पनवेल ः प्रतिनिधी टाटा स्टील बीएसएलने जिल्ह्यातील खोपोली येथील आपल्या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या गावांमधील मुलींना जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आजच्या काळात मुलींच्या सक्षमतेसाठी अतिशय आवश्यक असा हा समाजोपयोगी उपक्रम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सहयोगाने राबविला जाणार आहे. जमशेदपूर येथे आशिया खंडातील पहिल्या स्टील प्रकल्पाच्या उभारणीत ज्यांनी …
Read More »बलात्कारी राम राहीमला दणका
हायकोर्टाने फेटाळला पॅरोल चंदीगड ः वृत्तसंस्था डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम बलात्कारप्रकरणी सध्या तुरुंगात असून त्याचा पॅरोल पंजाब व हरियाणा हायकोर्टाने मंगळवारी (दि. 27) फेटाळला आहे. राम राहीमच्या पत्नीने पॅरोल अर्ज हायकोर्टात दाखल केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी पार पडली असून हायकोर्टाने दणका देत पॅरोल फेटाळून लावला आहे. …
Read More »मोदी सरकारचा बिग प्लॅन!
10 वर्षांत शेतकर्यांना होणार मोठा फायदा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारने एक अशी योजना आणणार आहे ज्यामुळे पुढील 10 वर्षांत देशातील 50 लाख हेक्टर नापीक जमीन शेतीसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे जवळपास 75 लाख लोकांना रोजगार मिळू शकेल, अशी माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. …
Read More »शांताराम पवार यांची अध्यक्षपदी निवड
रोहा : तालुक्यातील गोवे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी ह.भ.प. शांताराम देवजी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी सरपंच संदेश कापसे, गाव कमिटी अध्यक्ष राजेश शिर्के, पोलीस पाटील सुरेश जाधव, ग्रामसेवक शिद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीबद्दल शांताराम पवार यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. नागोठण्यात ‘ब्रम्हाकुमारीज’तर्फे वृक्षारोपण …
Read More »कर्जतमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिर
कर्जत : बातमीदार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे महत्त्व पटावे असा प्रयत्न शासनाने सुरू केला आहे. कर्जत नगरपालिकेनेही पनवेल येथील लाईफलाईन हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शहरात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात खुद्द नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. …
Read More »दारूबंदीसाठी आदिवासी ग्रामस्थ आक्रमक
पाली तहसील व पोलीस ठाण्याला निवेदन पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील चंदरगाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या गावठी दारूचे उत्पादन व खुलेआम विक्री होत असल्याची तक्रार करीत तेथील आदिवासी बांधवांनी सोमवारी (दि. 26) पाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून दारूबंदीची मागणी केली. चंदरगाव आदिवासी वाडी परिसरात मोठ्या प्रमाणात दारू व्यवसाय चालतो. …
Read More »डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद
मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांचे प्रतिपादन; शासकीय दाखले वाटप कार्यक्रम रोहे ः प्रतिनिधी दाखले वाटप शिबिरात आज अनेकांना विविध शासकीय दाखले देण्यात आले. त्यासाठी श्री सदस्यांनी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची माहिती संकलन केली होती. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वच उपक्रम स्तुत्य असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन रोहा नगर …
Read More »‘गणेशोत्सवात सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवा’
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालीत शांतता कमिटीची बैठक पाली : प्रतिनिधी सामाजिक सलोखा व एकात्मता वृध्दिंगत करणार्या गणेशोत्सवात समाज प्रबोधनाबरोबरच राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम राबवण्यावर भर द्या, असे आवाहन पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी मंगळवारी (दि. 27) येथे केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाली (ता. सुधागड) पोलीस ठाण्यात मंगळवारी घेतलेल्या …
Read More »बेकरे गावातील दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त
कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील बेकरे गावात सुरू असलेल्या गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या. एकाच आठवड्यात नेरळ पोलिसांनी तीन ठिकाणी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या परिसरात गावठी दारू बनविली जात असल्याची खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर …
Read More »वळवली रस्त्याचे लोकार्पण
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील बेलाशी ग्रामपंचायत हद्दीतील वळवली गावातील द्वारकाधीश मंदिरासमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. माजी उपसरपंच संतोष निगडे यांच्या हस्ते या रस्त्याचे रविवारी (दि. 25) सकाळी लोकार्पण करण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीवरून शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी या रस्त्याचे काँक्रीटीकरण स्वखर्चाने केले आहे. या वेळी नंदकुमार पाटील, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper