Breaking News

महत्वाच्या बातम्या

देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सचे सर्वेक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या सर्वेक्षणानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येण्याची शक्यता आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने देशभरात केलेल्या सर्व्हेनुसार, पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे, तर काँग्रेसला फक्त 97 जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेसपेक्षा अन्य पक्षाच्या जागा जास्त येऊ शकतात असा …

Read More »

नवीन पनवेलमध्ये महायुतीचा जोरदार प्रचार

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ मतदारसंघात शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार  खासदार श्रीरंग बारणे यांची प्रचारात आघाडी पाहायला मिळत आहे. रविवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल विभागात प्रचार केला. या वेळी शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उरण, पनवेल आणि कर्जत या तीनही विधानसभा मतदारसंघात …

Read More »

चोराच्या उलट्या बोंबा सुरूच

पनवेल : रामप्रहर वृत्त निर्भीड लेखचा रविवारचा (दि. 7 एप्रिल) अंक पाहिल्यास पत्रकार (?) चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात हे पनवेलकरांसमोर उघड झाले आहे. बातमी एक आणि हेडलाईन वेगळीच. यावरून या पत्रकाराला ठाकूर परिवाराची किती कावीळ झाली हे दिसून येते. निर्भीड लेखच्या बातमीमध्ये ‘त्यातच विकी देशमुख याने त्याच्या गाडीतील धारदार …

Read More »

भाजप प्रवेशाचा धडाका सुरूच; उसरोलीमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेऊन अनेक जण भाजपत प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत उसरोलीतील साामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपत जाहीर प्रवेश केला. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टीची विकासकामे पाहता, उसरोलीमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. यामध्ये बाळू माने, विकास पाटील, …

Read More »

डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानने केली कब्रस्थानची स्वच्छता

अलिबाग : प्रतिनिधी : रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 7) अलिबाग तालुक्यात मुस्लीम दफनभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात अलिबाग तालुक्यातील अलिबाग, थळ, मुशेत, रामराज, देवघर, शेखाचेगाव, रेवदंडा, नागाव, श्रीगाव, चौल, पोयनाड, पेझारी येथील मुस्लीम दफनभूमीं परिसराची स्वच्छता करण्यात आली. रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या या …

Read More »

हिंदुत्व जीवनपद्धती सर्वश्रेष्ठ!

मुरूड : प्रतिनिधी : सनातन वैदिक हिंदु धर्म ही केवळ उपासना पद्धती नसून प्रकृती व संस्कृती यांचा एक अनोखा संगम आहे. हिंदु धर्मामध्ये कोणी एक संस्थापक नाही, वा एक ग्रंथ नाही की एक देव नाही.  वसुधैव कुटुम्बकम ही धारणा असलेली जगाच्या पाठीवर एकमेव हिंदुत्व जीवनपद्धती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक …

Read More »

डंपरची एसटी बसला धडक; सात प्रवासी जखमी

नागोठणे : प्रतिनिधी : भरधाव वेगात उलट दिशेला येऊन समोरून येणार्‍या एसटी बसला डंपरने जोरदार धडक दिल्याने बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. सदर अपघात शनिवारी (दि. 6) सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर निडी पुलावर घडला. श्रीवर्धन आगाराची बस (एमएच 20, बीएल 2914) कोलमांडलाहून मुंबईकडे, तर डंपर (एमएच 04, जीएफ 241) मुंबई …

Read More »

वीजवाहिन्या तुटल्याने पालीत 15 तास बत्ती गुल

गुढीपाडवा सणावर विरजण, उकाड्याने ग्रामस्थ हैराण पाली : प्रतिनिधी : वीजवाहिन्या तुटल्याने शनिवारी (दि. 6) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पालीतील वीजपुरवठा खंडित झाला, तो रविवारी (दि. 7) सकाळी साडेदहाच्या सुमारास म्हणजे तब्बल 15 तासांनी पूर्ववत सुरू झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. गुढीपाडवा या सणाच्या दिवशीच वीजबत्ती गुल झाल्याने …

Read More »

कर्जत नगरपालिकेने तोडले रेल्वेचे पाणी

वाढीव पाणीपट्टी देण्यास रेल्वेकडून विरोध कर्जत : बातमीदार : दररोज दोन लाखहून अधिक लिटर पाणी घेणार्‍या मध्य रेल्वेकडून कर्जत नगरपालिकेला हवे तसे उत्पन्न मिळत नाही. वाढीव पाणीपट्टी मिळावी, यासाठी नगरपालिकेकडून सातत्याने पाठपुरावा केला गेला, मात्र रेल्वे ऐकत नसल्याने अखेर शनिवारी (दि. 6) पासून नगरपालिकेने कर्जत रेल्वेस्टेशन आणि तेथील रेल्वे वसाहतींचा …

Read More »

बारणेंच्या विजयासाठी महायुतीची नेरळ परिसरात मोर्चेबांधणी सुरू

कर्जत : बातमीदार : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी नेरळ परिसरात शिवसेना, भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीच्या नेरळ शहरातील कार्यकर्त्यांची बैठक नेरळ शिवसेना शाखेत आयोजित केली होती. त्या वेळी आरपीआयचे कोकण विभागीय सचिव मारुती …

Read More »