भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दावा मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या देशाचे लक्ष निकालांकडे लागून राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत बाजी मारून केंद्रात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता जनतेला आहे. त्यातच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवलेले अंदाज एनडीएसाठी विशेषत: भारतीय जनता पार्टीसाठी सुखावणारे आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युती 45 जागा …
Read More »सेन्सेक्स 900 अंकांनी उसळला; एक्झिट पोल इफेक्ट
मुंबई ः प्रतिनिधी रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. काल सकाळी मार्केटने 900 अंकांनी उसळी घेतली, तर निफ्टीही 200 अंकांनी वधारला आहे. या बढतीमुळे जागतिक बाजारपेठेत रुपयाही 69 पैशांनी मजबूत झाला आहे. लोकसभेच्या 542 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये रविवारी मतदान पार पडले. मतदान संपल्यावर विविध संस्थांनी …
Read More »पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
पाच महिन्यांत 1337 जणांना मदतीचा हात; प्रोत्साहन देण्याची गरज पुणे ः प्रतिनिधी रस्त्यात आढळलेल्या 70 वर्षांच्या जखमी अवस्थेतील मनोरुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे, रिक्षात हरविलेली बॅग दागिन्यांसह महिलेच्या स्वाधीन करणे, मनाविरुद्ध लग्न ठरविल्याने घर सोडून गेलेल्या तरुणीला शोधून पालकांच्या ताब्यात देणे, आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला जीवदान अशा एक ना …
Read More »पक्षी-प्राणी गणनेसाठी कर्नाळा अभयारण्यात ट्रॅक कॅमेरे
पनवेल ः प्रतिनिधी कर्नाळा अभयारण्यातील पक्षी-प्राण्यांची गणना करण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी अभयारण्यातील विविध भागात ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले होते. दरवर्षी बुद्धपौर्णिमेला वन्यजीव विभागामार्फत पक्षी-प्राण्यांची गणना करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. पनवेलपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी …
Read More »मुरूडमध्ये पर्यटकांची अलोट गर्दी; समुद्रकिनारे गजबजले
मुरूड-जंजिरा ः प्रतिनिधी शनिवारी बुद्धपौर्णिमेची आणि त्यानंतर आलेली रविवारची सुटी साधून हजारो पर्यटक मुरूड, काशीद समुद्रकिनारी येऊन धडकले आहेत. शनिवारपासूनच पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पर्यटकांनी स्वतःच्या चारचाकी गाड्या घेऊन येणे अधिक पसंत केले. त्यामुळे मुरूडच्या समुद्रकिनारी असणार्या लॉजेसभोवती गाड्यांची गर्दी दिसून आली. मुरूडसह काशीद समुद्रकिनाराही शेकडो पर्यटकांनी …
Read More »देवाकडे मी कधी काही मागत नाही ; 18 तासांच्या ध्यानधारणेनंतर मोदी यांची प्रतिक्रिया
रुद्रप्रयाग ः वृत्तसंस्था निवडणूक प्रचार संपल्यानंतर केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.19) सकाळी मीडियाशी संवाद साधला. जवळपास 17 ते 18 तास एका गुफेमध्ये ध्यानधारणा केल्यानंतर मोदी यांनी सकाळी उठून केदारनाथ मंदिरात पूजा केली. बर्याच काळानंतर मला गुफेत ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली, असे या वेळी मोदी …
Read More »मावळमधील जाधववाडी धरणात बुडालेल्या सहा जणांपैकी तीन मृत्युमुखी
मावळ ः प्रतिनिधी उन्हाळी सुट्टीनिमित्त नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. यातील उर्वरित तिघांना एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते. प्रशील आढाव (7), अनिल कोळसे (58) आणि प्रितेश आगळे (32, तिघेही रा. घाटकोपर, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस …
Read More »रायगडात ‘रोहयो’तील रोजगार निर्मितीचे 90 टक्केउद्दिष्ट पूर्ण
अलिबाग ः प्रतिनिधी रोजगार हमी योजनेत रायगड जिल्ह्याला देण्यात आलेले मनुष्य दिवस रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. यंदा दोन लाख 38 हजार 993 मनुष्य दिवस रोजगारनिर्मिती करण्यात आली. फळबाग लागवड योजनेसह अन्य योजनाही ‘रोहयो’त जोडल्यामुळे रायगडात ‘रोहयो’ला चांगला प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यात ‘रोहयो’ अंतर्गत 2018-19 साठी …
Read More »अखेरच्या टप्प्यात 60.21 टक्के मतदान ; बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी काल झालेल्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत 60.21 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. या वेळी 7.27 कोटी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 3.47 कोटी महिला तसेच तीन हजार 377 तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक …
Read More »होय, मी समलैंगिक आहे -द्युती चंद
ओडिशा : वृत्तसंस्था भारताची सर्वात जलद महिला धावपटू द्युती चंदने शनिवारी खुलासा केला. ओडिशाच्या चाका गोपालपूर येथील मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याचे द्युतीनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, मात्र तिने मैत्रिणीची ओळख सांगण्यास नकार दिला. उगाच आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये ही त्यामागची द्युतीची भावना आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper