारला, अशी परिस्थिती गावात असून सर्वत्र कचर्‍याचे ढिग पडले आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत महड देवस्थानालगत हाळ ग्रुप ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत हद्दीत असणार्‍या खैरा लोकवस्तीत सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार …

Read More »

काशीद व मुरुडमध्ये पर्यटकांचा महापूर

मुरुड : प्रतिनिधी सलग आठ दिवस नाताळाची सुट्टी शाळेला पडल्याने  पर्यटकांनी मुरुड व काशीद समुद्रकिनारी तुफान गर्दी केली आहे. सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी बुधवारी (दि. 25) सकाळपासूनच राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, आगरदांडा जेट्टी तसेच दिघी येथून पर्यटकांनी गर्दी केली होती. किल्ल्यावर जाण्याकरिता बोटीत बसण्यासाठी पर्यटकांना किमान एक ते दिड …

Read More »

थंडीची चाहूल लागताच मेजवान्यांना बहर

वालाऐवजी पावट्याच्या शेंगा टाकून ‘पोपटी’चा बेत पनवेल : बातमीदार थंडीची चाहूल लागल्यानंतर सध्या खवय्यांना वालाच्या शेंगाच्या ‘पोपटी’चेही वेध लागले असतात. मात्र यंदा पाऊस लांबल्याने वालाच्या शेंगांचे उत्पादनच आले नसल्याने पनवेल तालुक्यातील पोपटी पावट्याच्या शेंगावर साजरी केली जात आहे. अर्थात पोपटीत वालाच्या शेंगांची चव पावट्यांमध्ये नसल्याची बाब अनेकांनी नोंदवली. वालाच्या शेंगासह …

Read More »

उद्योगधंद्यांच्या माहितीची मार्गदर्शक पुस्तिका

तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांचा उपक्रम पनवेल : वार्ताहर तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यांच्या माहितीची मार्गदर्शक पुस्तिका बनविण्याचे काम तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सदर पुस्तिकेचा फायदा तेथील मालक, कामगार वर्गासह सर्वसामान्य लोकांना होणार असल्याने सर्वांनी या उपक्रमाचे …

Read More »

अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

उरण : वार्ताहर देशाचे थोर सुपुत्र माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उरण तालुका भाजपच्या वतीने उरण नगरपरिषद येथे बुधवारी (दि. 25) साजरी करण्यात आली. वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यांत आले. या प्रसंगी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, भाजपा शहर अध्यक्ष …

Read More »

राजे प्रतिष्ठानच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक तथा साप्ताहिक कोकण संध्याचे मुख्य संपादक केवल महाडिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनी येथे राजे प्रतिष्ठानच्या नूतन कार्यालयाचा उदघाटन राजे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई यांच्या हस्ते …

Read More »

शिवाजी विद्यालयात रंगले स्नेहसंमेलन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्त उरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ जल्लोषात साजरा झाला. विद्यालयाचे आधारस्तंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात …

Read More »

हैं तय्यार हम!

श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडशी भिडणार टीम इंडिया मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघासाठी 2019 वर्ष शानदार ठरले. वर्ल्ड कपमधील एका सामन्याचा अपवाद वगळता भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. घरच्या मैदानावर असो की परदेशात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जगातील सर्वोत्तम संघ असल्याचे सिद्ध केले. वर्षाच्या अखेरीसदेखील भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 …

Read More »