Breaking News

महत्वाच्या बातम्या

विजयासह महाराष्ट्र बाद फेरीत

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा मुंबई : प्रतिनिधी कर्णधार राहुल त्रिपाठीने (नाबाद 63) पाच सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर साकारलेल्या झंझावाती अर्धशतकाला अझीम काझीच्या (नाबाद 71) धडाकेबाज अर्धशतकाची उत्तम साथ लाभल्यामुळे महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य पंजाबला 45 धावांनी धूळ चारली. सात सामन्यांतून पाचव्या विजयाची नोंद करणार्‍या महाराष्ट्राने ‘क’ …

Read More »

उरणमध्ये डेंग्यूची साथ

रुग्णांची धावाधाव; आरोग्य यंत्रणा सतर्क उरण : प्रतिनिधी पावसाळा सरून हिवाळ्याची चाहूल लागताच उरण तालुक्यात डेंग्यूच्या मच्छरांनी उच्छाद मांडला आहे. तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने अनेकांनी शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांत धाव घेतली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तुंबलेले पाणी व दमट वातावरणामुळे उरण तालुक्यात डासांची पैदास …

Read More »

गुरुद्वारात मोफत नेत्रतपासणी शिबिर

नवी मुंबई ः प्रतिनिधी जागतिक मधुमेह दिनानिमित्त डोळ्यांचे आरोग्य जपणार्‍या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत असलेल्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटतर्फे खारघर येथील गुरुद्वारामध्ये नुकतेच मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 156 नागरिकांनी सहभाग घेतला व यातील 32 नागरिकांना नेत्रपटलाशी संबंधित आजार असल्याचे निदान झाले. त्यांना पुढील तपासणीसाठी खारघर येथील …

Read More »

अतिवेगावर उतारा

सुसाट वाहने चालवल्यास होणार दंड; अत्याधुनिक वाहनांद्वारे होणार कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यात वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. यापुढे वेगमर्यादेपेक्षा सुसाट वाहने चालवल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, तर या दंडाबाबतचे थेट चलान वाहनचालकाला घरपोच मिळणार आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाकडे आलेल्या …

Read More »

रेल्वे स्टेशनवरून कुली हद्दपार

’सारी दुनिया का बोझ हम उठाते है. लोग आते है, लोग जाते है, हम यही पे खडे रह जाते है… कुली चित्रपटात लाल डगला आणि हाताला बिल्ला लावून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या गाण्यामुळे रेल्वे स्टेशनवरील या कुलीला प्रतिष्ठा मिळवून दिली, पण आज रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधा आणि व्हीलवाल्या बॅगमुळे …

Read More »

उचलली जीभ…

पराकोटीच्या राजकीय भांडणात शब्दाने शब्द वाढतो आणि विनाकारण तणाव निर्माण होतात हे तर खरेच. आपण आपल्याच हाताने परतीच्या वाटा बंद करीत चाललो आहोत, नजीकच्या भविष्यात हा मार्ग परिस्थिती आणखी अवघड करेल याचे भान ठेवायला हवे. परिस्थिती शक्यतो चिघळू नये याची पुरेशी काळजी भारतीय जनता पक्षाने जरुर घेतली आहे हे तर …

Read More »

कर्जत दहिवलीमध्ये ब्युटी पार्लर प्रशिक्षण

कर्जत : बातमीदार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी कर्जत तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीने चौदा वित्त आयोगाच्या निधीतून ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरू केले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या या दोन दिवशीय ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन सरपंच चिंधु तरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच यशवंत भवारे, ग्रामसेवक अरुण राजपूत यांच्यासह …

Read More »

वनवासी आश्रमास साहित्यिकांची भेट

खोपोली : प्रतिनिधी कर्जत जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमाला खोपोली येथील साहित्यिकांनी भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी हितगुज करीत खाऊ व पुस्तकांचे वाटप केले.  र. वा. दिघे यांच्या स्नुषा कवियित्री उज्वला दिघे, नलिनी पाटील, सुधा इतराज व स्वाती जोशी या साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी कर्जत तालुक्यातील जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमास …

Read More »

माणगावची 108 रूग्णवाहिका ‘कोमात’, रूग्णसेवा ठप्प

माणगाव : प्रतिनिधी शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माणगाव उपजिल्हा रूग्णालयाला 108 क्रमांकाची रूग्णवाहिका मिळाली आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने ही रूग्णवाहिका गेल्या दोन महिन्यांपासून उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात उभी आहे, त्यामुळे अनेक गरजू व तातडीच्या रूग्णांना या सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. मुंबई -गोवा महामार्गावरील  माणगांव येथे उपजिल्हा रूग्णालय आहे. या …

Read More »

कर्जत तालुक्यातील दोन ग्रामपंचायतच्या 8 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूका

कर्जत : बातमीदार तालुक्यातील वरई आणि तिवरे या दोन ग्रुप ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 8 डिसेंबर रोजी होत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच होत असलेल्या या दोन ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व मिळविण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यातील तिवरे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच पद  अनुसूचित जमातीतील महिलेसाठी राखीव असून तेथे थेट सरपंच आणि नऊ सदस्य …

Read More »