खोपोली : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 2) खोपोली नगरपालिका कार्यालयात महात्मा गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. या वेळी प्लास्टिकमुक्तीसाठी सामूहिक शपथ घेण्यात आली. नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळी, आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे, मुख्याधिकारी गणेश शेटे यांसह …
Read More »महाड-रायगड मार्गावर अपघात; तरुण जागीच ठार, आई जखमी
महाड : प्रतिनिधी महाड ते किल्ले रायगड मार्गावर नाते गावाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याची आईदेखील या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला, मात्र महामार्गावर सुरू असलेल्या वाहन तपासणीत संशय आलेले वाहनच अपघातातील असल्याचे उघड झाले. वाहनचालकाला महाड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाड …
Read More »कुर्डूस ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायत सरपंच अनंत पाटील यांनी बुधवारी (दि. 2) तीन ग्रामपंचायत सदस्य आणि मुख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. कुर्डूस ग्रामपंचायत सरपंच अनंत पाटील यांनी तीन ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक समर्थकांसह बुधवारी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली येथील …
Read More »अलिबागमध्ये युतीशिवाय पर्याय नाही
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अलिबाग विधानसभा मतदारसंघात काय घडेल, याची चर्चा रंगत आहे. कारण अपवाद वगळता अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे पंडित पाटील विजयी झाले होते. त्या वेळी त्यांनी शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात …
Read More »सावध करणारी बंदी
इंटरनेटच्या जमान्यात डॉक्टरांना सातत्याने रुग्णांच्या अर्धवट ज्ञानाचा सामना करावा लागतो. इंटरनेटचा सहज आणि सर्रास वापर करणार्या सुशिक्षित रुग्णांमध्ये ही समस्या अधिक आढळून येते. अशा परिस्थितीत औषधांच्या दुकानांमध्ये सहजपणे उपलब्ध होणार्या औषधांचा रुग्णांकडून बेपर्वाईने अमर्याद वापर होण्याची शक्यता कमालीची वाढते. डोकेदुखी, सर्दी-खोकला, ताप, अॅसिडिटी आदी तक्रारींवरील औषधे रुग्णांकडून फारसा विचार न …
Read More »स्वच्छ अन् प्लास्टिकमुक्त भारतासाठी नागरिक एकवटले
पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150च्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान अंतर्गत खारघर सेक्टर 7 येथील सिडको उद्यानात धर्मसाधना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्वच्छता अभियान आणि लिटल वर्ल्ड मॉलजवळ लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या माध्यमातून प्लास्टिकबंदी अभियान बुधवारी (दि. 2) राबविण्यात आले. या उपक्रमांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत …
Read More »विवेक पाटील, नीतिमत्ता असेल तर कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे द्या आणि मगच निवडणूक लढवा!
जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांचे आव्हान उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार्या विवेक पाटील यांना जनाची नाही पण किमान मनाची लाज असेल, तर कर्नाळा बँकेत गरीब ठेवीदारांनी जमा केलेले पैसे आधी परत करावेत आणि मगच आमदारकीची निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी दिले …
Read More »रायगड जिल्ह्यात आघाडीत बिघाडी
उरण, पेणमध्ये काँग्रेसचे उमेदवार अलिबाग : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाने आपल्या 52 उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी (दि. 1) रात्री जाहीर केली. यात उरण आणि पेणमध्येही काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने रायगड जिल्ह्यात आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे विशेषत: शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसच्या यादीत रायगड जिल्ह्यातील तीन उमेदवारांची घोषणा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर आज भरणार अर्ज
पनवेल : भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी ज्येष्ठ, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशीर्वादाने सज्ज झाले आहेत. …
Read More »भाजप प्रवेशाची लाट
पनवेल, उरणमधील विविध पक्षांचे शेकडो कार्यकर्ते दाखल पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशाचा होणारा सर्वांगीण विकास आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास 800हून अधिक कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 2) पनवेलमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात भाजपमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper