Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईतही डोळ्यांची साथ

वाशी महापालिका रुग्णालयात दररोज 25 रुग्णांवर उपचार नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातही डोळे येण्याची साथ आली असून गेल्या आठवड्याभरापासून डोळ्याची साथ वेगाने वाढत आहे. नवी मुंबई महापालिका नागरी आरोग्य केंद्र,महापालिका व खासगी रुग्णालयात नेत्रसंसर्गबाधित रुग्ण वाढल्याच्या माहिती समोर येत आहे. अशी लक्षणे दिसताच योग्य ती काळजी घ्यावी, …

Read More »

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी

आशिष शेलार खजिनदार मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची निवड झाली आहे, तर खजिनदारपदाची सूत्रे भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे असणार आहेत. बीसीसीआयच्या मंगळवारी (दि. 18) मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 1983च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य रॉजर …

Read More »

राज्य शासकीय कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी मिळणार वेतन

मुंबई : प्रतिनिधी येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते, परंतु दिवाळी 22 ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर …

Read More »

महाडच्या खरवलीत मिरवणूक अंगलट

नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल महाड : प्रतिनिधी.   ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर काढलेली मिरवणूक महाड तालुक्यातील खरवलीचे नवनिर्वाचित सरपंच, काही सदस्य तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या अंगलट आली आहे. विनापरवाना मिरवणूक काढून पोलीस अधिकार्‍याला धमकवल्याप्रकरणी 11 जणांवर  महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा …

Read More »

मोदी सरकारची शेतकर्‍यांना दिवाळी भेट!

रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम जमा केल्यानंतर आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी …

Read More »

पेण तालुक्यात 41 हजार 500 रेशन कार्डधारकांना मिळणार दिवाळी शिधाचा लाभ

पेण : प्रतिनिधी राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारने दिवाळीचे औचित्य साधत अवघ्या 100 रुपयांत रेशनवर धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील सुमारे 41 हजार 500 रेशन कार्डधारकांना त्याचा लाभ होणार आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळीनिमित्त एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर …

Read More »

कर्जत : पोटल, पाली ग्रामपंचायतीत आघाडीची सत्ता; एका जागेवर ‘कमळ’ उमलले

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील पोटल आणि पाली खलाटी या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 17) झालेल्या मतमोजणीत पाली खलाटीमध्ये ग्रामविकास आघाडी, तर पोटल ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट विजयी झाला. पोटलमध्ये वर्षा मिनेश मसणे या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य निवडून आल्या आहेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी …

Read More »

पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत बाळासाहेबांच्या शिवसेनेने जिंकली

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील प्रतिष्ठेची पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट)ने जिंकली असून या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला.तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत शेकापने तर पन्हळघर खुर्द ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या शिवसेनेने जिंकली आहे. माणगाव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द आणि देगाव या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होऊन मतमोजणी सोमवारी …

Read More »

पोलादपूर तालुक्यात चारपैकी तीन सरपंचपदे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील तुर्भे खोंडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक आणि वझरवाडी या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेने तीन सरपंचपदे जिंकली असून एका ठिकाणी श्रीराम विकास आघाडीचा सरपंच झाला आहे. तुर्भे खोंडामध्ये सरपंच व सात सदस्य शिंदे गटाचे – तुर्भे खोंडा येथील थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत  शिंदे गटाच्या कविता …

Read More »

वेश्वी, नवेदर-नवगावमध्ये विकास आघाडीचे सरपंच; अलिबागेतील दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शेकापचा पराभव

अलिबाग : प्रतिनिधी शेकापचा बालेकिल्ला असलेल्या अलिबाग तालुक्यातील वेश्वी आणि नवेदर-नवगाव या ग्रामपंचायतिंच्या  सरपंचपदाच्या निवडणुकीत विकास आघाडीने  शेकापला जोरदार धक्का दिला. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे थेट सरपंचपदाचे उमेदवार पराभूत झाले. वेश्वी ग्रामपंचायत सरपंचपदी विकास आघाडीचे गणेश भालचंद्र गावडे तर नवेदर-नवगाव ग्रामपंचयात सरपंचपदी विकास आघाडीच्या प्रियांती आदर्शन घातकी विजयी झाल्या. शेकापचे …

Read More »