Breaking News

महत्वाच्या बातम्या

रांचीतील क्रिकेट स्टेडियमवर झळकले महेंद्रसिंह धोनीचे नाव

रांची : वृत्तसंस्था मागील अनेक वर्षे भारतीय क्रिकेटचा आयकॉन म्हणून ओळखल्या जाणार्‍या महेंद्रसिंह धोनीने भारताच्या सर्वांत यशस्वी कर्णधारांत मानाचे स्थान पटकावले आहे. त्याने अविश्वसनीय कामगिरी करून झारखंड राज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर वेगळी ओळख दिली. त्याच्या या कीर्तीचा गौरव म्हणून झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने येथील स्टेडियममधील एका स्टॅण्डला कॅप्टन कूल धोनीचे …

Read More »

45वी कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत दाखल

कोलकाता : वृत्तसंस्था पश्चिम बंगाल येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू झालेल्या 45व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी ‘ड’ गटातील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ओडिशाचा 40-19 असा पराभव करीत या गटात अपराजित राहत बाद फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मुलांनीदेखील ‘क’ गटात हिमाचल प्रदेशचा 35-31 असा पराभव करीत या …

Read More »

संजीवनी अकादमीला विजेतेपद

मुंबई : प्रतिनिधी संजीवनी क्रिकेट अकादमी संघाने आयडीबीआय फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर अकादमीला 23 धावांनी हरवून टोटल कप या 13 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान पटकावला. आयडीबीआय फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर अकादमीने नाणेफेक जिंकून संजीवनीला प्रथम फलंदाजी दिली. या संधीचा लाभ उठवताना यष्टीरक्षक फलंदाज ओमकार पाटणकर (59) आणि कर्णधार आदित्य बालीवडा …

Read More »

सिंधूवर सायना भारी

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले नवी दिल्ली : वृत्तसंस्था आसाम येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालने पी. व्ही. सिंधूवर विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनाने सिंधूला 21-18, 21-5 असे पराभूत केले. या स्पर्धेतील सायनाचा हा जेतेपदाचा चौकार ठरला आहे. यापूर्वी तीन वेळा सायनाने राष्ट्रीय …

Read More »

शिव-समर्थ स्मारकाचा आज भव्यदिव्य उद्घाटन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त जेएनपीटीच्या वतीने दास्तान फाटा येथे साकारल्या जात असलेल्या शिव-समर्थ स्मारकाचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 17) सायंकाळी 5 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, राज्याचे अर्थमंत्री सुधीर …

Read More »

भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील यांची नियुक्ती

पनवेल : भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते

Read More »

जवानच शिक्षा ठरवतील पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

यवतमाळ : प्रतिनिधी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना कोणती शिक्षा दिली जाईल आणि शिक्षा कशी, कुठे, केव्हा दिली जाईल, हे आमचे जवानच ठरवतील, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना धैर्य तसेच आपल्या जवानांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे बोलत होते. महाराष्ट्र दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान …

Read More »

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन अलिबाग : जिमाका महाराष्ट्राला 720 किमीचा सागरी किनारा लाभला असतानाही आपण अन्य राज्यांच्या तुलनेत मत्स्य उत्पादनात मागे आहोत. मत्स्य उत्पादनातून मच्छीमार बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. रोजगारनिर्मितीला चालना देणारे क्षेत्र म्हणून शासन मासेमारी क्षेत्राकडे पाहते. त्यादृष्टीने अलिबाग येथील प्रशिक्षण केंद्र हे अधिकाधिक आदर्शवत ठरावे, …

Read More »

पुलवामा हल्ल्याप्रकरणी सात जण ताब्यात

श्रीनगर : पुलवामातील अनंतपुरा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी (दि. 16) सात जणांना ताब्यात घेतले. पुलवामा आणि अवंतीपुरा भागात ही कारवाई करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे 80 किलोग्रॅम आरडीएक्सचा वापर करण्यात आला आहे. आरडीएक्सचा साठा कारमध्ये भरून ही कार सीआरपीएफच्या बसवर (एचआर …

Read More »

पनवेलचे सुपुत्र सत्यवान पाटील सुखरूप

पनवेल : बातमीदार जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. या वेळी सोशल मीडियावर पनवेल तालुक्यातील केळवणे येथील एका जवानाला वीरमरण आले असल्याचे वृत्त व्हायरल झाले होते, मात्र सत्यवान पाटील हे सुखरूप असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी …

Read More »