आंब्याच्या कैर्याही खवय्यांच्या पसंतीला रोहे ः प्रतिनिधी येथील बाजारपेठेत काजू बिया आणि आंब्यांच्या कैर्यांची आवक वाढली असून, त्यामुळे आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे. काजू बियांची भाजी आणि आंब्यांच्या कैर्याच्या कापून तयार केलेल्या फोडी हे कोकणातील खवय्यांचे आवडते खाद्य पदार्थ आहेत. मार्च, एप्रिलमध्ये खवय्ये या दोन्ही फाळांचा बाजारात शोध घेताना …
Read More »क्लासला गेलेली दोन मुले बेपत्ता
पनवेल : बातमीदार कळंबोली येथील क्लास सुटल्यावर बाहेर पडत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने दोन मुलांचे अपहरण केले आहे. अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहावीच्या क्लासला गेलेला 16 वर्षीय अभिषेक बाळासाहेब राखुंडे व दुसरा 14 वर्षीय अभय सुरेंद्र पांडे क्लासला गेले होते, मात्र ते घरी परत न आल्याने पालकांनी …
Read More »कर्जत मतदारसंघाची मतदान यंत्रे सकाळी निघाली…
सर्वात उशिरा झाला प्रवास सुरु कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघांतील कर्जत विधानसभा मतदारसंघात 67.76 टक्के मतदान झाले आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे मंगळवारी (दि. 30) सकाळी साडेसात वाजता पुणे येथे बालवाडी येथे जाण्यास निघाली.दरम्यान, सर्वात उशिरा कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या मतपेट्या बालेवाडी येथे पोहचल्या आहेत. पाच ठिकाणी ईव्हीएम मशीन …
Read More »दुर्गम गावांतही मतदारांचा उत्साही प्रतिसाद
कर्जत, उरणमध्ये 67 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान अलिबाग : जिमाका मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदारसंघांत सोमवारी (दि. 29) मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. त्यांनी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत केलेल्या सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत. विशेषत: अधिकारी …
Read More »मुकी जनावरेही शोधताहेत पाण्याचा आसरा; प्रचंड उकाडा
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्याने मुकी जनावरेही त्रस्त झाली आहेत. उन्हाच्या त्रासामुळे गारवा मिळावा यासाठी गुरे पाण्याचा आसरा घेताना दिसत आहेत. मुके प्राणी पाण्यात राहून आपले शरीर थंड करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. पाताळगंगेच्या पात्रात गाई-म्हशी ठाण मांडत आहेत. उन्हाचा …
Read More »रसायनी परिसरात शांततेत मतदान
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील रसायनी परिसरात शांततेत मतदान झाले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अंदाजे 55 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. मतदान प्रक्रिया सुरळीत पाड पडावी यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, उमेदवारांचे राजकीय भवितव्य सीलबंद …
Read More »मतदान झाले, आता दीर्घ प्रतीक्षा! मावळमधील निकालाच्या अंदाजाबाबत सर्वत्र चर्चा
उरण : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 29) मतदान झाले. या मतदारसंघातून एकूण 21 उमेदवार निवडणुकीसाठी उभे असताना खरी लढत मात्र महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार विरुद्ध महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे अशीच आहे. त्यामुळे मावळचा राजकीय मावळा कोण याकडे मतदारसंघातील नागरिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे …
Read More »पृथ्वी आणि माझा दर्जा वेगळा -गिल
कोलकाता : वृत्तसंस्था पृथ्वी शॉ आणि माझ्या फलंदाजीचा दर्जा वेगळा असून, आम्हा दोघांमध्ये तुलना होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज शुभमन गिलने व्यक्त केली. गिलने मुंबई इंडियन्सविरुद्ध 76 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. यंदाच्या हंगामात त्याने दोन्ही अर्धशतके सलामीला येऊन झळकावली आहेत. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमाविषयी त्याला विचारले …
Read More »काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा; शाहिद आफ्रिदीने पुन्हा तोडले तारे
लाहोर : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू आहे. काश्मीर प्रांत आपल्याकडे घेण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती केल्याचा इतिहास आहे. त्यात काश्मीरमधील काही फुटीरवादी नेत्यांनाही पाककडून फूस लावली जात आहे. त्यामुळे येथील परिस्थिती नेहमीच तणावजन्य असते. या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने उडी …
Read More »प्रशासकीय समितीवर लक्ष्मणची आगपाखड
नवी दिल्ली : वृत्तसंस्था परस्पर हितसंबंधाचे आरोप होऊ लागल्यानंतर भारताचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीवर आगपाखड केली आहे. क्रिकेट सल्लागार समिती सांभाळणार्या प्रशासकीय समितीने आपल्या भूमिकेबद्दल कोणतेही स्पष्टीकरण केलेले नाही, अशा शब्दांत लक्ष्मणने पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मैदानाबाहेर आपल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper