Breaking News

महत्वाच्या बातम्या

बसची टे्रलरला जोरदार धडक; एकाचा मृत्यू, 19 प्रवाशी जखमी

पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील एक्स्प्रेस महामार्गावर मध्यरात्री अडीच सुमारास उभ्या ट्रेलरला पाठीमागून आलेल्या एसटी बसची धडक बसली. झालेल्या अपघातात एसटी बसचालकाचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला, तर बसमधील 19 प्रवाशी जखमी झाले. त्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सोलापूर येथून अर्नाळा विरार या ठिकाणी एसटी बस …

Read More »

…अन्यथा बेमुदत बंद करू

कामगार नेते सुधीर घरत यांचा जेएनपीए प्रशासनाला इशारा उरण : प्रतिनिधी, बातमीदार भारतीय मजदूर संघटनेचा 68 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने जेएनपीएच्या कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात शनिवारी (दि. 23) कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कामगार नेते सुधीर घरत म्हणाले की, 950 कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी 29 जुलै 2022 रोजी एक …

Read More »

सततच्या पावसामुळे शेतात तुंबले पाणी; उरणमध्ये भाताची रोपे कुजली

शेतकरी चिंताग्रस्त उरण : प्रतिनिधी, बातमीदार पेरणीचा पाऊस उत्तम झाल्याने उरणच्या पूर्व भाग परिसरातील खाडी विभागातील भातशेतीत दमदार झालेली भाताची रोपे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी शेतात तुंबल्याने पार कुजून गेली आहेत. भाताची रोपेच कूजन गेल्याने आता भाताची लागवट कशी करायची, असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. उरणच्या पूर्वभाग परिसरातील आवरे, …

Read More »

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

संवेदनशील माणसांची व्यक्त होणे ही गरज असते. शब्द हे व्यक्त होण्याचे प्रभावी साधन आहे. मनात साचलेल्या भावभावना, संवेदना, जीवन जगताना आलेले कडू गोड अनुभव यांचा अंतर्मनातील अविष्कार म्हणजे पुस्तके, ग्रंथ! माणसे लिहित असतात, व्यक्त होत असतात आणि वाचणारे वाचत जातात, तादात्म्य होतात. कालानुरूप, व्यक्तीनुरूप लिहिण्याची भाषा, शैली. विचारांचे वेगळेपण त्या …

Read More »

गोरख ठाकूर व मित्र परिवारातर्फे वीज कर्मचार्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांना मदत

उरण : बातमीदार कर्मवीर भाऊराव पाटील शाळा खोपटे येथे  खोपटे गावातील युवा सामाजिक कार्यकर्ता गोरख रामदास ठाकूर आणि मित्र परिवार यांच्या मार्फत शुक्रवार (दि. 22) सकाळी 11.30 वाजता गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक मदत करण्यात आली. तसेच वीज कर्मचार्‍यांचा सत्कार देखील करण्यात आला. उरण पूर्व विभागात वीज खूप मोठ्या प्रमाणात खंडित …

Read More »

देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा -पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्टदरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले आहे. या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत …

Read More »

सीबीएसई दहावीचा 94.90 टक्के, तर बारावीचा 92.71 टक्के निकाल

पुणे : प्रतिनिधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून ते अनुक्रमे 94.90 टक्के आणि 92.71 टक्के असे आहेत. सीबीएसईतर्फे दहावी, बारावीचे निकाल शुक्रवारी (दि. 22) ऑनलाइन घोषित करण्यात आले. देशातील 14 लाख 35 हजार 366 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. …

Read More »

पनवेलमध्ये आज भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 800 प्रतिनिधींची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी (दि. 23) पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती भाजपचे …

Read More »

हनुमान कोळीवाड्यातील 20 घरे धोकादायक

उरण : प्रतिनिधी मागील 33 वर्षांपासून फेर पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या हनुमान कोळीवाडा गावातील आणखी 20 घरे अतिवृष्टीमुळे अत्यंत धोकादायक बनली आहेत. जेएनपीए, सिडको, जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही धोकादायक घरे कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना घडण्याची भिती रहिवाशांकडूनही व्यक्त होत आहे. जेएनपीए बंदरासाठी विस्थापित करुन वसविण्यात आलेले संपूर्ण हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने …

Read More »

मुख्यमंत्री व खासदारांना अपमानित करणार्यांवर कारवाई करा -रामदास शेवाळे

पनवेल ः रामप्रहर वृत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रतिमेस काळे फासून त्यांना अपमानित करून व त्यांना अश्लिल शिवीगाळ केल्यापकरणी आरोपींविरूद्ध कारवाई करण्याबाबत निवेदन एकनाथ शिंदे समर्थक रामदास शेवाळे यांनी कामोठे पोलिसांना दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आरोपी ललित सोडेवाल, गणेश खांडगे व …

Read More »