Breaking News

महत्वाच्या बातम्या

शिवजयंती उत्सवानिमित्त कोपर फाटा येथे बैठक

लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा उभारणी व सुशोभिकर समिती आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण विभागाच्या वतीने शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमिवर शनिवारी (दि. 4) बैठक कोपर फाटा येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड …

Read More »

दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्घाटन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम पुर्णत्साव आले आहे. दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचा थांबा व वेळापत्रक नियोजनाकरीता एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला असून येत्या 15 दिवसांत मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे नवी मुंबई व ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा दिघा …

Read More »

बदलत्या हवामानामुळे आजारपण वाढले

नवी मुंबईत सर्दी ताप, खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात बदलत्या हवामानामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे.  त्यामुळे शहरात मध्यवर्ती असलेल्या वाशी पालिका रुग्णालयातही बाह्यरुग्णसेवेत वाढ झाल्याची माहिती पालिका रुग्णालयांच्या डॉक्टरांनी दिली आहे. मागील काही दिवसापासून सतत होणार्‍या हवामानातील बदलामुळे शहरात ताप व सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे चित्र …

Read More »

कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना 368 कोटी रुपयांचे वाटप

उर्वरित पात्र ठेवीदारांना रक्कम घेऊन जाण्याचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेत 543 कोटींचा आर्थिक घोटाळा झाला. या पार्श्वभूमीवर बँकेकडे पाच लाखांपर्यंत ठेव असलेल्या 38 हजार ठेवीदारांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 376 कोटी रुपयांपैकी 368 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले असून उरलेली रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडीट गॅरन्टी कॉर्पोरेशनला …

Read More »

‘मविआ’ने कोकणाला काहीच दिले नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार टीका मालवण : प्रतिनिधी शिवसेनेला कोकणाने खूप काही दिले, पण अडीच वर्षांमध्ये सत्तेत असताना शिवसेना महाविकास आघाडीने कोकणासाठी काहीच दिले नाही. उद्धव ठाकरेंचे कोकण प्रेम बेगडी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 4) विरोधकांवर शरसंधान साधले. ते आंगणेवाडी येथील जाहीर सभेत बोलत …

Read More »

पनवेलच्या कुंडेवहाळमध्ये हळदीकुंकू समारंभासह विविध कार्यक्रम रंगले

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे तेजस्विनी महिला ग्रामसंघ, गु्रप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने हळदीकुंकू व माहेरवाशिणींचा आदर सत्कार समारंभ शनिवारी (दि. 4) झाला. या समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुंडेवहाळ येथील जग्दगुरू संत तुकाराम महाराज मंदिरात हळदीकुंकू व माहेरवाशिणींचा आदर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. …

Read More »

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शुक्रवारी (दि. 3) वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी सरगम-जर्नी ऑफ …

Read More »

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर जबरी चोरी

सहा आरोपींना 24 तासांत अटक आठ लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त पनवेल ः वार्ताहर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भाताण बोगद्याच्या अगोदर सहा जणांच्या अज्ञात टोळीने एका व्यक्तीस लाखो रुपयाला लुटल्याची घटना घडली. या प्रकारानंतर गाडी तेथेच सोडून ती टोळी पसार झाली. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच, पोलिसांनी या …

Read More »

डिलेव्हरी बॉयकडूनच कंपनीमध्ये चोरी

सात लाख 62 हजारांचा घातला गंडा पनवेल ः वार्ताहर ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करणार्‍या डिलिव्हरी बॉयनेच 22 महागड्या मोबाईलची चोरी करून कंपनीला तब्बल सात लाख 62 हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कलिमखान बाबुखान पठाण (34) असे डिलिव्हरीबॉयचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तसेच त्याच्या …

Read More »

महाडजवळ केमिकल टँकर उलटला

मुंबई गोवा महामार्ग तीन तास ठप्प महाड ः प्रतिनिधी महाड एमआयडीसीत केमिकल घेऊन येणारा टँकर शुक्रवारी (दि. 3) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव हद्दीत उलटला. त्यामुळे महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. महामार्ग वाहतूक पोलीस आणि महाड शहर पोलीस यांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. तारापूर एमआयडीसीतील लुपिन लिमिटेडमधून महाड …

Read More »