Breaking News

महत्वाच्या बातम्या

क्षुल्लक कारणावरून युवकावर गोळीबार

पुणे ः प्रतिनिधी अहमदनगर येथून आलेल्या तिघांनी प्यासा हॉटेलचा पत्ता अगोदर का सांगितला नाही म्हणून एका युवकावर छर्‍याच्या बंदुकीतून गोळीबार केला. अगोदर पत्ता माहीत नाही, असे का सांगितलेस म्हणून दारू पिल्यानंतर त्याला मरीआई गेटजवळ सोडताना त्याच्यावर छर्‍याच्या बंदुकीतून गोळीबार करून जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे़. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी …

Read More »

मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य करणार; नवनियुक्त आयुक्त प्रवीण परदेशी यांचे आश्वासन

मुंबई ः प्रतिनिधी प्रवीण परदेशी यांनी नुकताच मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिलेल्या प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली, तर मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून (करार पद्धतीने) प्रथम एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा …

Read More »

कोकणात जाणार्या एसटी बसेस फुल्ल

पाली/बेणसे ः प्रतिनिधी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने चाकरमानी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर पर्यटकही जिल्ह्यातील तसेच तळकोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात रवाना होत आहेत. परिणामी कोकणाकडे जाणार्‍या एसटी बसेस फुल्ल झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. खासगी वाहनांची संख्या वाढल्याने मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गाड्यांना …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीत खेळांसाठी पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे मत पनवेल ः प्रतिनिधी खेळाडूंना चांगली संधी, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पनवेल महापालिका हद्दीमध्ये खेळासाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निश्चितच प्रयत्न करू, तसेच सिडकोच्या माध्यमातून सिडको नोडमध्येही सीझन क्रिकेट खेळता येईल असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात येईल, असा विश्वास सिडको अध्यक्ष …

Read More »

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम

अलिबाग : प्रतिनिधी स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यातर्फे रविवारी (दि. 12) संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 14) आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचे महत्त्व पटावे व आपले आरोग्य …

Read More »

बबनरावांचा विमान प्रवास

आमच्या सोसायटीत राहणार्‍या बबनरावांना विमानाबद्दल खूप कौतुक. त्यांना विमान प्रवास करण्याची हौस आहे, पण ते परवडणारे नसल्याने दुधाची तहान ताकावर म्हणून त्यांनी रावतेंच्या शिवशाहीने गावाला जाऊन यावे असे ठरवले. मला म्हणाले, पनवेलमध्ये उन्हाळा वाढला आहे. त्यामुळे जरा गावी जाऊन येतो. दिवाकररावांनी सामान्य माणसाला विमान प्रवासाचा अनुभव देण्यासाठी  ’शिवशाही’ आणली आहे, …

Read More »

वायुगळतीने तीन कामगारांचा मृत्यू

तारापूर ः प्रतिनिधी तारापूर येथील एमआयडीसीतील केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीने तीन कामागारांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना विषारी वायूची गळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या कामगारांची तपासणी करताना संबंधित डॉक्टरांनाही …

Read More »

कराटे स्पर्धेत अर्चना भालेरावची गरुड भरारी

कर्जत : रामप्रहर वृत्त कर्जत शहरातील गुंडगे-पंचशीलनगर येथील अर्चना भालेराव हिने कराटे कलेत गरूड भरारी घेऊन ह्या वर्षीचा महाराष्ट्र खेळ पुरस्कार -2019 पटकावून कर्जतच्या इतिहासात सुवर्णाक्षरात आपले नाव कोरले आहे. महाराष्ट्र खेळ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पनवेल येथे पृथ्वी हॉल, रायगड येथे साजरा करण्यात आला. या वेळी पुरस्कार वितरण करण्यासाठी …

Read More »

पुन्हा बॉल टॅम्परिंगचा प्रकार इंग्लंडच्या खेळाडूवर बंदी?

लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडच्या जोस बटलरने आपला आयपीएलमधला फॉर्म कायम राखत पाकिस्तानच्या गोलंदाजांना धू… धू… धुतले. त्याने 55 चेंडूंत 9 षटकार व 6 चौकार खेचून नाबाद 110 धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानसमोर 374 धावांचे आव्हान उभे केले. पाकिस्तानकडूनही त्यांना कडवे उत्तर मिळाले, परंतु त्यांना अवघ्या 12 धावांनी …

Read More »

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीसदस्यांचे श्रमदान ; श्रीवर्धनमधील शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ

श्रीवर्धन : प्रतिनिधी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व  स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी श्रीवर्धन शहरातील सार्वजनिक रस्ते आणि शासकीय कार्यालय परिसरात  स्वच्छता मोहीम राबविण्यांत आली. प्रतिष्ठानतर्फे मागील महिन्यात श्रीवर्धन तालुक्यातील स्मशानभ्ाूमी, कब्रस्तान व दफनभ्ाुमी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. रविवारी …

Read More »