पनवेल : वार्ताहर कळंबोली पोलीस ठाण्यासमोरच तीन महिलांमध्ये एकमेकींना शिवीगाळ करण्याबरोबरच हाणामारी करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी या महिलांविरोधात सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तीनही महिला कळंबोली जाधववाडी या परिसरातील आहेत. कळंबोली पोलीस ठाण्यासमोरील रोडवर एकमेकींना शिवीगाळ करण्याबरोबरच मारहाण करण्यास या महिलांनी सुरुवात केली. …
Read More »चावणे, जांभिवली, कराडे बुद्रुक येथे जूनमध्ये ग्रामपंचायत निवडणूक
रसायनी : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील मुदत संपणार्या ग्रामपंचायतींचा मतदार पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला असून, 20 मे रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जूनमध्ये जाहीर केला जाणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी जून अखेरपर्यंत मतदान होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. जुलै, सप्टेंबरपर्यंत मुदत संपणार्या व …
Read More »कामोठे बसथांब्याचे स्थलांतर व्हावे
सिटीझन्स युनिटी फोरमची मागणी; रखडलेले डावे वळणाचे काम पूर्ण पनवेल : बातमीदार कामोठ्यातील बाहेर पडून मुंबईच्या दिशेने जाणार्या पनवेल-सायन मार्गावरील काम पूर्ण झाल्यामुळे कळंबोली आणि कामोठे वसाहतीच्या मधे असलेला थांबा कामोठ्याच्या पुलाजवळ नेण्यात यावा, अशी मागणी सिटिझन्स युनिटी फोरमच्या कामोठे शाखेने केली आहे. अनेक वर्षे रखडलेले कामोठ्याचे डावे वळण पूर्ण …
Read More »एसटीच्या पेण स्थानकाची दुरवस्था
जलवाहिनी फुटली, पिण्याच्या पाण्याची गैरसोय पेण : अनिस मनियार राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या पेण स्थानकामागचे शुक्लकाष्ठ सुरूच असून, या स्थानकामध्ये प्रवाशांना कोणतीच सोयीसुविधा राहिली नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असून, पाणी साठवण टाकी मात्र कोरडी झाली आहे. त्यामुळे या स्थानकांत प्रवाशांना पाण्यापासून वंचित राहावे …
Read More »महाड न.प.ची घरपट्टी वसुली जोरात
मार्च अखेर तीन कोटी एक लाखांचा गल्ला महाड : प्रतिनिधी नगर परिषदेकडे कर्मचारी तुटवडा असतानादेखील महाडमध्ये घरपट्टी वसुली जोमाने सुरु आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत वसुली विभागाने आपले लक्ष 84 टक्के पूर्ण केले आहे. आतापर्यंत सुमारे तीन कोटी एक लाख रुपये घरपट्टी वसुली करण्यात आली आहे. घरपट्टी वसुल करणे, हे तसे …
Read More »नेरळमध्ये नालेसफाईची कामे वेगात
कर्जत : बातमीदार नेरळ गावातील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केला आहे. नेरळ गावात 10 किलोमीटरचे मुख्य नाले असून, 12 किलोमीटरचे उपनाले आहेत. पावसाळा डोळ्यासमोर ठेवून त्यांची साफसफाई करण्यास नेरळ ग्रामपंचायतीने सुरुवात केली. नेरळ ग्रामपंचायत दरवर्षी गावातील मुख्य नाले आणि बाजारपेठ भागातील लहान नाल्यांची साफसफाई करीत असते. नेरळ …
Read More »अमन लॉज-माथेरान दरम्यान मेगाब्लॉक
मिनिट्रेनची शटल सेवा आज बंद कर्जत : बातमीदार पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन सोमवारी (दि. 20) दुपारी चार तास नॅरोगेज मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवली जाणार आहे. एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेच्या मेंटेनन्स विभागाने दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक मागितला होता. मिनिट्रेनच्या नेरळ-माथेरातन या मार्गावरील अमन लॉज ते माथेरान स्टेशन या तीन किलोमीटरच्या मार्गावर हा ब्लॉक …
Read More »महाड तालुक्यात पाणी चोरी
वीटभट्टी आणि टँकरमाफीयांचा डल्ला; लघु पाटबंधारे विभाग वाहनाविना हतबल महाड : प्रतिनिधी लघु पाटबंधारे विभागाला थांगपत्ता लागू न देता महाड तालुक्यात विविध कारणासाठी लागणारे पाणी खुलेआम नद्यांमधून उचलले जात आहे. लघु पाटबंधारे विभागाकडील वाहन सुविधेचा अभाव आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे पाणी चोरट्यांवर कारवाई करण्यास अडथळा निर्माण होत आहे. सध्या …
Read More »चहा ‘तो’ की ‘ती’?
‘तो’ चहा की ‘ती’ चहा, हा प्रश्न तसा माझ्या मनात नेहेमीच उभा असतो. अगदी ‘टू बी ऑर नॉट टू बी’च्या धर्तीवर. कुणाला विचारावं, तर काय वेड लागलंय का माणसाला, अशा पद्धतीने बघण्याची भिती. पण धीर करुन काही दिवसांपूर्वी मी तो फेसबुकवरच्या माझ्या मित्रांना विचारायचं ठरवलं आणि लगेच विचारलाही. आणि त्या …
Read More »सलग सुट्ट्यांमुळे वाहतुकीचे तीन तेरा
खोपोली/खालापूर ः प्रतिनिधी खोपोली-पाली आणि खोपोली अलिबाग, पेण मार्ग जेथे एकत्र मिळतात त्या खालापुरातील पाली फाट्यावर शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काही वाहने वाहतूक कोंडी टाळून पाली मार्गावर जाण्यासाठी ताकई ढेकू औद्योगिक वसाहतमार्गे ठाणे न्हावे गावावरून जात असता या मार्गावरही वाहनांची वर्दळ झाल्याने हा मार्गही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper