Breaking News

महत्वाच्या बातम्या

रोह्यात गुरे चोरणारी टोळी जेरबंद

रोहे : प्रतिनिधी  रोहा-साळाव रस्त्यावरील गोफण गावातील गुरे पळविणार्‍या टोळीतील काही सदस्यांना 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रोहा पोलिसांनी गोफण ग्रामस्थांच्या मदतीने सापळा रचून पकडले. अधिक चौकशीत या टोळीचे मुंब्रा कनेक्शन उघडकीस आले असून या टोळीच्या अटकेने रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील गुरे चोरीची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गोफण येथील …

Read More »

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घ्या ; तहसीदार जयराज सूर्यवंशी यांचे आवाहन

श्रीवर्धन : प्रतिनिधी देशातील अल्प व अत्यल्प भूधारकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ श्रीवर्धन तालुक्यातील जास्तीत-जास्त पात्र शेतकर्‍यांना मिळावा, यासाठी संबंधीतांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन तहसीदार जयराज सूर्यवंशी यांनी येथे केले. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेविषयी माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या …

Read More »

रोह्याच्या राजाचे जल्लोषात आगमन

रोहे : प्रतिनिधी लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेली संकल्पना गेली 98 वर्ष प्रयत्नपूर्वक जतन करणार्‍या रोह्याच्या राजाच्या मोठ्या मूर्तीचे रविवारी (दि.25) भाटे वाचनालयाच्या हॉलमध्ये जल्लोषात आगमन झाले . रोहे शहरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार किशोर वेदपाठक यांच्या गणपती कारखान्यात ही ‘श्रीं‘ची सुबक मूर्ती साकारली आहे. रविवारी श्रींची मोठी मूर्ती आणण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष राजेश …

Read More »

पेज नदीच्या पुलावर वीजवाहिन्या पडल्या

कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील पोटल ग्रामपंचायत हद्दीतील पाली येथील पेज नदीच्या पुलावर गेल्या दहा दिवसांपासून वीज वाहिन्या पडल्या असून, त्याकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोटल ग्रामपंचायत हद्दीतील पाली हे गाव आणि तीन आदिवासी वाड्या पेज नदीकिनारी वसल्या आहेत. येथे …

Read More »

कातळी पळचिल रस्ता वाहतुकीसाठी खुला ; रायगड व रत्नागिरी सीमेवरील वाद मिटला

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कातळी ते पळचिल या मार्गावरील अडथळा दूर करण्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाला यश आल्याने आता या मार्गावरील एसटी वाहतूक सुरळीत होणार आहे. पोलादपूर तहसिलदार प्राजक्ता घोरपडे आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या प्रयत्नामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील या रस्त्यासंदर्भातील वाद आता कायमचा संपुष्टात …

Read More »

रस्त्याचा भराव गेला वाहून ; कर्जत-कल्याण मार्गावर अपघातांची भीती

कर्जत : बातमीदार कर्जत-नेरळ-कल्याण या रस्त्यावर ठाणे जिल्हा हद्दीपासून 10 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते. या मार्गावरील शेलू गावानजीक असलेल्या रस्त्याचा मातीचा भराव वाहून गेला आहे. तो रात्रीच्या अंधारात वाहनचालकांना समजून येत नसल्याने या ठिकाणी अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. प्रचंड पावसामुळे शेलू गावाच्या हद्दीतील रेल्वेमार्गाचा मातीचा …

Read More »

ईव्हीएमने नव्हे; जनतेने ‘त्यांना’ हरवले

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात; महाजनादेश यात्रा नगरमध्ये पाथर्डी : प्रतिनिधी आमची यात्रा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही यात्रा सुरू केल्या आहेत, परंतु त्याचा काही एक उपयोग होणार नाही; कारण 15 वर्षे सत्तेत असताना जनतेने त्यांची माजोरी अन् मुजोरी पाहिली आहे. त्यामुळे जनता त्यांच्या जवळ जात नाही. हरले तर ईव्हीएममुळे असा आरोप ते …

Read More »

शिवराज प्रतिष्ठानकडून पूरबाधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

उरण ः प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवराज प्रतिष्ठान उरणतर्फे सुमारे 100 पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी वह्या, पेन, पेन्सिल असे शैक्षणिक साहित्य करवीर तालुक्यातील चिखली, भुये, शिये, वरगणे, पाडली या गावातील शाळांना वाटप करण्यात आले. शिवराज प्रतिष्ठानचे संस्थापक  संदेश ठाकूर यांच्या हस्ते ते पूरग्रस्त भागात पाठविण्यात आले. या वेळी खजिनदार उमेश वैवडे, विश्वस्त …

Read More »

भाजप रायगड अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीसपदी रय्यान तुंगेकर

उरण ः वार्ताहर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीसपदी रय्यान अन्वर तुंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी दिले. या वेळी भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, रायगड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष शहानवाज मुकादम, नवघर जिल्हा …

Read More »

जांभिवलीतील शेकाप, शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलनात भाजपचे चौक पंचायत समिती विभाग अध्यक्ष काशिनाथ गावडे यांच्या नेतृत्वाखाली जांभिवली (चौक) येथील शेकाप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रवीण …

Read More »