पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याला मानाचा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार जाहीर झाला आहे. 29 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नेरूळ …
Read More »मानसी जोशीचा ‘सुवर्ण’स्मॅश
बासेल (स्वित्झर्लंड) : वृत्तसंस्था भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या जागतिक विजेतेपदानंतर आता मानसी जोशीने पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्णाक्षरात आपले नाव नोंदवले आहे. बासेल येथील वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये एसएल-3च्या अंतिम सामन्यात हमवतन पारुल परमारचा पराभव करीत मानसीने जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात मानसीने 21-12, 21-7च्या फरकाने पारुलवर विजय मिळवला. 2011मध्ये …
Read More »शिवराजधानी रायगडाचे जीर्णोद्धारपर्व
ब्रिटीशांचे राज्य असताना महात्मा जोतीराव फुले उपाख्यतात्या यांनी रायगडावर 1886 साली तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकून शिवछत्रपतींची समाधी पाऊणशे वर्षांच्या माजलेल्या गवत-घाणेरीतून शोधून काढली. हिंदवी स्वराज्याचे अठरापगड जातींचे आणि सर्वधर्मियांचे म्हणजेच रयतेचे राज्य ज्या रायगडाने पाहिले; केवळ त्याचा एकमेव साक्षीदार खुद्द रायगड किल्लाच असल्याचे सांगता येऊ शकेल. शिवजयंतीदेखील महात्मा जोतीराव …
Read More »राहुल गांधी तोंडघशी
जम्मू-काश्मीरसंबंधीचे कलम 370 हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जाहिरनाम्यातील एका महत्त्वाच्या आश्वासनाची पूर्तता केली. एक देश, एक प्रधान, एक विधान या तत्त्वानुसार भारत खर्या अर्थाने अखंड केला. देशाच्या तमाम जनतेने या धाडसी निर्णयाचे मुक्त कंठाने कौतुक केले. पण राहुल गांधी यांच्या मते मात्र तो आततायीपणा होता. …
Read More »बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या
उरण : वार्ताहर गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपला असल्याने शहरातील बाजारपेठा विविध वस्तूंनी फुलल्या आहेत. यामध्ये सजावटीच्या वस्तूंसह मखरांचा समावेश आहे. ‘विठू माऊली’ मालिकेत पांडुरंगाने वापरलेल्या दागिन्यांची डिझाईन, मुकूट याची मागणी बाजारपेठेत अधिक दिसून येते. गणेशोत्सवात फुलांचे भाव वाढत असल्याने कृत्रिम फुलांच्या माळा घेण्यास ग्राहक सरसावत आहेत, तर विद्युत रोषणाईच्या झगमगाटासाठी …
Read More »पनवेल महापालिका खरेदी करणार 20 मोबाइल टॉयलेट
स्थायी समितीच्या सभेत मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी (दि. 27) सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा सभागृहात झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. स्वच्छ भारत अंतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या …
Read More »पळस्पे फाट्यावर स्कूल व्हॅन जळून खाक
चालकाच्या प्रसंगावधनामुळे दोन विद्यार्थिनी बचावल्या पनवेल ः वार्ताहर पनवेलजवळील पळस्पे फाटा येथे मंगळवारी (दि. 27) सकाळी एका स्कूल व्हॅनला आग लागून ती जळून खाक झाली. या वेळी वाहनचालकाने प्रसंगावधान राखून दोन विद्यार्थिनींना बाहेर काढल्याने चालकासह त्या बचावल्या. स्कूल व्हॅनचालक आकाश अनिल तालिकोटी (24) याने नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 6 वाजता डेरवली …
Read More »नाशिकमध्ये नूतन शाळा इमारतीचे रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
सिन्नर : रामप्रहर वृत्त नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील श्रीसंत हरिबाबा विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 27) करण्यात आले. ‘रयत’चे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष दादाभाऊ …
Read More »पनवेलमध्ये पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने ‘माय इकोफ्रेंडली बाप्पा’ या शीर्षकाखाली पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा 31 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. हल्ली पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे भाविकांचा कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीतील श्रीगणेश मंदिर सभागृहात ही कार्यशाळा होणार असून, नाव नोंदणीची अंतिम तारीख …
Read More »पनवेल महानगरपालिकेतील ग्रामपंचायत कर्मचार्यांना दिलासा
उरण : रामप्रहर वृत्त पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्यांचे पनवेल महानगरपालिकेमध्ये समावेशन होण्यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 27) म्युनिसिपल एम्लॉईज युनियनच्या पदाधिकार्यांसोबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी म्हैसकर यांनी या विषयावर त्वरित कार्यवाही करून आठवडाभरात निर्णय घेण्याचे मान्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper