Breaking News

महत्वाच्या बातम्या

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने भाताणपाडा येथे बसविणार ट्रान्सफॉर्मर

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भाताणपाडा येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष व उरण मतदारसंघ निवडणूक प्रमुख अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …

Read More »

पथविक्रता समितीच्या विजयी उमेदवारांनी घेतली आमदार प्रशांंत ठाकूर यांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगर पथविक्रेता समितीच्या सन 2023-24साठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी बुधवारी (दि. 14) भेट घेतली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिनदयाळ अंत्योदय योजना …

Read More »

शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी पालकांसह मुलांची गर्दी

कर्जत : प्रतिनिधी नव्या शैक्षणिक वर्षात 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत, तर काही शाळा सुरूदेखील झाल्या आहेत. म्हणूनच शाळेचा गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके व शालेपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी पालकांसह मुलांची बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. उन्हाळी सुटीनंतर आता मुलांना शाळेचे वेध लागले आहेत. शाळेमध्ये नवीन वर्ग, नवीन मित्र अशा स्वप्नात …

Read More »

गावठी आंब्यांना खवय्यांची पसंती

पाली : प्रतिनिधी खराब हवामान व अवकाळी पावसामुळे यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. आवक कमी झाल्याने हापूस आंब्याचे दर हंगाम सरत चालला असला तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे हापूस आंबे खाणे सर्वसामान्यांसाठी अवघड होऊन बसले असून बाजारात गावठी आंबे दाखल झाल्याने खवय्ये त्यांची खरेदी करीत आहेत. …

Read More »

‘महावितरण’चा नागरिकांच्या जिवाशी खेळ!

स्पार्किंग होत असलेल्या विद्युत पोलकडे डोळेझाक; नागरिकांचा संताप पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील उरण रोड येथील कोळीवाड्याकडे जाणार्‍या मुख्य मार्गावरील विद्युत पोलवर स्पार्किंग होत असून त्याकडे महावितरण कंपनीकडून चक्क दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीचा बेफिकीर कारभार पनवेलमध्ये पहावयास मिळत आहे. आधीच …

Read More »

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्रच!

पावसाची चाहूल लागली की बेडकांची डराव डराव ऐकू येऊ लागते. काही बेडक्या अकारण फुगतात. त्याचे प्रत्यंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज दिसतेच आहे. जनमताचा धडधडीत अपमान करून उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कट्टर विरोधक राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दावणीला बांधली. केवळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी जनमत लाथाडण्याचे पाप …

Read More »

रायगड पोलीस भरतीमधील बोगसगिरी उघडकीस

चार उमेदवारांना ठोकल्या बेड्या अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलात झालेल्या भरतीमधील बरेगसगिरी उघड झाली आहे. भरती प्रक्रियेत चार उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चारही उमेदवारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. …

Read More »

पनवेल एसटी स्थानक होतेय चकाचक

एसटी स्थानक म्हटले म्हणजे अस्वच्छता , बसायला मोडकी बाके, आजूबाजूला मारलेल्या पिचकार्‍या आणि अस्वच्छ शौचालय हे चित्र डोळ्यासमोर येते, पण पनवेल एसटी स्थानकावर गेल्यावर सध्या वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. स्वच्छ फलाट तेथे ठेवलेल्या कुंड्या लक्ष वेधून घेतात. आजूबाजूचा परिसर ही स्वच्छ दिसतो आहे. त्यामुळे आपल्याला पनवेल स्थानकाचे रूप बदलेले …

Read More »

रोह्यात पावसाला जोरदार सुरुवात

रोहे ः प्रतिनिधी गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहत असतानाच अखेर सोमवारी (दि. 12) सायंकाळी रोह्यात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला आहे, परंतु सोसाट्याचा वारा सुटला असल्याने गेले तीन दिवस विजेचा लंपाडाव सुरू होता. बिपरजॉय वादळामुळे यावर्षी पाऊस कोकणात उशिराने दाखल झाला. असे असजे …

Read More »

विकासकामांसाठी पुढाकार महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 2 कोटी 80 लाखांच्या निधीतून रस्त्यांचा विकास पनवेल : रामप्रहर वृत्त विकासाच्या कामांसाठी पुढाकार महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 13) केले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दोन कोटी 80 लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास …

Read More »