Breaking News

महत्वाच्या बातम्या

चई गावातील विजेचे खांब कोसळण्याच्या स्थितीत; महावितरणचे दुर्लक्ष

कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील चई गावात 30 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले विजेचे खांब जिर्ण झाले असून, ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. अनेकदा तक्रारी करूनदेखील महावितरण कंपनी त्याकडे लक्ष देत नाही. दरम्यान, महावितरण कंपनी अपघात होण्याची वाट पाहत आहे काय? असा सवाल भाजप कार्यकर्ते कृष्णा शिंगोळे यांनी उपस्थित केला आहे. …

Read More »

उन्हाळी शिबिरात बालगोपाळ रमले

महाड : प्रतिनिधी : अभ्यासाच्या ओझ्यातून मुक्त झालेली शहरातील बच्चे कंपनी आता सुट्टीचा आनंद लूटण्यासाठी वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरात रमले असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणार्‍या मुलांनाही अशा विनामुल्य उन्हाळी शिबिराचा आनंद गट शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्यामुळे मिळाला आहे. आपल्याच शाळेत झालेल्या या शिबीरात मुले आनंदाने रमूनही गेली. …

Read More »

नेरळ धरणाची स्वच्छता करण्यासाठी पाणी सोडले

कर्जत : बातमीदार : नेरळ ग्रामपंचायतचे ब्रिटीशकालीन धरण दगड, माती आणि प्लास्टिक कचर्‍यात हरवून गेले होते. सदर धरणाची स्वच्छता करण्याची मागणी नेरळमधील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार   ग्रामपंचायतने धरणाचा दरवाजा उघडून  अस्वच्छ पाणी सोडून दिले. त्यावेळी मासे पकडण्यासाठी मासेमारी करणार्‍यांनी गर्दी केली. कर्जत-कल्याण राज्यमार्ग लगत असलेल्या नेरळ येथील  धरणाच्या पाण्यामध्ये गावातील …

Read More »

हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक छळ

पतीसह सासू व दीरावर गुन्हा दाखल पेण : प्रतिनिधी पैशासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी तिचा पती, सासू व दीर यांच्या विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण तालुक्यातील डोलवी येथील महिलेचे 4 मे 2017 रोजी लग्न झाले असून, त्यानंतर 1 ऑगस्ट 2017 ते 9 …

Read More »

महाडमध्ये 15 विंधण विहिरीं पूर्ण; ग्रामस्थांना दिलासा

महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून 64 विंधणविहिरी खोदण्यास मंजूरी मिळाली असून, त्यापैकी 15 विंधणविहिरींची खोदाई पूर्ण झाल्याने तेथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. महाड तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सर्व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना असल्या तरीही पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने, या गावांना टंचाई निर्माण होते. त्यातच तालुका हा …

Read More »

पेण भूमीअभिलेख कार्यालयाला रिक्तपदांचे ग्रहण

कामकाज थंडावले; जनता मात्र हैराण पेण : प्रतिनिधी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्तपदांमुळे सर्वसामान्य जनतेची या कार्यालयाशी निगडीत असलेली बरीच कामे खोळंबली आहेत. अनेक फेर्‍या मारूनसुद्धा काम होत नसल्याने नागरिकांमध्ये या कार्यालयाच्या कामकाजाबद्दल प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या कार्यालयातील रिक्तपदे वेळीच भरली नाही, आणि थंडावलेले कामकाज असेच राहिले …

Read More »

नवीन पनवेलमधील भुयारी मार्गाला महावितरणच्या टॉवरचा अडथळा

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधून जुन्या पनवेलमध्ये (तक्का) जाण्यासाठी रेल्वेचे सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास येत असताना त्याला महावितरणच्या टॉवरमुळे अडथळा निर्माण झाला आहे. सदर टॉवर बाजूला करण्यात येईपर्यंत भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नसल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांकडून मिळाली आहे. त्यामुळे नवीन पनवेलसह विचुंबे, उसर्ली परिसरातील नागरिकांना वाहतूक …

Read More »

दोन महिन्यांसाठी खोल समुद्रात मासेमारी बंदी

अलिबाग ः प्रतिनिधी  येत्या 1 जून ते 31 जुलै या कालावधीत यंत्रिकी नौकांद्वारे खोल समुद्रात मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे. पावसाळ्यात खोल समुद्रात मुसळधार लाटा आणि वारा सुरू असतो, तसेच याच काळात सुरुवातीच्या महिन्यात समुद्री मासे प्रजनन करतात. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांसाठी सागरी किनार्‍यापासून 12 सागरी मैलापर्यंत  खोल …

Read More »

मी जय श्रीराम म्हणणारच, हिंमत असेल तर ममतादीदींनी अटक करावी : शहा

जॉयनगर ः वृत्तसंस्था बंगालमध्ये कुणीही जय श्रीराम म्हणायचे नाही, अशी सक्त ताकीद ममता बॅनर्जी यांनी दिली आहे, मात्र मी जय श्रीराम म्हणणारच. हिंमत असेल तर ममतादीदींनी मला अटक करून दाखवावी, असे थेट आव्हानच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना दिले आहे. अमित शहा यांच्या सभेला जावेदपूर या ठिकाणी …

Read More »

टंचाईचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज

अलिबाग ः प्रतिनिधी दुष्काळाचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील गाव तलावांतील गाळ काढणे, विंधन विहिरींची कामेही त्वरित हाती घेऊन पूर्णत्वास न्यावीत, तसेच जलयुक्त शिवाराची कामे मेअखेर पूर्ण करावीत, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »