Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

अलिबाग ः प्रतिनिधी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा मंगळवारी (दि. 20) सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील …

Read More »

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम -विविध ठिकाणी शिबिर; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सर्वत्र समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्ताने भाजपच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत पनवेल परिसरातील खांदा …

Read More »

दै. राम प्रहर अर्थसाक्षर सदरातील प्रश्नमंजुषा

Read More »

तब्बल सात दशकानंतर चित्ता पुन्हा भारतात

भोपाळ : वृत्तसंस्था भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचे तब्बल 75 वर्षांनंतर मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी (दि. 17) आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्त्यांना उद्यानात सोडले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पाच मादी आणि तीन नर असे एकूण आठ चित्ते विशेष कार्गो विमानाने आफ्रिकेतील नामिबियातून ग्वाल्हेरमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांना …

Read More »

‘हार्बर’चा बोरीवलीपर्यंत होणार विस्तार

रेल्वे विभागाकडून लोकल प्रवाशांना सुविधा मुंबई : प्रतिनिधी गोरेगावपर्यंत असलेल्या हार्बर रेल्वेचा बोरीवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. एमयूटीपी-3 ए अंतर्गत हा प्रकल्प साकारण्यात येत असून या प्रकल्पात हार्बरवरील मालाड स्थानक उन्नत होणार आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी-पनवेल, सीएसएमटी-अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावते. यापूर्वी गोरेगावऐवजी सीएसएमटी-अंधेरीदरम्यान हार्बर सेवा सुरू होती. सीएसएमटी येथून अनेक …

Read More »

“मराठवाड्याला दुष्काळमुक्त करू”

मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांची नांदेडमध्ये घोषणा नांदेड : प्रतिनिधी नांदेडमध्ये शनिवारी (दि. 17) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण करून शहिदांना मानवंदना दिली. या वेळी त्यांनी विकासाचा अनुशेष भरून काढून मराठवाड्याला राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊ, लवकरच हा विभाग दुष्काळमुक्त करू, अशी घोषणा …

Read More »

पनवेलमध्ये स्वच्छ अमृत महोत्सवाच्या रॅलीला तरुणाईचा उदंड प्रतिसाद

महापालिकेचा उपक्रम   पनवेल : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त पनवेल व कळंबोलीत पायी रॅली (पदयात्रा), स्वच्छता मोहीम आणि खारघरमध्ये सायकल रॅलीचे आयोजन महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि. 17) करण्यात आले होते. या रॅलीला तरुणाईचा उदंड प्रतिसाद मिळाला. पनवेल महापालिका मुख्यालय ते वडाळे तलावदरम्यान काढण्यात आलेल्या पायी रॅलीत आमदार प्रशांत …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते 250 बौद्धिक दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेच्या (दिव्यांगजन) खारघर केंद्रात शनिवारी (दि. 17) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने 250 बौद्धिक दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्याचे (किट) वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 72वा वाढदिवस 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवडा म्हणून संपूर्ण देशभर साजरा होत आहे. याचे …

Read More »

झोकून देऊन काम करा; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

सेवा पंधरवडा आयोजनासंदर्भात आढावा बैठक पनवेल ः रामप्रहर वृत्त आजपर्यंत आपण सर्व झोकून देऊन काम करीत राहिलो आहे. त्याच प्रमाणे येणार्‍या कालावधीतदेखील अशाच प्रकारे कार्यरत राहिल्यास आपण अधिक चांगल्या पद्धतीने लोकांची कामे करू शकतो, असे प्रतिपादन भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 16) केले. ते सेवा पंधरवड्याच्या …

Read More »

गौरा गणेशोत्सवानिमित्त नवीन पनवेलमध्ये हळदी कुंकू समारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील डी-मार्ट समोरील मैदानात युथ सोशल फाउंडेशनच्या वतीने गौरा गणपती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाचे औचित्य साधून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन बुधवारी (दि. 14) करण्यात आले होते. हा समारंभ युथ सोशल फाउंडेशन नवीन पनवेल यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला परिसरातील …

Read More »