Breaking News

महत्वाच्या बातम्या

पोलादपूर तालुक्याची तहान भागणार

29 बोअरवेलची मंजूरी; कुडपण खुर्दचीही मागणी पोलादपूर : प्रतिनिधी : तालुक्याच्या पाणी पुरवठा कृती आराखड्यात मागणी केल्या पैकी 29 बोअरवेलना मंजूरी प्राप्त झाली आहे. संबंधीत ग्रामपंचायतीकडे  बोअरवेलसाठी निधी वर्ग करण्यात आला असून, पंचायत समितीचे शाखा अभियंता या कामी सर्व सोपस्कार पूर्ण करणार असल्याने बोअरवेल कागदोपत्री करण्याचे प्रकार थांबण्याची चिन्हे दिसत …

Read More »

स्टीव्ह स्मिथमध्ये झाले सचिनचे दर्शन

लंडन : वृत्तसंस्था 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. यासाठी प्रत्येक टीमने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. वर्ल्ड कपआधीच्या सराव सामन्यात स्टीव्ह स्मिथची बॅटिंग बघून सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघितल्यासारखं वाटलं, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी केलं आहे. मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या वेळी बॉल छेडछाड …

Read More »

नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ झाला. अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, उपाध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, सेक्रेटरी प्रकाश पावसकर, खजिनदार सुनील पेडणेकर, …

Read More »

पेणमध्ये क्रिकेट प्रशिक्षण शिबिर

पेण : प्रतिनिधी एम. एस. धोनी क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या वतीने पेण नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियमवर आधुनिक पद्धतीचे क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अ‍ॅकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक मंदार दळवी यांनी दिली. स्टेडिअम कक्षात झालेल्या या पत्रकार परिषदेस पेण न. प.चे सभागृह नेते तथा रायगड जिल्हा …

Read More »

एनसीएने थकवलेय पोलीस सुरक्षेचे बिल

मुंबई : प्रतिनिधी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आयपीएलच्या इतर मॅचच्या सुरक्षेचे पैसे अजूनही दिलेले नाहीत. माहितीच्या अधिकारात ही गोष्ट समोर आली आहे. अनिल गलगलींनी टाकलेल्या आरटीआयला मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं आहे. एमसीएने 21.34 कोटी रुपये दिलेले नाहीत, यामध्ये 5.61 कोटी रुपयांचं व्याज आहे. हे पैसे 2018 पर्यंतच्या आयपीएल आणि इतर …

Read More »

हॉलिबॉल स्पर्धेत कालभैरव दादर-पेण संघ विजेता

खारेपाट : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील जय बहिरीदेव संघ बहिरीचापाडा आयोजित जिल्हास्तरीय हॉलिबॉल टाकाटाकी स्पर्धेत कालभैरव दादर-पेण संघ विजेता ठरला, तर उपविजेता बहिरीदेव संघ बहिरीचापाडा, तृतीय संघ नांदाईचा पाडा संघ, चतुर्थ क्रमांक जय बहिरीदेव संघ ठरला. स्पर्धेत उत्कृष्ट शूटर-सुधाकर पाटील बहिरीचापाडा, विजय म्हात्रे दादर-पेण यांना गौरवण्यात आले. स्पर्धेत जिल्ह्यातील 32 संघ …

Read More »

विराट आणि रोहितला सौरवचं रेकॉर्ड मोडण्याची संधी

मुंबई : प्रतिनिधी 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. इंग्लंडमधलं सध्याचं वातावरण आणि खेळपट्ट्या बघता इथली परिस्थिती बॅट्समनना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपसाठी इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या अशाच राहिल्या, तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला सौरव गांगुलीचं 20 वर्ष जुनं रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. प्रत्येक चार वर्षांनंतर होणार्‍या क्रिकेट …

Read More »

अमेरिकेची इराणला धमकी

नवी दिल्ली ः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इराणने अमेरिकेच्या हितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर इराणला नष्ट करू, अशी धमकीच ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. इराणला लढायचे असेल तर त्यांचा शेवट करू. पुन्हा अमेरिकेला धमकी देण्याची हिंमत करू नका, असे ट्रम्प यांनी खडसावले आहे. …

Read More »

पेन्शनर्सच बँकेला देणार जिवंत असल्याचा ऑनलाइन पुरावा

मुंबई ः प्रतिनिधी पेन्शनर्सला जीवन प्रमाण अर्थात जिवंत असल्याचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) बँकेत दरवर्षी नोव्हेंबर वा डिसेंबरमध्ये जमा करण्याची आता आवश्यकता नाही. केंद्र सरकारने पेन्शनर्ससाठी पोर्टल सुरू करून याबाबतची ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे पेन्शनर्सची बँकेच्या वेळखाऊ कटकटीपासून मुक्तता झाली असून, त्यांना तासभर रांगेत उभेही राहावे लागणार नाही. ही …

Read More »

बँक ऑफ बडोदाच्या शेकडो शाखा होणार बंद?

मुंबई ः प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या दुसर्‍या क्रमांकाच्या बँक ऑफ बडोदाकडून देशातील 800 ते 900 शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने बँक ऑफ बडोदाकडून याबाबत विचार सुरू आहे. देना आणि विजया बँक या दोन्ही बँकांचे 1 एप्रिल रोजी बँक ऑफ बडोदात …

Read More »