Breaking News

महत्वाच्या बातम्या

खारघरमध्ये कर्करोग जागरूकता चर्चासत्रास नागरिकांचा प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्करोगाविषयी लोकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने खारघरमध्ये बुधवारी (दि. 3) चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एशियन कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. निशा अय्यर यांनी मार्गदर्शन केले. 1 ते 7 एप्रिल हा आठवडा तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींसाठी कर्करोग जागरूकता सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. या …

Read More »

वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक बॅगांचे वितरण

खारघर : रामप्रहर वृत्त  भाजपा खारघर वॉर्ड क्र. 4च्या सरचिटणीस, संकल्प प्रतिष्ठान, खारघरच्या महिला अध्यक्षा अंकिता वारंग यांचा वाढदिवस वॉर्ड क्र. 4चे नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने प्रदूषणमुक्त  फॅन्सी कापडी बॅग देऊन पर्यावरणपूरक बॅगेचा वापर करण्याचा संदेश देण्यात आला. संकल्प प्रतिष्ठान, खारघरतर्फे अशा बॅगांचे …

Read More »

हापूसची आता ऑनलाइन खरेदी-विक्री व्यापार्यांच्या नवीन पिढीचे पुढचे पाऊल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोकणातील हापूस आंब्याचे यंदा उत्पादन घटले असून घाऊक बाजारात हापूस आंब्याला उठाव राहिलेला नाही. त्यामुळे विक्रीचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणार्‍या व्यापार्‍यांच्या नवीन पिढीने देवगडच्या हापूस आंब्याची विक्री सुरू केली आहे. त्याला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी हापूस आंबा बागायतदार व व्यापार्‍यांनी हा प्रयत्न केला नव्हता. …

Read More »

खारघर येथे उद्या गुढीपाडवा उत्सव

पनवेल ः बातमीदार  खारघर येथील मराठी फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शनिवारी (दि. 6)  गुढीपाडवा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. गुढीपाडवा  जल्लोष 2019 या पारंपरिक कार्यक्रमास अनेक नामांकित संस्थांनी आर्थिक पाठिंबा दिला आहे. अपोलो हॉस्पिटल, निसर्ग निर्माण डेव्हलपर्स, अ‍ॅरोहेड सर्व्हिसेस आणि कॉप्स सिक्युरिटी सर्व्हिसेस यांसारख्या संस्थांनी प्रायोजक म्हणून हातभार लावला आहे. खारघर …

Read More »

तिघा भामट्यांकडून फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार    शहरातील एका 56 वर्षीय इसमाकडून इन्शुरन्ससाठी घेतलेले पैसे इन्शुरन्स कंपनीत न भरता तब्बल 21 लाखांची फसवणूक केली आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रमेश नारायण गायकवाड हे महात्मा फुले रोड, पनवेल येथे राहत असून त्यांचा रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. 2007 मध्ये दीपक शेळके …

Read More »

काँग्रेसचा जाहीरनामा पवारांना मान्य आहे का?

गोंदिया : प्रतिनिधी काँग्रेसने निवडणुकीसाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तो देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा आणि जवानांचा अपमान करणारा असल्याने हा जाहीरनामा राष्ट्रवादीचे नेते माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांना मान्य आहे का, असा खडा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदियाच्या जाहीर सभेत केला. गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या जाहीर …

Read More »

बारणेंना पुन्हा एकदा संसदेत पाठवा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन गव्हाण : रामप्रहर वृत्त खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचे आहे. त्यांनी मागील पाच वर्षात केलेली कामे घेऊन आणि जिंकण्याचा विश्वास घेऊन मतदारांपर्यंत पोहोचा, असा सल्ला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना दिला. मावळ मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ …

Read More »

मतदारसंघाच्या खर्चावर केंद्रीय निरीक्षकांची नजर

अलिबाग : प्रतिनिधी 33 मावळ लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक विजयकुमार चढ्ढा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली, तसेच विविध नोडल अधिकार्‍यांना उमेदवारांच्या खर्चाचा काटेकोर हिशेब ठेवावा, असे निर्देश दिले. रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण हे तीन मतदारसंघ …

Read More »

मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 2,504 मतदान केंद्र

मुंबई : प्रतिनिधी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात सर्वाधिक एकूण दोन हजार 504 मतदान केंद्र उभारण्यात येतील. मावळनंतर ठाणे, बारामती, रामटेक आणि बीडमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र असतील. 2,452 ठाणे मतदारसंघात, 2,372 बारामती मतदारसंघात, 2,364 रामटेक मतदारसंघात आणि बीड मतदारसंघात 2,325 मतदान केंद्र उभारण्यात येतील. 10 मतदारसंघात 2,100 हून अधिक मतदान …

Read More »

वाय. टी. देशमुख यांच्या फ्लॅटमध्ये चोरी

लाखो रुपयांंचा ऐवज लंपास, सीसीटीव्हीही पळविला पनवेल : वार्ताहर भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्या पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी परिसरातीस अस्पायर हाईट्स या इमारतीमधील बंद फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडून फ्लॅटमधील लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चोरट्यांनी फ्लॅटमध्ये लावलेला सीसीटीव्हीही पळवून नेला आहे. या इमारतीच्या बदली वॉचमनवर संशय व्यक्त …

Read More »