Breaking News

महत्वाच्या बातम्या

तमिम इक्बालकडे बांगलादेशचे नेतृत्व

ढाका : वृत्तसंस्था बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तझा मांडीतील स्नायूंच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे मोर्तझाच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज तमिम इक्बालकडे बांगलादेशचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. 26 ते 31 जुलैदरम्यान कोलंबोत रंगणार्‍या या एकदिवसीय मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच बांगलादेशचा संघ जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी अष्टपैलू शाकिब अल हसन …

Read More »

‘ढिंग एक्स्प्रेस’ सुऽऽसाट ; हिमा दासने जिंकले पाचवे सुवर्णपदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ’ढिंग एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेली भारताची स्टार धावपटू हिमा दास हिचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच असून, तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. मेटूजी ग्रां. प्री. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 52.09 सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदक पटकाविले. गेल्या 15 दिवसांत 200 मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणार्‍या …

Read More »

उरणमध्ये भावी आमदार चषक फुटबॉल स्पर्धा

उरण ः वार्ताहर येथील मुनस्टार फुटबॉल क्लबच्या वतीने भावी आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 21) स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात करण्यात आले होते. या स्पर्धेस खेळाडूंचा प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन भाजप कार्यकर्ते जसिम गॅस यांच्या हस्ते झाले. या वेळी रेयोन तुंगेकर, सरजिल कादरी, अब्दुल शिलोत्री, हुसेन, जयेश, आमश, जितेश, तसेच …

Read More »

इंडोनेशिया ओपन : सिंधू अंतिम फेरीत पराभूत

जाकार्ता : वृत्तसंस्था भारताची स्टार टेनिसपटू पी. व्ही. सिंधू हिचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविण्याचे स्वप्न भंगले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. यामागुचीने सिंधूचा 15-21, 16-21 असा पराभव केला. सिंधूने हा मुकाबला अवघ्या 51 मिनिटांमध्ये गमावला. मुकाबल्याच्या सुरुवातीला सिंधूने आक्रमकपणा दाखवत लढतीवर आपली …

Read More »

प्रो-कबड्डी : मुंबई, बंगळुरूची विजयी सलामी

हैदराबाद : वृत्तसंस्था प्रो-कबड्डी स्पर्धेच्या सातव्या सीझनमध्ये यू मुंबाने तेलुगू टायटन्सचा पराभव करीत विजयी सुरुवात केली. मुंबईने तेलुगू टायटन्सचा 31-25ने पराभव केला; तर बंगळुरू बुल्सने पाटणा पायरेट्सवर 34-32ने मात केली. हैदराबादच्या गाचीबावली इनडोअर स्टेडियमवर प्रो-कबड्डीचा थरार रंगला. मुंबईसाठी कर्णधार फजल अत्राचलीने चार टॅकल, तर संदीप नरवालने चार टॅकल गुण मिळविले, …

Read More »

विंडीज दौर्यासाठी युवा खेळाडूंना संधी ; भारतीय संघ जाहीर; धोनीच्या जागी पंतची निवड

मुंबई : प्रतिनिधी पुढील महिन्यापासून सुरू होणार्‍या वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारताच्या टी-20, एकदिवसीय व कसोटी क्रिकेट संघाची घोषणा रविवारी (दि. 21) करण्यात आली. विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा दौरा होणार असून, टी-20 व एकदिवसीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनीची जागा ऋषभ पंत घेणार आहे. कसोटीसाठी पंतसोबत रिद्धिमान साहा …

Read More »

चालत्या दुचाकीवर विजेची तार पडल्याने एकजण जखमी

उरण : वार्ताहर  – चालत्या दुचाकीवर उच्च दाबाची वीज वाहिनी पडून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 19) उरण तालुक्यात फुंडे गावाजवळ डोंगरी रोड कॉर्नरजवळ घडली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी दुचाकीस्वार मात्र जखमी झाला आहे. उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील  दांडा गावातील तरुण दिनेश जीवन पाटील …

Read More »

कळंबोली येथील उद्यानाची दुरवस्था ठेकेदाराचा हलगर्जीपणा

कळंबोली : प्रतिनिधी  – कळंबोली वसाहतीतील सेक्टर 2 मधील उद्यानाची अक्षरशः दुरवस्था झाली असून, उद्यानात सडलेल्या कचर्‍याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत. मच्छरचे वाढते प्रमाण व रोगराईच्या भीतीने नागरिकांना विरंगुळ्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले एकमेव पे अ‍ॅण्ड पार्क उद्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले …

Read More »

सुरांइतक्याच भावनाही महत्त्वाच्या -सुलोचना चव्हाण

अलिबाग : प्रतिनिधी सुरांइतक्याच भावनाही महत्त्वाच्या असतात. तुमच्या गाण्यातून शब्दांतील भावना रसिकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. तरच त्या गाण्याला अर्थ असतो. केवळ आवाजात गोडवा आहे, सुरात गीत गायले म्हणजे गाणं होत नाही, असे परखड मत सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी व्यक्त केले. सुलोचनादीदी यांनी हिंदी, गुजराती, पंजाबी, तामिळ सिनेमात आपल्या सुमधुर आवाजाने …

Read More »

साळाव येथे उभ्या कारला आग

रेवदंडा : प्रतिनिधी साळाव येथील बिर्ला मंदिरनजीक मुख्यः रस्तालगत उभ्या असलेल्या कारने दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला. जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी विनय थत्ते हे स्वतःच्या कारने अलिबागहून साळाव बिर्ला मंदिर येथे आले व त्यांनी बिर्ला मंदिरनजीक मुख्य रस्त्यावर कार उभी ठेवून ते खरेदीसाठी …

Read More »