पेण : प्रतिनिधी शेकाप पुढार्यांच्या मनमानी कारभारला कंटाळून पेण तालुक्यातील झोतीरपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह सदस्यांनी गुरुवारी (दि. 19) भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. पेण विधानसभा मतदारसंघात सध्या भाजप प्रवेशाची लाट उसळली आहे. माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या पेणमधील निवासस्थानी गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात झोतीरपाडा ग्रामपंचायतीचे …
Read More »पावसामुळे रस्ता बनला धोकादायक, पोशीर-माले रस्त्यावर चिखल आणि खड्डे
कर्जत : बातमीदार पुराच्या पाण्यामुळे कर्जत तालुक्यातील पोशीर-माले रस्त्याचा काही भाग वाहून जाऊन शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेव्हापासून महिनाभर हा रस्ता वाहतुकीस बंद होता. तात्पुरत्या स्वरूपात मातीचा भराव टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी तयार करण्यात आला होता. पावसामुळे पुन्हा हा रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामाकडे …
Read More »शिबिरात 27 जणांचे रक्तदान
अलिबाग : प्रतिनिधी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि स्वयंसिध्दा संचलित स्पर्धा विश्व अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमधील जंजिरा सभागृहात घेण्यात आलेल्या शिबिरात 27 जणांनी रक्तदान केले. प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. जिल्हा नियोजन …
Read More »रोहा रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान
रोहे ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत मध्य रेल्वेच्या वतीने स्वच्छता अभियान पंधरवडा राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रोहा रेल्वे स्टेशन व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात रेल्वे अधिकारी मीना, स्टेशन मास्तर सुरेश कुशवाह, आरपीएफ पोलीस निरीक्षक चौधरी, आरक्षण तिकीट मास्तर विजेंद्र सिंग, सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य रोहेकर, विद्या …
Read More »माणगावात एकाच जमिनीचा तिसर्यांदा साठेकरार; फिर्यादीची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कविळवहाळ बुद्रुक येथील एकच जमीन दोन वेळा विकल्यानंतर त्या जमिनीचा तिसर्यांदा साठेकरार करून एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी दोन जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधू बाबू बागवे व संजय साधू बागवे यांनी त्यांच्या मालकीची कविळवहाळ बुदु्रक येथील …
Read More »नागोठण्यात गांधी जयंतीपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी
नागोठणे : प्रतिनिधी म. गांधी जयंतीपासून (2 ऑक्टोबर) नियमित वापरात येणार्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी येणार असून कापडी किंवा कागदी पिशव्यांचाच वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी नागरिकांना केले. ‘स्वच्छता हीच सेवा‘ या अभियानांतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावरील विशेष ग्रामसभा मंगळवारी (दि. 17) नागोठणे ग्रामपंचायत …
Read More »धरणाच्या वाडीतील महिला कार्यकर्त्या भाजपत दाखल, तालुकाध्यक्ष ढवळे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
माणगाव : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माणगाव तालुक्यातील धरणाची वाडीमधील महिला मंडळाने बुधवारी (दि. 18) सायंकाळी भाजपत प्रवेश केला. माणगाव येथील भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपचे तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. धरणाच्या वाडी येथील राखी राणे, शिल्पा राणे, सलोनी चव्हाण, मनाली जाधव, चंद्रा पवार, गीता रसाळ, ज्योती …
Read More »माथेरानचे पर्यटन धोक्यात, मालवाहू घोडेवाल्यांकडून व्यापार्यांची अडवणूक, माल संपल्यानंतर दुकाने बंद ठेवण्याचा इशारा
कर्जत : बातमीदार मिनीट्रेन बंद असल्यामुळे मालवाहू घोड्यांचा दर वाढविण्याचा निर्णय माथेरानमधील मालवाहू घोडेवाल्यांनी घेतला असून, घोडेवाल्यांनी व्यापार्यांना वेठीस धरण्यास सुरुवात केली असल्याबाबतचे लेखी निवेदन येथील व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राजेश चौधरी व त्यांच्या शिष्टमंडळाने येथील अधीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी बापूराव भोई यांना दिले. मिनीट्रेनमधून माथेरानमध्ये जीवनावश्यक वस्तू आणल्या जातात. त्यासाठी …
Read More »रायगडभूषण पुरस्काराचा बाजार
रायगड जिल्हा परिषदेतर्फे नुकतेच रायगडभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वितरण म्हणण्यापेक्षा त्याला खिरापत वाटप असेच म्हटले पाहिजे. तब्बल 187 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. यापैकी श्रीवर्धन, पेण आणि अलिबाग मतदारसंघांतील 120 जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याचा अर्थच असा होतो की विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राजकीय हेतूनेच हे पुरस्कार …
Read More »तरुणाईला सावरणारे पाऊल
केंद्र सरकारच्या संबंधित निर्णयानुसार आता देशात ई-सिगारेटचे उत्पादन करण्यावर तसेच विक्री, साठवणूक, जाहिरात आणि आयात-निर्यातीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात पहिल्यांदा नियमभंग केल्यास एक लाख रुपये दंड व एक वर्षाचा तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याउप्परही पुन्हा हा नियमभंग केल्यास पाच लाख रुपये दंड व तीन वर्षांचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper