ना. अनंत गीते यांचा पोलादपुरात दावा पोलादपूर : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या सभांमध्ये महायुतीचे कार्यकर्ते खंबीर असल्याचे दिसून आले, तर विरोधकांच्या प्रचारावेळी नेते एका व्यासपीठावर अन् कार्यकर्ते शिवसेनेसोबत असे चित्र दिसत आहे. हे आपल्या सातव्या विजयासाठी सुचिन्ह असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी सवाद (ता. पोलादपूर) येथील …
Read More »सहादेव बर्डे यांची अपंगत्वावर मात
भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड रोहे : प्रतिनिधी तालुक्यामधील वाशी येथील दिव्यांग खेळाडू सहादेव शिवराम बर्डे यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली आहे. चंदिगड येथील युनिव्हर्सिटी ग्राउंडवर 5ते 7 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या सिलेक्शन कॅम्पमध्ये सहादेव शिवराम बर्डे यांची राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड करण्यात आली. भारतीय दिव्यांग क्रिकेट …
Read More »पेणमध्ये सुगंधी गुटखा जप्त
पेण : प्रतिनिधी पेण पोलिसांनी सापळा रचून गुटखा माफियाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे. पंकज उपाध्याय असे या गुटखा माफियाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडील केसरयुक्त पानमसाला, विमल तंबाखु, रंजनीगंधा पानमसाला असा एकुण 22 हजाराचा माल जप्त केला आहे. पंकज उपाध्याय (रा. करंजाडे, ता. पनवेल, …
Read More »डोक्यात दगड घालून सहकार्याचा केला खून
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील बोरगाव गावात असलेल्या दगड खाणीवर काम करणार्या एका कामगाराने आपल्या सहकारी कामगाराचा डोक्यात दगड घालून खून केला. आरोपी यानंतर पसार झाला असून महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील बोरगाव येथे असलेल्या दगड खाणीवर साहेबराव चव्हाण (मूळ रा. नागज, कवठेमहांकाळ) आणि महादेव …
Read More »खारघर : शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी प्रभाग क्रमांक 5मध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला.
Read More »गुटखा विक्री करणार्या 20 जणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा या मालाची अनाधिकृतपणे विक्री करणार्या 20 जणांविरुध्द रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. अलिबाग व परिसरात तसेच शाळा-महाविद्यालयांनजीक असलेल्या लहान-मोठया दुकानांतून गुटखा व तत्सम मालाची छुप्या पध्दतीने विक्री केली जात होती. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश …
Read More »‘जाहिरातींसाठी प्रमाणीकरण आवश्यक’
अलिबाग : जिमाका मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. रायगड मतदार संघात 23 एप्रिल रोजी मतदान असून पूर्व प्रमाणीकरणासाठी जिल्हाधिकारी …
Read More »वाढीव गुण बोर्डाला कळविलेच नाहीत
कर्जतच्या केईएस शाळेतील 56 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालक संतप्त कर्जत : बातमीदार शहरातील कर्जत इंग्लिश मीडियम स्कुलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे यावर्षी शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला, हस्तकला आणि गायन या विषयातील वाढीव गुण शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. या प्रकरणी संस्थेने मुख्याध्यापकांची चौकशी सुरू केली आहे, तर पालकांनी …
Read More »‘लोकसभा निवडणुकीत आगरी-कोळी ग्रामस्थांनी मतदान करावे’
नवी मुंबई ः वार्ताहर प्रकल्पग्रस्त आगरी-कोळी युवा मित्रमंडळ, नवी मुंबई संघटनेने नवी मुंबईतील ग्रामस्थांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावत होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन केले आहे. नवी मुंबईत सध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेऊन आपण सर्व आगरी-कोळी बांधवांनी एक होऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे सांगण्यात येत …
Read More »गणित संबोध परीक्षा विद्यार्थी गुणगौरव
पनवेल : वार्ताहर : पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे विद्यार्थांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम, तसेच शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतल्या जातात. त्यातील एका उपक्रमांतर्गत गणित संबोध परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेतली जाते. या परीक्षेतील जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थांचा गौरव सोमवारी (दि. 15) नवीन पनवेल येथील बांठिया स्कूलमध्ये करण्यात आला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper