Breaking News

महत्वाच्या बातम्या

भिंगारी जिल्हा परिदषदेच्या शाळेत वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भिंगारी गावातील रायगड जिल्हा परिदषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळळाच्या वतीने वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम भिंगारी गावातील कराडी समाज हॉलमध्ये झाला. या वेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे आणि माजी उपमहापौर चारुशीला घरत उपस्थित होत्या. श्री …

Read More »

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे विविध शाळांमध्ये वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील चिंध्रण, मोरबे, रीटघरमधील शाळांमध्ये वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पनवेल तालुक्यातील चिंध्रण, मोर्बे, रीटघरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि रिटघरमधील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय …

Read More »

‘त्या’ सहा धावा चुकीच्याच

पंचांनी दिली कबुली कोलंबो ः वृत्तसंस्था वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ओव्हर थ्रोच्या सहा धावा देण्याचा माझा निर्णय चुकीचाच होता; पण त्याचा मला खेद वाटत नाही, हे उद्गार आहेत श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांचे. वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत ‘ओव्हर थ्रो’ आणि त्यामुळे इंग्लंडला लाभलेल्या सहा धावांची सर्वाधिक चर्चा झाली. तो …

Read More »

अखेरच्या वन डे सामन्यात विजयासह भारत अ संघाने मालिका जिंकली

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचे शतक एका धावेने हुकले मुंबई ः प्रतिनिधी पाचव्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज ‘अ’ संघावर मात करत मालिकेत 4-1ने बाजी मारली आहे. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले 237 धावांचे आव्हान भारतीय संघाने केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारतीय संघाचे सलामीवीर शुभमन गिल आणि ऋतुराज …

Read More »

धोनीकडून चेंडू निवड समितीच्या कोर्टात

मुंबई ः प्रतिनिधी 2019 विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू झाली आहे. अद्याप धोनीने निवृत्तीविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यात मात्र आपण खेळणार नसल्याचे धोनीने निवड समितीला कळवले आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर संघात निवडायचे की नाही, हा निर्णय निवड समितीनेच …

Read More »

पळस्पे फाट्यावर बेकायदा पार्किंगचा फटका

पनवेल : बातमीदर मुंबई, पुणे, गोवा, जेएनपीटी अशा विविध दिशांना जाणारा पळस्पे फाटा वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना नकोसा झाला आहे. रस्त्यावर बेकायदा उभ्या राहणार्‍या वाहनांमुळे कळंबोली सर्कलपासून सुसाट वेगाने पनवेलबाहेर पडणार्‍या वाहनांना पळस्पे फाटा ओलांडण्यासाठी अर्धा तासाच्या वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागतो. पनवेल शहरातून बाहेर पडल्यानंतर जुन्या महामार्गाने पुणे, लोणावळा, …

Read More »

पनवेल : सीकेटी महाविद्यालयातील फिजिकल डायरेक्टर प्रो. विनोद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, तसेच उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, नगरसेविका दर्शना भोईर, प्रा. एस. के. पाटील आदींनी त्यांचे अभीष्टचिंतन केले.

Read More »

अपहृत चार मुला-मुलींचा शोध

पनवेल : बातमीदर नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने नवी मुंबईच्या विविध भागांतून अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींचा व एका अल्पवयीन मुलाचा एकाच दिवसात शोध घेण्याची कामगिरी केली, तसेच यातील अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्‍या तिघांना ताब्यात घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अपहरणाचे चार गुन्हे उघडकीस आणले. नवी मुंबईचे …

Read More »

संस्कार भारतीच्या वतीने चित्रगुरूंचा सत्कार

पनवेल : बातमीदार रंग-रेषा व छटा या अविष्कारांची मुक्त उधळण पनवेलकरांनी नुकतीच अनुभवली. संस्कार भारती पनवेल समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त चित्रगुरूंचा सत्कार आणि त्यांची प्रात्यक्षिके अशा वेगळ्याच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल परिसरातील ज्येष्ठ चित्रकार नंदकुमार गोगटे, रामदास झोपे, राजेंद्र कांबळे, सुलभा जोशी, अनिल वाघमारे व श्री. बेहरे यांचा सत्कार …

Read More »

उरण डेपोतून गणेशोत्सवासाठी ज्यादा बसेस

उरण : बातमीदार उरण एसटी आगारातून गौरीगणपतीसाठी सालाबादप्रमाणे यंदाही उरणवासीयांना कोकणात जाण्यासाठी ज्यादा बस सोडण्यात येणार आहेत. याबाबत आगारप्रमुख श्री. नाईकवाड यांची कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गोपीनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे पदाधिकारी कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी, सहसचिव प्रमोद पाटोळे, सदस्य संतोष पवार, सचिव राकेश केळकर …

Read More »